All SportsCricket

Who is the first cricketer to score a double century in 100th Test? | शंभराव्या कसोटीत द्विशतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू कोण?

शंभराव्या कसोटीत द्विशतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू कोण?

चेन्नई |

Who is the first cricketer to score a double century in 100th Test? |  कारकिर्दीत शंभराव्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी साकारण्याची कामगिरी आजपर्यंत कोणीही साकारू शकलेलं नव्हतं. अशी कामगिरी साकारली इंग्लंडच्या क्रिकेटपटूने, तीही भारताविरुद्ध. शंभराव्या कसोटीत द्विशतक ठोकणारा हा पहिला क्रिकेटपटू कोण? याचं उत्तर आहे जो रूट. Joe Root |

भारताविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रूट Joe Root | याने ही कामगिरी साकारली आहे. त्याचा हा कारकिर्दीतला शंभरावा कसोटी सामना होता.

तीस वर्षीय जो रूटने Joe Root | फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर लाँगऑनच्या वरून शानदार षटकार खेचत द्विशतक साजरे केले.

अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जो रूटच्या कामगिरीचे ट्विटरवर कौतुक करताना म्हंटले आहे, की कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 100 व्या सामन्यात द्विशतक ठोकणारा जो रूट हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. इंग्लंडच्या कर्णधाराची ही लाजवाब कामगिरी.

याआधी इंझमामकडे होता हा विक्रम!

यापूर्वी 100 व्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याच्या नावावर होता. इंझमामने भारताविरुद्ध 2005 मध्ये बेंगलुरुमध्ये 184 धावांची खेळी साकारली होती.

रूटने 377 चेंडूंमध्ये 218 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. अखेर हा द्विशतकी डाव डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम याने संपुष्टात आणला. त्याने रूटला पायचीत केले.

पाचवी द्विशतकी खेळी

रूटच्या Joe Root | कारकिर्दीतली ही पाचवी द्विशतकी खेळी आहे. याबरोबरच त्याने देशबंधू अॅलिस्टर कूक, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ आणि भारताचा राहुल द्रविड यांसारख्या पाच द्विशतकी खेळी साकारणाऱ्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

नववा शतकवीर

कारकिर्दीत २० वी शतकी खेळी साकारणारा रूट शंभराव्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा नववा फलंदाज ठरला आहे.

विजय हीच रूटसाठी यथायोग्य भेट

इंग्लंडचा उपकर्णधार बेन स्टोक्सने जो रूटला Joe Root | जगातला सर्वोत्तम फलंदाज आणि प्रेरणादायी कर्णधार म्हंटले आहे. या शंभराव्या कसोटीत रूटसाठी विजय हाच सर्वोत्तम उपहार असेल.

स्टोक्सनेच रूटला शंभराव्या कसोटी सामन्याची कॅप परिधान केली. तो म्हणाला, ‘‘मी पुढच्या पाच दिवसांत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात विजयासाठी कसोशीने प्रयत्न करीन. आम्ही सर्वच पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी आसुसलेलो आहोत. हीच जोसाठी सर्वोत्तम भेट ठरू शकेल.’’

रूटने द्विशतक झळकावत आपल्या शंभराव्या कसोटी सामना यादगार केला. स्टोक्सने ‘दि गार्डियन’मधील लेखात नमूद केले आहे, की ‘‘सामन्यापूर्वी कर्णधार जो रूटला शंभराव्या कसोटी सामन्याची कॅप बहाल करणे विशेष होते. हे सर्वोत्तम असे क्षण असतात, जे संपूर्ण कारकिर्दीत आपल्यासोबत असतात.’’

तो पुढे असंही म्हणाला, ‘‘लोकांसाठी तो शानदार खेळाडू आहेच, शिवाय जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आणि प्रेरणादायी कर्णधारही आहे. अर्थात, काही लोकांसाठी तो उदार आणि संवेदनशील व्यक्ती आहे आणि ‘शेफिल्ड’चा असा  नम्र माणूस आहे, जो क्रिकेटमध्ये चांगला आहे.’’

आपल्या पडत्या काळात रूटने कशी सोबत केली याच्याही आठवणींना उजाळा दिला. ब्रिस्टलमधील एका नाइट क्लबबाहेर झालेल्या हाणामारीनंतर स्टोक्सच्या कारकिर्दीला ओहोटी लागली होती.

स्टोक्स म्हणाला, ‘‘यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही, की तो कसा माणूस आहे? माझ्या कठीण काळात त्याने मला खूप साथ दिली. तो त्या वेळी माझा कर्णधार नाही, तर चांगला मित्र होता. माझ्या नजरेत त्याचा सन्मान कायम असेल.’’

खेळ आकड्यांचा

शंभराव्या कसोटीत द्विशतक ठोकणारा जो रूट हा पहिलाच फलंदाज ठरला.


५  रूटचे हे कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक ठरले. इंग्लंडकडून सर्वाधिक द्विशतके हॅमंड (७) यांच्या नावावर असून, त्या खालोखाल रूट आणि कूक (प्रत्येकी पाच) यांचा क्रमांक लागतो. कर्णधार म्हणूनच रूटचे हे तिसरे द्विशतक आहे.


२०१० या वर्षी पाहुण्या संघातील फलंदाजाने भारतात कसोटीत द्विशतक ठोकले होते. ब्रेंडन मॅकलमने हैदराबाद कसोटीत २२५ धावा केल्या होत्या. त्यानंतर रूटलाच अशी कामगिरी करता आली.


८,४६७  रूटच्या कसोटीतील धावा. इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने अॅलेक स्टुअर्टला (८४६३) मागे टाकले आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा कूकने (१२४७२) केल्या आहेत.


६४४  रूटने मागील तीन कसोटींत मिळून ६४४ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून रूटच्या आधी (सलग तीन कसोटींत) अशी कामगिरी केवळ हॅमंड (७७९) आणि ग्रॅहम गूच (७६३) यांनाच करता आली आहे.


२१८  रूटच्या धावा. ‘चेपॉक’वर पाहुण्या संघातील फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी ठरली. १९८६मध्ये डीन जोन्स यांनी २१० धावा केल्या होत्या. २० वर्षांनंतर प्रथमच या मैदानावर पाहुण्या संघातील फलंदाजाला द्विशतक ठोकता आले आहे.

[jnews_block_9 first_title=”READ MORE AT:” include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!