हिमा दास बनली डीएसपी
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी
Farrata runner Hima Das made DSP | टोकियो ऑलिम्पिकसाठी मेहनत घेणारी अनुभवी धावपटू हिमा दास (Hima Das) हिला आसाम सरकारने पोलिस उपअधीक्षकपदी (DSP) नियुक्ती केली आहे.
हिमाने आसामचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे आभार मानले. यामुळे मला प्रेरणा मिळाली आहे, असे तिने म्हंटले आहे.
हिमाने ट्वीट केले आहे, की ‘‘मी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि हेमंत विश्वा यांनी दिलेल्या नियुक्तीबद्दल आभारी आहे. मी राज्य आणि देशाची सेवा करण्यास उत्सुक आहे. जय हिंद.’’
क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी आसम सरकारचे आभार व्यक्त करताना ट्वीट केले, की ‘‘खूप छान. आसाम सरकार आणि सर्वानंद सोनोवाल यांच्या निर्णयाचे स्वागत आहे.’’
‘धिंग एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली 21 वर्षीय हिमा दास सध्या एनआयएस पतियाळा येथे सराव करीत आहे. तिचं लक्ष्य टोकियो ऑलिम्पिकची पात्रता सिद्ध करणे हे आहे.
रिजीजू म्हणाले, ‘‘बरेच लोक विचार होते, की हिमाच्या करिअरचं काय होईल? ती ऑलिम्पिकची तयारी करीत आहे आणि भारतासाठी खेळत आहे. नोकरी करणारे आमचे अनेक दिग्गज खेळाडू अजूनही खेळत आहेत. निवृत्तीनंतर हेच खेळाडू खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.’’