Athletics

अ‍ॅथलेटिक्स (athletics) क्रीडा प्रकारातील विविध घडामोडींची माहिती देणारे दालन. जगभरातील खेळाडूंच्या कामगिरीचा वेध घेणारे हे दालन असून, यात अ‍ॅथलेटिक्स खेळाचे प्रकार, तसेच इतिहास, खेळाडूंची कामगिरी आदी माहितीचा अंतर्भाव या कॅटेगरीत आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश होतो. या क्रीडा प्रकारांचे वेगवेगळे कौशल्य आहे. धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक अशा किती तरी क्रीडा प्रकारांचा समावेश अ‍ॅथलेटिक्समध्ये (athletics) येतो. या खेळांची माहिती बहुतांश मुलांना माहिती नाही. ही माहिती खेळियाडच्या पेजमध्ये तुम्हाला मिळेल. त्यासाठी आम्हाला लाइक जरूर करा. अ‍ॅथलेटिक्स (athletics) स्पर्धात्मक धावणे, उडी मारणे, फेकणे आणि चालण्याच्या स्पर्धांचा एक विशेष संग्रह आहे. अ‍ॅथलेटिक्स अंतर्गत सामान्यपणे ट्रँक अँड फिल्ड, रोड रनिंग, क्रॉस कंट्री रनिंग आणि रेस वॉकिंग स्पर्धांचा समावेश केला जातो. संघटनात्मक  अ‍ॅथलेटिक्स (athletics) स्पर्धांचे आयोजन इसवीसनपूर्व 776 मध्ये प्राचीन ऑलिम्पिक खेळांमध्ये होत आला आहे. त्यानंतर सर्वांत आधुनिक स्पर्धांचे आयोजन इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या (आयएएएफ) सदस्य क्लबद्वारे केला जातो. आधुनिक उन्हाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये आणि अन्य प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये जसे आयएएएफ जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आणि जागतिक इंडोअर स्पर्धेचा अ‍ॅथलेटिक्स अभिन्न अंग आहे. उन्हाळी पॅरालिम्पिक आणि आयपीसी जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत खेळाडू सहभाग घेतात. अ‍ॅथलेटिक्स (athletics) खेळाची सर्वोच्च संघटना इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अ‍ॅथलेटिक्स (athletics) फेडरेशन आहे. [WPSM_COLORBOX id=6392]

error: Content is protected !!