All SportsIPL

IPL RR vs CSK | राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान

 

राजस्थानला स्टोक्स, स्मिथविना खेळण्याचं आव्हान


शारजाह | बेन स्टोक्स पहिल्या सामन्यापासून संघाबाहेर आहे. आता स्टीव स्मिथही दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता कमीच आहे. IPL RR vs CSK |  या परिस्थितीत राजस्थान रॉयल्ससमोर २२ सप्टेंबर २०२० रोजी चेन्नई सुपर किंग्सचं तगडं आव्हान आहे. 

IPL RR vs CSK |  इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2020) पहिलाच सामना खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स चेन्नईचं आव्हान तसं कठीणच आहे. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केल्याने चेन्नईचा आत्मविश्वासही उंचावला आहे. 

IPL RR vs CSK 

राजस्थानच्या अडचणी येथेच संपलेल्या नाहीत. जोस बटलरही पहिल्या सामन्यापासून संघाबाहेर आहे. तो कुटुंबासह संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे त्याला 36 तास क्वारंटाइन राहावे लागणार आहे. 

चेन्नईची जमेची बाजू म्हणजे त्यांनी सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पाच गडी राखून पराभूत केले आहे. त्यामुळे चेन्नईसारख्या तीन वेळच्या विजेत्या संघाचं पारडं राजस्थान रॉयल्सपेक्षा तसुभर जडच आहे. 

IPL RR vs CSK | कारण त्यांचा हुकमी खेळाडू बेन स्टोक्स संघात नाही आणि सलामीचा फलंदाज जोस बटलरही पहिल्या सामन्यापासून संघाबाहेर आहे.

स्टोक्स संघात नसण्याचं कारण म्हणजे आजारी वडिलांसाठी तो अद्याप मायदेशी न्यूझीलंडमध्ये आहे. लीगच्या पहिल्या टप्प्यात त्याची गैरहजेरी संघाचं संतुलन बिघडवू शकते. 

आता जरी तो संयुक्त अरब अमिरातीत आला तरी त्याला वैद्यकीय पथक पहिला सामना खेळण्यास परवानगी देणार नाही. असं झालं तर तो राजस्थान रॉयल्ससाठी मोठा झटका असेल. 

राजस्थानची बरीचशी मदार परदेशी खेळाडूंवर आहे. गोलंदाजीची धुरा इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाये यांच्या खांद्यावर असेल. फलंदाजीची धुरा दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरवर असेल. 

मागच्या आयपीएलमध्ये राजस्थान संघातील भारतीय खेळाडूंची कामगिरी यथातथाच राहिलेली आहे. संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, वरुण आरोन यांना लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. 

IPL RR vs CSK |  याउलट चेन्नईच्या संघाचं म्हणाल, तर त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. सॅम कुरेनने उत्तम कामगिरी करताना ड्वेन ब्राव्होची उणीव जराही जाणवू दिलेली नाही. ब्राव्हो दुखापतीमुळे आणखी काही सामने खेळू शकणार नाही. 

अंबाती रायुडू आणि फाफ डुप्लेसीने अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज पीयूष चावलाही चांगला भरात आहे.

चेन्नईने आपल्यासाठी जी किंमत मोजली ती योग्यच होती, हे त्याने आपल्या कामगिरीने सिद्ध केलं आहे. जर पहिल्या सामन्यात दीपक चहर खेळू शकला नाही तर त्याच्या जागेवर शार्दूल ठाकूर हा चेन्नईसाठी पर्याय असेल.

 

आजचा सामना (22 सप्टेंबर 2020) | वेळ ः सायं. 7.20 | ठिकाण ः शारजाह
rajasthan-royals-logo

राजस्थान रॉयल्स

Chennai Super Kings

चेन्नई सुपरकिंग्स

 

ipl rr vs csk
स्टीव स्मिथ
(कर्णधार)

 

ipl csk vs rr
महेंद्रसिंह धोनी
(कर्णधार)

जोस बटलर मुरली विजय
रॉबिन उथप्पा अंबाती रायुडू
संजू सॅमसन फाफ डु प्लेसी
बेन स्टोक्स शेन वॉटसन
जोफ्रा आर्चर केदार जाधव
यशस्वी जयस्वाल ड्वेन ब्राव्हो
मनन वोहरा रवींद्र जडेजा
कार्तिक त्यागी लुंगी एंगिडी
आकाश सिंह दीपक चहर
ओशेन थॉमस पीयूष चावला
अँड्र्यू टाये इम्रान ताहीर
डेव्हिड मिलर मिशेल सेंटनेर
टॉम कुरेन जोश हेजलवूड
अनिरुद्ध जोशी शार्दूल ठाकूर
श्रेयस गोपाल सॅम कुरेन
रियान पराग एन. जगदीशन
वरुण आरोन के. एम. आसिफ
शशांक सिंह मोनू कुमार
अनुज रावत आर. साई किशोर
महिपाल लोमरोर ऋतुराज गायकवाड
मयंक मार्कंडेय कर्ण शर्मा
[jnews_hero_9 include_category=”87″]

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!