जोकोविचचा पुन्हा संताप
रोम | जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला आत्मघातकी संताप आवरता आलेला नाही.
याच संतापामुळे दोन आठवड्यांपूर्वी त्याला अमेरिकन ओपनमधून बाहेर व्हावे लागले होते. Djokovic temper out | आता इटालियन ओपनमध्येही त्याला संतापामुळेच २१ सप्टेंबर २०२० रोजी पुन्हा तंबी देण्यात आली आहे.
कॅस्पर रूटविरुद्ध 7-5, 6-3 असा विजय मिळविल्यानंतर संतापी जोकोविचला तंबी देण्यात आली आहे. दुसऱ्या सेटमधील तिसऱ्या गेममध्ये तो चेअर अंपायरवरच भडकला.
त्यावर त्याला तंबी दिल्यानंतर जोकोविच नरमला. जोकोविच म्हणाला, ‘‘मला तंबी मिळायलाच हवी होती. माझी भाषा अतिशय वाईट होती. चेअर अंपायरशी माझे काही वेळ वाद झाला. तो क्षणिक आवेग असतो, ज्यात ही घटना घडली. अनेकदा कोर्टवर असे होत असते.’’