• Latest
  • Trending
Delhi vs punjab in IPL 2020

Delhi vs punjab in IPL 2020 | दिल्लीचं पारडं जड

September 20, 2020
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
लवलिना बोर्गोहेन भारतीय बॉक्सिंग

2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

December 5, 2022
कतार फिफा वर्ल्ड कप

कतार फिफा वर्ल्ड कप वेळापत्रक 2022

November 21, 2022
Thursday, February 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

Delhi vs punjab in IPL 2020 | दिल्लीचं पारडं जड

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध फिरकीचा मारा

Mahesh Pathade by Mahesh Pathade
September 20, 2020
in All Sports, IPL
0
Delhi vs punjab in IPL 2020
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

 

दिल्लीचं पारडं जड



रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेलसारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजांमुळे दिल्ली कॅपिटल्सचं पारडं किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचं पारडं जडच म्हणावं लागेल. Delhi vs punjab in IPL 2020 | 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) रविवारी, 20 सप्टेंबर 2020 रोजी दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामना रंगणार आहे. Delhi vs punjab in IPL 2020 | हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. या दोन्ही संघांचा  यंदाच्या आयपीएलमधला हा दुसरा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांच कौशल्य पणास लागलेलं असेल.

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यांना भविष्यातील भारतीय संघाच्या कर्णधारच्या रूपाने पाहिले जात आहे. 

एवढेच नाही, तर दोन्ही संघांचे प्रशिक्षक जागतिक स्तरावरील खेळाडू राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांची मैदानावरील रणनीती बघण्यासारखी असेल. 

किंग्स इलेव्हन पंजाबचे खेळाडू अनिल कुंबळे यांच्याकडून प्रेरणा घेऊ पाहतील, तर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू रिकी पाँटिंगच्या योजनांनुसार मैदानावर उतरतील, यात शंका नाही. 

Delhi vs punjab in IPL 2020 | दोन्ही संघांत फलंदाजांची फळी जवळपास सारखीच आहे. मात्र, संयुक्त अरब अमिरातीत संथ खेळपट्ट्या आहेत. या खेळपट्ट्यांवर आर. अश्विन, मिश्रा आणि अक्षर ही तिकडी पंजाबच्या संघावर भारी पडू शकते. 

फलंदाजांची फळी पाहिली तर दिल्ली कॅपिटल्समध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सुंदर मिलाफ आहे. यात पृथ्वी साव, अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन यांच्यासह वेस्ट इंडीजचा शिमरोन हेटमायरचा समावेश आहे. 

ही फळी पाहिली तर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (120 पेक्षा कमी स्ट्राइक रेट) याला कदाचित संधी मिळू शकणार नाही. संघाने त्याला राजथान रॉयल्सकडून आपल्याकडे खेचले होते. 

Delhi vs punjab in IPL 2020 | किंग्स इलेव्हनजवळ ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल आणि स्वत: राहुलसारखे उत्तुंग फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. 

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 108 धावांची शतकी खेळी साकारत संघाला विजय मिळवून देणारा मॅक्सवेल याचा आत्मविश्वास बराच उंचावलेला असेल. 

त्याने 2014 मध्ये जेव्हा आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळविण्यात आले होते, तेव्हा त्याने शानदार कामगिरी केली होती.  मॅक्सवेलने त्या मोसमात 16 सामन्यांत 552 धावा केल्या होत्या.

किंग्ल इलेव्हनकडेही षटकारांचा बादशाह ख्रिस गेल आणि राहुल ही सलामीची जोडी दिल्लीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यानंतर मयंक अग्रवाल आहे. 

दिल्ली कॅपिटल्स कॅगिसो रबाडाऐवजी डॅनियल सॅम्सला अंतिम संघात स्थान देऊ शकेल. कारण डॅनियलने बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. कदाचित यामुळे ईशांत शर्मालाही बाहेर बसावे लागू शकते. 

Delhi vs punjab in IPL 2020 | किंग्स इलेव्हन पंजाबसाठी मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल, तर फिरकी गोलंदाजीची धुरा अफगाणिस्तानचा मुजीब जदरान याच्यावर असेल. 

अश्विन गेल्या मोसमातील  ‘मांकेडिंग’ वाद विसरून मिश्रासोबत जोडी जमवेल. मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये 157 विकेट आहेत. तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 

Delhi vs punjab in IPL 2020 | गेल्या पाच सामन्यांत पंजाब संघाने चार सामने जिंकले आहेत. मात्र, दोन्ही संघांमध्ये सध्या तरी दिल्लीचं पारडं जड आहे. 

दिल्ली कॅपिटल्स किंग्स इलेव्हन पंजाब
श्रेयस अय्यर
(कर्णधार)
लोकेश राहुल
(कर्णधार)
रविचंद्रन अश्विन मयंक अग्रवाल
शिखर धवन शेल्डन कॉटरेल
पृथ्वी साव ख्रिस गेल
शिमरोन हेटमायर ग्लेन मॅक्सवेल
कॅगिसो रबाडा मोहम्मद शमी
अजिंक्य रहाणे मुजीब उर रहमान
अमित मिश्रा करुण नायर
ऋषभ पंत
(यष्टिरक्षक)
निकोलस पानन
(यष्टिरक्षक)
इशांत शर्मा जेम्स नीशम
अक्षर पटेल ईशान पोरेल
संदीप लामिचाने अर्शदीप सिंह
किमो पॉल
मुरुगन अश्विन
डॅनियल सॅम्स
कृष्णप्पा गौतम
मोहित शर्मा
हरप्रीत बरार
एनरिच नोर्जे
दीपक हुड्डा
अॅलेक्स कॅरी
(यष्टिरक्षक)

सिमरन सिंह
(यष्टिरक्षक)
आवेश खान
सरफराज खान
तुषार देशपांडे
मनदीप सिंह
हर्षल पटेल
दर्शन नलकंडे
मार्कस स्टोइनिस
रवी बिश्नोई
ललित यादव
ख्रिस जॉर्डन
  जगदीश सुचित
  तजिंदर सिंह
  हार्डस विलजोन
आजचा सामना (१९ सप्टेंबर २०२०)

दिल्ली कॅपिटल्स

Delhi capitals logo

विरुद्ध

किंग्स इलेव्हन पंजाब

वेळ : सायं. ७.३०
ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सामना कुठे पाहाल?
Star Sports 1 Star Sports 2  Star Sports 1 (Hindi)

Read more

आयपीएल 2022 च्या मोसमासाठी खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील
All Sports

आयपीएल 2022 च्या मोसमासाठी खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील

February 28, 2022
आयपीएल खेळाडू रिटेन
All Sports

आयपीएल संघांतील मुख्य खेळाडू रिटेन करणार की कायम राहणार?

December 11, 2021
आयपीएलमध्ये आणखी दोन संघ
All Sports

आयपीएलमध्ये आणखी दोन संघ… बीसीसीआय होणार मालामाल

November 26, 2021
IPL 2021 postpone
All Sports

IPL 2021 postpone | आयपीएल स्थगित होण्याची प्रमुख कारणे

May 14, 2021

Read about MS Dhoni

  • All
  • MS Dhoni
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का
All Sports

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023
All Sports

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण
All Sports

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
All Sports

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags: delhi capitals vs kings xi punjabdelhi punjabdelhi vs punjabDelhi vs punjab in IPL 2020IPL 2020आयपीएल सामनाइंडियन प्रीमियर लीगदिल्ली विरुद्ध पंजाबदिल्लीचं पारडं जड
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
IPL RR vs CSK | राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान

IPL RR vs CSK | राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

LEGAL

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!