Your Content Goes Here
Your Content Goes Here
इगा स्वियातेकची ऐतिहासिक कामगिरी
10/10/2020
पॅरिस | पोलंडची 19 वर्षीय टेनिसपटू इगा स्वियातेकने Iga Swiatek | 10 ऑक्टोबर 2020 रोजी ऐतिहासिक कामगिरी केली. तिने अमेरिकेच्या चौथ्या मानांकित सोफिया केनिनला पराभूत करीत फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम किताबावर French Open 2020 | नाव कोरले. स्वियातेकने केनिनचा 6-4, 6-1 असा पराभव केला.
स्वियातेक पोलंडची पहिलीच टेनिसपटू ठरली आहे, जिने फ्रेंच ओपनचा ग्रँडस्लॅम किताब जिंकला. स्वियातेकने गुरुवारी उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या नादिया पोदारोस्काचा 6-2, 6-1 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
मी खूप आनंदी आहे. मी आनंदी आहे, कारण माझ्या कुटुंबाने स्पर्धेला हजेरी लावली. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
– इगा स्वियातेक
टेनिसच्या इतिहासात स्वियातेक ही पहिलीच खेळाडू आहे, जिने जागतिक क्रमवारीत तळातले स्थान असताना रोलां गॅरोच्या कोर्टवर अंतिम फेरीत धडक मारली. डब्लूटीए कम्प्युटर रँकिंगला 1975 नंतर सुरुवात झाली आहे. स्वियातेकची रँकिंग 54 आहे. टेनिस ओपनविश्वातली ती सातवी बिगरमानांकित खेळाडू आहे, जिने फ्रेंच ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरी गाठल्यानंतर स्वियातेक म्हणाली, ‘माझ्यासाठी हे अविश्वसनीय आहे. मला माहीत आहे, की मी छान टेनिस खेळते. मात्र किताब जिंकणे माझ्यासाठी चकित करणारी बाब आहे. मी कधीच विचार केला नव्हता, की मी अंतिम फेरी गाठेन.’
स्वियातेकचा ही फक्त सातवी महत्त्वाची स्पर्धा आहे, ज्यात ती चौथ्या फेरीच्या पुढे कधीच गेली नाही. ग्रँडस्लॅम किताब जिंकणारी ती दुसरीच बिगरमानांकित खेळाडू ठरली आहे. यापूर्वी 2007 मध्ये जस्टिन हेनिनने अशी कामगिरी केली होती.
फ्रेंच ओपनमध्ये तिने एकूण सात सामने खेळले असून, यात तिने फक्त 28 गेम गमावले आहेत. फ्रेंच ओपनचा किताब जिंकणारी टिनएजर (19 वर्षापर्यंत वय असलेले) खेळाडूंमध्येही ती दुसरीच खेळाडू आहे. यापूर्वी 1997 मध्ये इवा माजोलीने अशी कामगिरी केली होती.
फ्रेंच ओपन स्पर्धेत विजेतेपदापर्यंतचा प्रवास स्वियातेकसाठी सोपा मुळीच नव्हता. तिने 2018 ची विजेती सिमोना हालेप आणि 2019 ची उपविजेती मार्केटा वेंद्रोसोवाचे आव्हान एकतर्फी मोडीत काढले होते.
अमेरिकेची 21 वर्षीय केनिनने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. मात्र फ्रेंच ओपनचा किताब जिंकण्याचे तिचे मनसुबे स्वियातेकने धुळीस मिळवले.
Read more at :
टेनिसपटू फॅबिओ फोगिनीनी करोना पॉझिटिव्ह | Fabio Fognini coronavirus positive
Fabio Fognini coronavirus positive टेनिसपटू फॅबिओ फोगिनीनी करोना पॉझिटिव्ह सरडिनिया ओपनचा अव्वल मानांकित फॅबिओ फोगिनी Fabio Fognini...
लाल बादशाह | Rafael Nadal Won The French Open 2020 |
Your Content Goes Here Your Content Goes Here लाल बादशाह FOLLOW US पॅरिस | राफेल नदालला लाल मातीतला...
Iga Swiatek wins French Open 2020 | इगा स्वियातेकची ऐतिहासिक कामगिरी
Your Content Goes Here Your Content Goes Here इगा स्वियातेकची ऐतिहासिक कामगिरी 10/10/2020 पॅरिस | पोलंडची 19 वर्षीय टेनिसपटू इगा...
Nadal vs Djokovic final in French open 2020 | एकच प्रश्न- नदाल की जोकोविच?
एकच प्रश्न- नदाल की जोकोविच? Follow us पॅरिस | जगातील अव्वल नंबरचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने ग्रीसच्या...
Your Content Goes Here