All SportsCricket

मिताली @ 10,000

मिताली @ 10,000

Mithali Raj @ 10,000 | भारतीय क्रिकेट संघाची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार (Mithali Raj @ 10,000) धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती भारतातली पहिली, तर जगातली दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या मितालीने शुक्रवारी, १२ मार्च २०२० रोजी दहा हजार धावा पूर्ण केल्या.

चार्लोटनंतर मितालीची कामगिरी

मितालीने Mithali Raj | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली 35 वी धाव पूर्ण करताच कारकिर्दीतल्या दहा हजार धावांवर शिक्कामोर्तब केले. मितालीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,001 धावा नोंद झाल्या आहेत. तिच्या धावांची सरासरी आहे 46.73. वयाच्या 38 व्या वर्षी मितालीची ही कामगिरी कौतुकास्पद मानली जात आहे. यापूर्वी इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्सने (Charlotte Edwards) 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 309 सामन्यांत 10,273 धावा केल्या होत्या.

शुभेच्छांचा वर्षाव

सचिन तेंडुलकरसह जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी मितालीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने ट्वीट केले, की ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन मिताली. उत्तम कामगिरी. अशीच पुढे जात राहा.” बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मितालीला महिला क्रिकेटमधील दिग्गज म्हंटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (BCCI) मितालीचे कौतुक केले आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सनेही मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

३११ सामन्यांत कामगिरी

मिताली Mithali Raj | सध्या कारकिर्दीला 311 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळतआहे. मितालीने जून 1999 मध्ये वन-डेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत 10 कसोटी सामन्यांत 51.00 च्या सरासरीने 663 धावा, वन-डेमध्ये 212 सामन्यांत 50.53 च्या सरासरीने 6,974 आणि टी-20 मधील 89 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 37.52 च्या सरासरीने 2,364 धावा केल्या.

मितालीने आपल्या कारकिर्दीत विक्रमी 75 अर्धशतके आणि आठ शतके झळकावली आहेत. यातील 54 अर्धशतके आणि सात शतके तिने वन-डेमध्ये केली आहेत. कसोटी सामन्यांत तिने एकमेव शतक (214 धावा) इंग्लंडविरुद्ध 2002 मध्ये टॉटनमध्ये केले होते. मितालीने सप्टेंबर 2019 मध्ये टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे. या प्रकारात तिने 17 अर्धशतके केली आहेत. टी-२० मध्ये नाबाद 97 ही तिची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

मितालीची कामगिरी

311 आंतरराष्ट्रीय सामने

10,001 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये

46.73 च्या सरासरीने दहा हजार धावा

663 धावा दहा कसोटी सामन्यांत

6,974 धावा 212 वनडे सामन्यांत

2,364 धावा 89 टी-२० सामन्यांत

Follow us :


[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!