All SportsCricket

कुंबळेने केले जाफरचे समर्थन | Anil Kumble supported Wasim Jaffer

कुंबळेने केले जाफरचे समर्थन

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी

Anil Kumble supported Wasim Jaffer | उत्तराखंड क्रिकेट संघटनेत (CAU) धर्माच्या आधारावर निवड केली जात असल्याचा आरोप वसिम जाफर Wasim Jaffer याच्यावर होत आहे. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचे सांगत अनिल कुंबळे Anil Kumble यांनी जाफरचे समर्थन केले.

राज्य संघटनेतील वादामुळे वसिम जाफर यांनी उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत आरोपांचे खंडन केले. संघात मुस्लिम खेळाडूंची बाजू घेत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

जाफरला आता भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे Anil Kumble यांचं समर्थन मिळालं आहे. कुबंळे कधी काळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचेही प्रमुख होते.

कुंबळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे, की ‘‘मी तुमच्यासोबत आहे वसिम. तुम्ही योग्यच केले आहे. दुर्भाग्य आहे त्या खेळाडूंचं, ज्यांना तुमच्यासारखा प्रशिक्षक नसल्याची उणीव सतत भासत राहील.’’

भारतासाठी 31 कसोटी सामने खेळलेले जाफर यांनी सांगितले होते, की संघात मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा सीएयूचे (CAU) सचिव माहीम वर्मा यांच्या आरोपामुळे मला दु:ख झाले आहे.

या आरोपानंतर जाफर यांनी मंगळवारी, ९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.

जाफर यांनी बुधवारी आभासी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘जो धर्मसमूहाशी संबंबधित पक्षपाती आरोप माझ्यावर लावण्यात आला आहे, तो अत्यंत दु:खद आहे. माझ्यावर आरोप करण्यात आला होता, की मी इकबाल अब्दुल्ला याचं समर्थन करतोय आणि त्याला कर्णधार बनवण्याचा माझा प्रयत्न होता. मात्र हे अत्यंत चूक आहे.’’

रणजी ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज जाफर यांच्यावर असाही आरोप करण्यात आला, की संघाच्या सराव सत्रादरम्यान ते मौलवींना घेऊन आले होते. या आरोपाचेही त्यांनी खंडन केले.

ते म्हणाले, ‘‘बायो बबलमध्ये मौलवी आले आणि आम्ही नमाजपठण केले. मात्र, मी सांगू इच्छितो, की मौलवी, मौलाना जे कोणी डेहराडूनमध्ये शिबिरादरम्यान दोन-तीन शुक्रवारी आले होते, त्यांना मी बोलावले नव्हते.’’

जाफर यांनी सांगितले, ‘‘जुम्माच्या नमाजपठणासाठी इकबाल अब्दुल्ला यांनी माझी आणि मॅनेजरची परवानगी मागितली होती.’’

जाफर यांनी ट्वीट करताना सांगितले, की ‘‘कर्णधारपदासाठी मी जय बिस्टा याच्या नावाची शिफारीश केली होती; इकबालची नाही. मात्र, सीएयूच्या अधिकाऱ्यांनी इकबालला पसंती दिली.’’

जाफर यांना जून 2020 मध्ये उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी एक वर्षाचा करार केला होता. उत्तराखंडचा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत पाचपैकी एकच सामना जिंकू शकली.

जाफरवर बायो बबल उल्लंघन प्रकरणी कारवाई?

डेहराडून : उत्तराखंड क्रिकेट संघटनेने (CAU) भारताचा माजी सलामी फलंदाज वसिम जाफर Wasim Jaffer प्रशिक्षक असताना बायो बबलचे उल्लंघन केल्याचा मुद्दा आणला आहे. या प्रकरणीम वरिष्ठ संघाचे व्यवस्थापकाकडे अहवाल मागितला आहे.

सीएयूसोबतच्या वादानंतर जाफर यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला होता.

जाफर यांनी बुधवारी या आरोप फेटाळले होते. धर्माच्या आधारावर निवड करणे आणि बायो बबलदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये धर्मगुरूंना घेऊन आल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. हे आरोप सीएयूचे सचिव माहीम वर्मा यांनी लावले आहेत.

वर्मा यांनी सांगितले, ‘‘उत्तराखंड क्रिकेट संघटना (CAU) वसिम जाफर यांच्याशी निगडित प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. वरिष्ठ  संघाचे व्यवस्थापक नवनीत मिश्रा यांना या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.’’

जाफर यांनी स्पष्ट केले, की ते जय बिस्टा याला कर्णधार करणार होते. भारताचा १९ वर्षांखालील विश्वकप विजेत्या संघातील इकबाल अब्दुल्लाचा यात विचार नव्हता. अब्दुल्ला याने आग्रह केल्यानंतरच शुक्रवारच्या नमाजपठणास मौलवींना ड्रेसिंग रूम आले होते.

वर्मा यांनी सांगितले, ‘‘मिश्रा यांच्या सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर आम्ही कारवाईवर निर्णय घेऊ. आम्ही आधीच व्यवस्थापकाशी जैवसुरक्षा प्रणालीचे उल्लंघनावर चौकशी करीत आहे. यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. कारण खेळाडूंची आरोग्य सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे.’’

जाफर यांना यापूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासह अनेक खेळाडूंचं सोशल मीडियावर समर्थन मिळालं आहे.

Follow us :


[jnews_block_9 first_title=”read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!