All SportsTennis

Nadal vs Djokovic final in French open 2020 | एकच प्रश्न- नदाल की जोकोविच?

 

 

एकच प्रश्न- नदाल की जोकोविच?


Follow us

[jnews_footer_social social_icon=”rounded”]

पॅरिस | जगातील अव्वल नंबरचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासला पराभूत करीत फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली आहे.  आता अंतिम फेरीत त्याच्यासमोर क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदालचे कडवे आव्हान आहे. 

Nadal vs Djokovic final in French open 2020 | आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न असेल, तो म्हणजे कोन जिंकणार? नदाल की जोकोविच? 

जोकोविचला सिटसिपासने उपांत्य फेरीतील सामन्यात चांगलेच झुंजवले. तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या सामन्यात जोकोविचने स्टेफानोस सिटसिपासचा 6-3, 6-2, 5-7, 4-6, 6-1 असा पराभव केला.

फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचने रोलांगॅरोवर पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. विजयानंतर जोकोविच म्हणाला, ‘‘मी शांत राहिलो, पण आत बरीच उलथापालथ सुरू होती.’’ 

नदाल की जोकोविच?

यंदाच्या वर्षातला सर्वांत मोठा सामना फ्रेंच ओपनमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण लाल मातीतला बादशाह राफेल नदाल आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच आमनेसामने येणार आहेत. 

Nadal vs Djokovic final in French open 2020 | हे दोन्ही अव्वल खेळाडू एकमेकांशी 56 वा सामना खेळणार आहेत. यात जोकोविच २९ वेळा नदालविरुद्ध जिंकला आहे. 

जोकोविचने कारकिर्दीत एकूण 18 वेळा ग्रँडस्लॅमचे किताब जिंकले आहेत. ग्रँडस्लॅम स्पर्धेत दोघे १५ वेळा आमनेसामने आले आहेत. यात नदाल नऊ वेळा जिंकला आहे. 

Nadal vs Djokovic final in French open 2020 |  फ्रेंच ओपनचा विचार केला, तर दोघे सात वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी सहा वेळा नदाल जिंकला आहे.

नदालने उपांत्य फेरीत बारावा मानांकित दिएगो श्वार्त्जमन याचा 6-3, 6-3, 7-6 असा पराभव केला. नदालने जर जोकोविचला हरवले तर तो रॉजर फेडररच्या २० ग्रँडस्लॅमची बरोबरी करू शकेल. 

त्यामुळेच नदालसाठी ही वर्षातली सर्वांत महत्त्वाची स्पर्धा आहे. नदालला उपांत्य फेरीत तिसरा सेट जिंकताना थोडा त्रास झाला. 

जोकोविचचा विचार केला तर त्याला उपांत्य फेरीत सिटसिपासविरुद्ध दोन सेट गमवावे लागले होते. सिटसिपासने आधी दोन सेट गमावले होते. त्यानंतर त्याने जोरदार मुसंडी मारत सामना पाचव्या सेटपर्यंत खेचला. मात्र त्याला विजय मिळवता आला नाही. 

राफेल नदाल विरुद्ध नोवाक जोकोविच
56 वेळा आमनेसामने
29 सामने जिंकले जोकोविचने
27 सामने जिंकले नदालने
15 वेळा ग्रँडस्लॅममध्ये आमनेसामने
09 वेळा नदालचा विजय
06 वेळा जोकोविचचा विजय

नोवाक जोकोविच 

Novak-Djokovic

नंबर १

29-26 

राफेल नदाल

Rafael-Nadal

नंबर २

33 (22 मे 1987)  उम्र   34 (3 जून 1986)
बेलग्रेड, सर्बिया  जन्मस्थळ  मनाकौर, मेलोर्का, स्पेन
मौंटे कार्लो, मोनैको रहिवास मनाकौर, मेलोर्का, स्पेन
188 सेंमी  उंची  185 सेंमी
77 किलो  वजन  85 किलो
उजवा  खेळ  डावखुरा
दोन्ही हातांनी  बॅकहँड  दोन्ही हातांनी
924/188  जय/पराजय  992/201
81  एकूण किताब  85
[jnews_block_23 first_title=”Read more at ” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”65″]

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!