New Zealand cricketer John Reid passes away
सर्वांत ज्येष्ठ क्रिकेटपटू जॉन रीड यांचे निधन
न्यूझीलंडचे सर्वांत ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू जॉन रीड (John R Reid) यांचे 14 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.न्यूझीलंड क्रिकेटने (New Zealand Cricket) ही माहिती दिली.
पन्नास-साठच्या दशकातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून रीड यांचा लौकिक होता. त्यांनी 34 कसोटी सामन्यांमध्ये ते न्यूझीलंड क्रिकेट संघाचे कर्णधार होते.
न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट यांनी सांगितले, “न्यूझीलंडमधील प्रत्येक व्यक्तीच्या ओठावर जॉन रीड यांचं नाव होतं आणि पुढेही राहील.” न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या निवेदनात रीड यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही.
रीड यांचा जन्म ऑकलंडमध्ये झाला, तर शिक्षण वेलिंग्टनमध्ये झालं. त्यांनी 246 प्रथम श्रेणी सामन्यांत 41.35 च्या सरासरीने 16 हजार 128 धावा केल्या. यात 39 शतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही त्यांनी आपली छाप सोडली आहे. त्यांनी 22.60 च्या सरासरीने 466 विकेट्स घेतल्या.
आक्रमक फलंदाज आणि वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाणारे रीड यांनी वयाच्या 19 व्या वर्षी 1949 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ते 58 कसोटी सामने खेळले आणि 33.38 च्या सरासरीने 3,428 धावा केल्या.
cricketer John Reid passes away | कसोटीत रीड यांच्या नावावर सहा शतके आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1961 मध्ये बॉक्सिंग डे क्रिकेट सामन्यात त्यांनी 142 धावांची सर्वोच्च शतकी धावसंख्या रचली होती.
1965 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतरही त्यांनी न्यूझीलंड क्रिकेटमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. ते न्यूझीलंड क्रिकेटच्या निवड समितीतही होते. मॅनेजर, आयसीसीचे पंच म्हणूनही त्यांनी काम केले होते.
Read more also
कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!
गौतम गंभीर विराट कोहली याच्या पुढ्यात येतो आणि कोहलीला म्हणतो.. “काय बोलतोय बोल...” विराट कोहली : मी तुम्हाला काही बोललोच...
आयपीएल 2022 च्या मोसमासाठी खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी20 स्पर्धेसाठी 12 फेब्रुवारी 2022 रोजी सर्वांत मोठा लिलाव पार...
आयपीएल संघांतील मुख्य खेळाडू रिटेन करणार की कायम राहणार?
आयपीएलचे मुख्य खेळाडू बदलायचे की कायम ठेवायचे, हा प्रश्न फ्रँचायजींना भेडसावतोय. आयपीएल खेळाडूंच्या रिटेन कालमर्यादेपूर्वीच काही खेळाडूंबाबत फ्रँचायजींमध्ये ही द्विधा...
आयपीएलमध्ये आणखी दोन संघ… बीसीसीआय होणार मालामाल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणखी मालामाल होणार आहे. कारण आयपीएलमध्ये आणखी दोन संघ सहभागी होणार असून, या संघांचा सोमवारी...