All SportsIPL

IPL countdown | आजपासून आयपीएलचा थरार…

 

आजपासून आयपीएलचा थरार…


Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]

रोना महामारीच्या संकटकाळात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आजपासून (19 सप्टेंबर 2020) आयपीएलचा जलसा रंगणार आहे. IPL countdown |

बायो बबलची कवचकुंडलं करोनापासून खेळाडूंचं कितपत संरक्षण करतील हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी यल्ला यल्ला आहे. (यल्ला हे संयुक्त अरब अमिरातीतील संगीत आणि नृत्य आहे)

संयुक्त अरब अमिरातीचं क्रिकेटशी नातं पूर्वीपासूनचं आहे. याच देशाने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर 90 च्या दशकात भारत आणि पाकिस्तानदरम्यान क्रिकेट स्पर्धा होत होत्या.

IPL countdown | दोन कोंबड्यांची झुंज लावून लब्धप्रतिष्ठित अरबी या सामन्यांचा आनंद लुटायचे. आता याच सात अमिरातींच्या देशात आयपीएलचा जलसा एक पर्वणीच ठरणार आहे.

यंदाच्या आयपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांचा जल्लोष नसणार. ना चौकार, षटकारांवर टाळ्यांचा, शिट्यांचा आवाज असेल, ना पराभवावर हुर्ये उडविणारे प्रेक्षक. तरीही ही स्पर्धा देखणी होईल, यात शंका नाही. कारण यजमान यूएई आहे.

यूएईत सर्वाधिक लोकसंख्या (30 टक्के) भारतीय आहे. अगदी संयुक्त अरब अमिरातीतल्या मूळ नागरिकांपेक्षा अधिक. त्या खालोखाल अमिरातीतल्या 12 टक्के नागरिकांचा क्रमांक लागतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे अरबांच्या या देशात आवाज फक्त क्रिकेटचाच असेल.

यंदाची आयपीएल उशिरानेच सुरू झाली. मात्र, महेंद्रसिंह धोनीचा संयमी स्वभाव, विराट कोहलीची आक्रमकता आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचं नक्कीच लक्ष असेल. गतविजेत्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना आता महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सशी आहे.

भारतात करोना महामारीने थैमान घातले आहे. आयपीएलच्या पूर्वसंध्येलाच चोवीस तासांत उच्चांकी 96 हजारांचा आकडा गाठला. त्यामुळेच ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत होत आहे. मात्र, मैदानावर प्रेक्षकांची उणीव प्रकर्षाने जाणवेल.

IPL countdown | अशा या संकटकाळात ना चित्रपटगृहांना लॉक आहे. बाहेर खेळणेही दुरापास्त झाले आहेत. मनोरंजनाची सगळी साधनंच हिरावून घेतल्याने भारतीयांसाठी आयपीएलची मेजवानी विशेष असेल.

या संकटकाळात आव्हान असेल तर ते संसर्गापासून बचावाचे. सामाजिक अंतर राखण्याबरोबरच आरोग्य जपण्यासाठी खेळाडूंना काही प्रोटोकॉलही पाळावे लागणार आहेत. अर्थात, एव्हाना हे सगळे नियम सर्वांच्याच अगंवळणी पडले आहेत.

आयपीएलच्या 53 दिवसांच्या या जलशात चेन्नई सुपर किंग्स, कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, रोहितचा मुंबई इंडियन्स, केएल राहुलचा किंग्स इलेव्हन पंजाब आणि श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स रंग भरतील.

विदेशात आयपीएल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, वेगळेपण हेच आहे, की जैवसुरक्षेच्या वातावरणात विदेशी भूमीत होणारी ही पहिली आयपीएल असेल.

षटकारांचा बादशाह ख्रिस गेल आणि गेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा लुटणारा डेव्हिड वॉर्नर यांची फलंदाजीतली आतषबाजी टीव्हीवर पाहण्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींनी नक्कीच लागली असेल.

IPL countdown | तेरे नाम से शुरू तेरे नाम से खतम इतकं पराकोटीचं क्रिकेटप्रेम असलेल्या भारतीयांना मैदान डोक्यावर घेता येणार नसलं तरी किमान घरबसल्या स्पर्धा पाहायला मिळते हेही नसे थोडके.

आयपीएल संघांतील ताकदीचा अंदाज घेतला मुंबईचा संघ सध्या तरी मजबूत स्थितीत आहे. किमान कागदावर तरी. संघात रोहितसह हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, किरोन पोलार्ड आणि ‘डेथ ओवर्सचा बादशाह’ जसप्रीत बुमराह ही दिग्गज मंडळी या संघाची पोलादी भिंत आहे.

चेन्नई सुपकिंग्सचा दरारा तुलनेने कमीच आहे. या संघाला म्हाताऱ्यांचा संघ संबोधत असले तरी तो कडवा आव्हानवीर आहे. यश आणि प्रतिभेला वयाचं बंधन मान्य नसतं. संघात शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसी आणि रवींद्र जडेजाने नेहमीच संघाचा डोलारा हिमतीने सांभाळला आहे. आताही ते आपलं शंभर टक्के कौशल्य पणाला लावतील यात शंका नाही.

कोहलीच्या आक्रमकतेला सांघिक शक्तीची जोड मिळायला हवी. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूची धुरा खांद्यावर वाहताना आयपीएल किताबाची उणीव विराटला नक्कीच जाणवत असेल. अॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस आणि देवदत्त पडिक्कलमुळे संघ मजबूत झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्स गेल्या वर्षी लयीत होता. ही लय यंदाही कायम राखली तर हा संघही किताबाच्या लढतीत कडवा प्रतिस्पर्धी ठरू शकेल. श्रेयस अय्यरसारखा उत्तम कर्णधार, पृथ्वी साव आणि ऋषभ पंतसारखे प्रतिभाशाली फलंदाज या संघात आहेत. याशिवाय रविचंद्रन अश्विनसारखा अनुभवी गोलंदाजही संघाचा महत्त्वाचा आधार आहे.

आयपीएलमुळे केएल राहुलसाठी नवे दरवाजे उघडतील. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने उत्तम कामगिरी केली तर भविष्यात राहुल भारतीय संघाच्या संभाव्य कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवू शकतो. ग्लेन मॅक्सवेल, गेल आणि मोहम्मद शमीसारख्या स्टार खेळाडूंना तो कसा सांभाळतो, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

सनरायझर्स हैदराबाद पुन्हा अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असेल. कारण डेव्हिड वॉर्नर या संघाचा कर्णधार आहे. त्याच्याकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. जॉनी बेयरस्टॉची आक्रमकता, केन विल्यमसनचा ‘कूलनेस’ आणि राशीद खानच्या फिरकीची जादू हे या संघातील वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी 2014 मध्ये आयपीएलचे काही सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाले होते. त्या वेळी आयपीएलचे विजेतेपद कोलकाता नाइट रायडर्सने जिंकले होते. बेन स्टोक्स, आंद्रे रसेल आक्रमक फलंदाज याच संघात आहेत. या फलंदाजांनी गेल्या मोसमात 52 षटकारांची आतषबाजी केली होती.

19 वर्षांखालील वर्ल्डकपचा धुरंधर फलंदाज शुभमन गिल, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी ही तरुण फळी कोलकात्याला आणखी मजबूत करते. अर्थात त्यांना दिशा देण्यासाठी इयॉन मॉर्गनसारखा अनुभवी कर्णधार आहे.

राजस्थान रॉयल्सची संपूर्ण मदार विदेशी खेळाडूंवर असेल. जोस बटलर, स्टीव स्मिथ आणि जोफ्रा आर्चर हे या संघातील आघाडीचे खेळाडू. वडिलांची तब्येत बिघडल्याने स्टोक्स न्यूजीलंडमध्ये आहे आणि तो खेळेल किंवा नाही, याबाबत शंकाच आहे.

सलामीच्या सामन्यात मुंबईचंच पारडं जड आहे. रोहित, क्विंटोन डिकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, पंड्या बंधू, किरोन पोलार्ड यांच्यामुळे फलंदाजी खोलवर आहे. ट्रेंट बोल्ट आणि नाथन कूल्टर नाइल गोलंदाजीची धुरा समर्थपणे पेलू शकतील.

चेन्नई संघातही फारसे बदल नाहीत. मात्र, धोनीचा सर्वांत विश्वासू सुरेश रैना यंदा खेळणार नाही. त्याच्या जागी आलेला ऋतुराज गायकवाडही उपलब्ध होऊ शकणार नाही. कारण तब्बल पाच वेळा तो करोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, चेन्नईकडे वॉटसन, अंबाती रायुडू, केदार जाधव, रवींद्र जडेजा आणि ब्राव्होसारखे सामना जिंकून देणारे लढावू खेळाडू आहेत. मिशेल सेंटनेर आणि लुंगी एंगिडीही संघात येण्यास उत्सुक आहेत.

[jnews_block_22 first_title=”Read more” include_category=”87″]

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!