All SportsCricket

निवड समितीच्या अध्यक्षपदाचा मिसबाहचा राजीनामा | Misbah-ul-Haq to step down as Pakistan’s chief selector

[jnews_block_18 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”77″]

Misbah-ul-Haq to step down as Pakistan’s chief selector

निवड समितीच्या अध्यक्षपदाचा
मिसबाहचा राजीनामा


पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीचे अध्यक्षपद Pakistan’s chief selector | आणि मुख्य प्रशिक्षकपद अशी दोन्ही महत्त्वाची पदे बाळगणाऱ्या मिसबाह-उल-हकने Misbah-ul-Haq  | निवड समितीचे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठीच मी निवड समितीच्या अध्यक्षपदाचा Pakistan’s chief selector | राजीनामा देत असल्याचे मिसबाह Misbah-ul-Haq  | याने सांगितले. तशी माहिती त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) दिली असल्याचेही त्याने बुधवारी, 14 ऑक्टोबर 2020 रोजी लाहोर येथे सांगितले.

गेल्या वर्षी सप्टेंबरपासून निवड समितीचे अध्यक्षपद आणि मुख्य प्रशिक्षकपद ही दोन्ही महत्त्वाची पदे मिसबाहकडेच होती. या दोन्ही पदांमुळे मिसबाहचा पाकिस्तान क्रिकेट संघावर एकछत्री अंमल होता. 

“झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी मी संघाची निवड करीन, पण त्यानंतर मी फक्त मुख्य प्रशिक्षकपदाच्या भूमिकेवरच लक्ष केंद्रित करणार आहे,” असे मिसबाह याने सांगितले. 

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मिसबाह म्हणाला, की मुख्य निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय माझा स्वतःचा आहे. बोर्डाच्या किंवा इतर कोणाच्या दबावाखाली मी राजीनामा देत नाही. 

तो म्हणाला, “हा सर्वस्वी माझाच निर्णय आहे. दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळणे सोपे नाही. राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मला सर्वोत्तम योगदान द्यायचे आहे.” 

“मुख्य निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्याची निवड केली जाईल, त्याला माझे संपूर्ण सहकार्य असेल आणि प्रत्येक प्रारूपात पाकिस्तान क्रिकेट संघाला पहिल्या तीनमध्ये आणण्याचा मी प्रयत्न करीन,” असेही मिसबाह म्हणाला. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान म्हणाले, की मिस्बाहने जो निर्णय घेतला त्याचा पीसीबीला आदर आहे. 

मिसबाहने जेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हाच परिस्थिती वेगळी होती. त्याने मुख्य निवड समितीचीही जबाबदारी घ्यावी, अशी आमची इच्छा होती,” असे खान म्हणाले. 

ते म्हणाले, “राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याने आपल्या प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन केले आणि केवळ संघाच्या जडणघडणीवर लक्ष केंद्रित करून तो संघाला पुढे नेईल, असा आम्हाला विश्वास आहे.” 

मुख्य निवड समितीच्या अध्यक्षपदाची लवकरच निवड केली जाणार आहे, असेही खान यांनी सांगितले. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने अलीकडेच सांगितले होते,  की, मुख्य निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आपण बोर्डाशी चर्चा करीत आहोत. मात्र, अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगून शोएब अख्तरच्या चर्चेचे वृत्त पीसीबीने फेटाळून लावले.

[jnews_block_34 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!