Tuesday, January 19, 2021
kheliyad
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

सिंधूला विश्व टूर फाइनल्समध्ये थेट प्रवेश नाही

करोना महामारीमुळे जागतिक बॅडमिंटन महासंघाने बदलले नियम

Mahesh Pathade by Mahesh Pathade
October 13, 2020
in All Sports, Badminton
0
BWF World Tour Finals : No automatic entry for PV Sindhu
Share on FacebookShare on Twitter

 

BWF World Tour Finals : No automatic entry for PV Sindhu

सिंधूला विश्व टूर फाइनल्समध्ये थेट प्रवेश नाही


भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूला PV Sindhu | विश्व टूर फायनल्समध्ये BWF World Tour Finals | आता थेट प्रवेश मिळणार नाही. कारण जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) यंदाच्या अखेरच्या वर्षात या स्पर्धेसाठी जागतिक विजेत्या खेळाडूला थेट प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

का बदलला नियम? 


बीडब्ल्यूएफच्या BWF | नियमानुसार विश्वविजेत्या खेळाडूला विश्व टूर फायनल्स या प्रतिष्ठित स्पर्धेत थेट प्रवेश दिला जातो. मात्र, यंदा असे होणार नाही. कोविड-19 महामारीमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांवर संक्रांत आली आहे. बॅडमिटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही व्यत्यय आला. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन महासंघाने यंदा नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. No automatic entry for PV Sindhu |

बीडब्ल्यूएफ विश्व टूर फाइनल्स 2020 स्पर्धा बँकॉकमध्ये होणार आहे. बीडब्ल्यूएफने 12 ऑक्टोबर 2020 रोजी ही माहिती दिली. बीडब्ल्यूएफने सांगितले, ‘‘नव्या नियमानुसार खेळाडूंना बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्स 2020 BWF World Tour Finals | साठी पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे या नियमानुसार विश्वविजेत्या सिंधूलाही थेट प्रवेश मिळणार नाही. केवळ विश्व टूर स्पर्धेत जिंकलेल्या गुणांच्या आधारावरच प्रवेश दिला जाईल.’’

भारताची स्टार खेळाडू सिंधूने गेल्या वर्षी विश्व बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. यंदा डेन्मार्कमध्ये तिला खेळण्याची उत्तम संधी होती. मात्र, करोना महामारीमुळे तिने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता तिला आशियाई स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. तरच तिला विश्व टूर फाइनल्समध्ये खेळता येईल.

सिंधूचं लक्ष्य ऑल इग्लंड आणि ऑलिम्पिक


सिंधू जर डेन्मार्क ओपन स्पर्धा खेळली असती तर कदाचित तिची विश्व टूर फाइनल्सची वाट आणखी सोपी झाली असती. सिंधूचे वील पी. व्ही. रमन्ना म्हणाले, ‘‘डेन्मार्क ओपनमध्ये न खेळण्याचा अजिबात खेद वाटत नाही. आता जर बीडब्ल्यूएफने नवे मानदंड आखले असतील तर सिंधू आशियाई स्पर्धेद्वारे आपली पात्रता सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. ती विश्वविजेी आहे आणि विश्व टूर फायनल्सची विजेतीही आहे. त्यामुळे तिचं प्रमुख लक्ष्य ऑल इंग्लैंड आणि ऑलिम्पिक आहे.’’

कोविड-19 महामारीमुळे विश्व टूर फाइनल्स एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. जागतिक बॅडमिंटनने ही स्पर्धा आता बँकॉकमध्ये 27 ते 31 जानेवारी 2021 दरम्यान होईल.

या स्पर्धेपूर्वी दो आशिया ओपन स्पर्धाही बँकॉकमध्येच होतील. या दोन्ही स्पर्धा 12 ते 17 आणि 19 ते 24 जानेवारी 20201 दरम्यान बँकॉकमध्ये होतील.

बीडब्ल्यूएफने सांगितले, ‘‘खेळाडूंना विश्व टूर फायनल्स 2020 मध्ये स्थान मिळविण्यासाठी यूरोपीय आणि आशियाई स्पर्धांत भाग घेण्याची गरज नाही. मात्र यंदाच्या सत्रातील अखेरच्या स्पर्धेत स्थान मिळवायचे असेल तर त्यांना दोन्ही आशिया ओपन स्पर्धांत सहभाग घेणे आवश्यक आहे.’’

सिंधूसाठी अवघड वाट


पी. व्ही. सिंधूने ऑगस्ट 2019 मध्ये बासेल येथे विश्वविजेतेपद मिळविले होते. गेल्या वर्षातली ही एकमेव स्पर्धा वगळता अन्य स्पर्धांत तिला फारशी छाप पाडता आलेली नाही. या स्पर्धेनंतर तिला सलग पराभव स्वीकारावे लागले आहेत. तिची कामगिरी ढासळली.

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या सिंधूने जुलै 2019 मध्ये झालेल्या इंडोनेशिया ओपन सुपर 750 स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर कोरिया ओपन आणि फुजोउ ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

त्यानंतर तिची कामगिरी सातत्याने खालावतच गेली. चायना ओपन, डेन्मार्क ओपन आणि हाँगकाँग ओपनमध्ये तिला दुसऱ्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. कोविड-19 महामारीमुळे ती एकही स्पर्धा खेळलेली नाही. अशा वेळी तिला पात्रता सिद्ध करण्यासाठी बरेच प्रयास करावे लागण्याची चिन्हे आहेत.

Read more at :

All Sports

Coronavirus : थबकले अवघे क्रीडाविश्व

October 21, 2020

Your Content Goes Here Your Content Goes Here करोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात हाहाकार माजवला असून, प्रत्येक देशाने निर्बंध लादत स्वतःला...

Read more
BWF World Tour Finals : No automatic entry for PV Sindhu
Badminton

P V Sindhu | बॅडमिंटनमधील प्रवाही ‘सिंधू’

August 12, 2020

बॅडमिंटनमधील प्रवाही सिंधू जिंकण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही. ती मात्र स्थितप्रज्ञ राहिली. यशाने हुरळून गेली नाही, की पराभवाने विचलितही...

Read more
Tags: BWF World Tour FinalsBWF World Tour Finals : No automatic entry for PV SindhuNo automatic entry for PV Sindhuपी. व्ही. सिंधूसिंधूचं लक्ष्यसिंधूला विश्व टूर फाइनल्समध्ये थेट प्रवेश नाही
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
cricketer-John-Reid-passes-away

सर्वांत ज्येष्ठ क्रिकेटपटू जॉन रीड यांचे निधन | cricketer John Reid passes away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

error: Content is protected !!