Your Content Goes Here
Your Content Goes Here
लाल बादशाह
FOLLOW US
पॅरिस | राफेल नदालला लाल मातीतला बादशाह का म्हणतात याचा प्रत्यय रोलां गॅरोच्या कोर्टवर पाहायला मिळाला. स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने Rafael Nadal | अव्वल मानांकित नोवाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करीत फ्रेंच ओपनचे French Open 2020 | विजेतेपद मिळवले.
रोलांगॅरोच्या कोर्टवर रविवार, 11 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचचे आव्हान 6-0, 6-2, 7-5 असे सरळ सेटमध्ये मोडीत काढले.
Rafael Nadal Won The French Open 2020
फ्रेंच ओपनमध्ये नदालचे हे 13 वे विजेतेपद आहे. हा एक विक्रम French open record | असून, अद्याप त्याच्या जवळपास एकही खेळाडू नाही. या विजेतेपदाबरोबरच पुरुष एकेरीत नदालचे हे 20 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्याने रॉजर फेडररच्या Roger Faderar | विक्रमी 20 ग्रँडस्लॅमच्या विजेतेपदांशी बरोबरी साधली आहे.
नदालने सुरुवातीपासूनच जोकोविचवर दबाव राखला. सुरुवातीचे दोन्ही सेट आरामात खिशात घालत नदालने जोकोविचला Novak Djokovic | निष्प्रभ केले. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने क़डवी झुंज दिली. मात्र, नदालने त्याला पुनरागमन करण्याची अजिबात संधी दिली नाही. जोकोविचच्या कडव्या लढतीमुळे हा सामना थोडा लांबला.
अखेर स्पेनच्या दिग्गज खेळाडूने दोन तास आणि 41 मिनिटांच्या लढतीनंतर जोकोविचवर विजय मिळवला. कारकिर्दीतले 18 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे जोकोविचचे मनसुबे मात्र नदालने साफ धुळीस मिळवले.
विजयानंतर लाल मातीतल्या कोर्टवरच गुडघ्यावर बसत नदाल मोकळेपणे हसला आणि हवेतच हात हलवत आपला आनंद व्यक्त केला.
जोकोविचसाठी निराशाजनक वर्ष
जोकोविचसाठी तसे निराशाजनकच गेले. फ्रेंच ओपनमधला पराभव हा यंदाच्या वर्षातला जोकोविचचा पहिला पराभव आहे. यापूर्वी त्याला यूएस ओपन जिंकण्याची नामी संधी होती. नदालसह अनेक दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेतून अंग काढून घेतले होते.
मात्र, एका चुकीमुळे त्याला न खेळतात मैदान सोडावे लागले. या स्पर्धेतून त्याला लढत अर्ध्यावरच सोडून जाण्याची शिक्षा मिळाली. संतापावरील नियंत्रण गमावल्याने त्याने मारलेला चेंडू लाइन जजला लागला.
या चुकीमुळे त्याने माफीही मागितली होती. तत्पूर्वी त्याला करोनाचाही संसर्ग झाल्याने काही दिवस विलगीकरणात काढावी लागली. आता फ्रेंच ओपनमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अव्वल मानांकित खेळाडूला यात एकही सेट जिंकता आला नाही.
फेडररच्या विक्रमाशी बरोबरी
राफेल नदालचे वैशिष्ट्य म्हणजे तो आतापर्यंत 14 वेळा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापैकी 13 लढती त्याने जिंकल्या आहेत, तर एकमेव लढत त्याने गमावली आहे.
नदालने फ्रेंच ओपन, यूएस ओपन, विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन हे चारही ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. जो हे चारही ग्रँडस्लॅम जिंकतो तो गोल्डन स्लॅमच्या पंक्तीत गणला जातो. अशी कामगिरी निवडक टेनिसपटूंनाच साधता आली आहे. यात नदालचाही समावेश आहे.
राफेल नदालने Rafael nadal | आपल्या कारकिर्दीत 13 वेळा फ्रेंच ओपनचे French Open 2020 | विजेतेपद मिळवले आहे. फ्रेंच ओपनचे विजेतेपद त्याने पहिल्यांदा 2005 मध्ये मिळवले होते.
त्यानंतर सलग तीन वेळा (2006, 2007, 2008) तो विजेता राहिला. 2009 मध्ये ही विजयाची परंपरा खंडित झाली असली तरी त्याची फ्रेंच ओपनवरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही.
नंतर पुढच्याच वर्ष सलग चार वेळा (2010, 2011, 2012, 2013, 2014) विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला. त्याला किंग ऑफ क्ले कोर्टचा बहुमान उगाच बहाल केलेला नाही.
Rafael Nadal Won The French Open 2020 | विजयाची मालिका इथेच थांबली नाही. त्यानंतर पुन्हा सलग चार वेळा ( 2017, 2018, 2019, 2020) तो जिंकला.
एकीकडे नदालची ही कामगिरी आहे, तर दुसरीकडे रॉजर फेडररला फ्रेंच ओपनमध्ये roger federer french open | आपली छाप सोडता आलेली नाही. त्याने फक्त एकदाच फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले आहे.
आपल्या विक्रमी 20 ग्रँडस्लॅममध्ये त्याने 8 वेळा विम्बल्डन, सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, पाच वेळा यूएस ओपनचे विजेतेपद जिंकले आहे. फेडररच्या या 20 ग्रँडस्लॅमची बरोबरी आज नदालने साधली. आता दोघांचीही 20 – 20 ग्रँडस्लॅम झाले आहेत.
Read more at :
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच
गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याने ज्या नोव्हाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियाने देशाच्या सीमारेषेवरूनच माघारी धाडले होते. त्याच जोकोविचने एक...
ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती
ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती मेलबर्न : बेलारूसच्या अरिना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिने 29 जानेवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन-2023...
वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण
वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण टेनिसविश्वात 2022 हे वर्ष सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि त्याचा कोरोना लसीकरण विरोध...
रॉजर फेडरर याचा तो अखेरचा सामना
रॉजर फेडरर याचा तो अखेरचा सामना... गेल्या आठवड्यातच (15 सप्टेंबर 2022) टेनिसचा राजा अर्थात रॉजर फेडरर याने निवृत्ती जाहीर केली...