• Latest
  • Trending
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

August 27, 2022
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Thursday, March 30, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत 1967 मध्ये पहिल्यांदाच एक महिला धावली. ती होती कॅथरिन स्वित्झर. पुरुषप्रधान शर्यतीला तिने तडा दिला, त्याची ही कहाणी

Mahesh Pathade by Mahesh Pathade
August 27, 2022
in All Sports, Athletics, Inspirational Sport story
0
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत 1967 मध्ये पहिल्यांदाच एक महिला धावली. ती होती अमेरिकेची कॅथरिन स्वित्झर. या पुरुषप्रधान शर्यतीला कॅथरिनने जेव्हा तडा दिला तेव्हा जगभरात तिच्या या साहसाचे कौतुक झाले. मात्र त्यासाठी तिला किती यातना सोसाव्या लागल्या, त्याची ही कहाणी…. पुढे याच कॅथरिनने महिला धावपटूंसाठी चळवळ चालवली. त्याचं फलित म्हणजे ऑलिम्पिक मॅरेथॉनमध्ये महिलांना प्रवेश मिळाला. आज ही कॅथरिन कोणाला माहीत नसेल, पण तिने साठच्या दशकात दिलेला लढा मॅरेथॉनच्या इतिहासात अजरामर झाला. बोस्टन मॅरेथॉन शर्यतीत नेमके काय घडलं, याची कॅथरिन स्वित्झरनेच सांगितलेली कहाणी.

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झर
कॅथरिनला शर्यतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना जॉक सेम्पल. दुसऱ्या छायाचित्रात जॉकला धक्का देताना टॉम मिलर.

डिसेंबर 1966 चा तो काळ होता. रानटी बर्फवृष्टी सुरू होती आणि या बर्फवृष्टीतून कॅथरिन स्वित्झर (Kathrine Switzer) सहा मैलाचं अंतर धावत होती. त्या वेळी तिचा प्रशिक्षक अर्नी ब्रिग्स (Arnie Briggs) याच्याशी तिचे एका मुद्द्यावर भयंकर वाद झाले. हे शहर होते न्यूयॉर्कमधील सिराक्यूज, जेथे देवाने पहिल्यांदा बर्फाचा शोध लावला आणि कधीही हार मानली नाही. त्या वेळी कॅथरिन होती अवघ्या १९ वर्षांची. सिराक्यूज विद्यापीठात ती पत्रकारितेची विद्यार्थिनी होती. त्या वेळी महिला धावपटूंचा संघच अस्तित्वात नव्हता. तेथेच काय, सिराक्यूजमध्ये कुठेही नव्हता. त्यामुळे कॅथरिनने पुरुषांच्या क्रॉसकंट्री संघात अनौपचारिकपणे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी कॅथरिन पहिल्यांदा 50 वर्षीय अर्नी ब्रिग्स यांना भेटली. अर्नी खरं तर विद्यापीठाचा मेलमन. म्हणजे टपाल ने-आण करणारा. मात्र, तो १५ बोस्टन मॅरेथॉन खेळलेला अनुभवी खेळाडूही होता. कॅथरिनला पाहताच त्याला आश्चर्य वाटले. त्यांनी तिला हळुहळू मार्गदर्शन करीत आपल्या प्रशिक्षण ताफ्यात सामील केले. कॅथरिनचा तणाव दूर करण्यासाठी अर्नी सायंकाळी तिला बोस्टन मॅरेथॉनच्या गोष्टी सांगायचा. त्याची तो अनेकदा पुनरावृत्तीही करायचा. तिला त्याच्या त्या गोष्टी आवडायच्या. मात्र, एके रात्री ती अर्नीवर तडकली. म्हणाली, “बंद करा या बोस्टन मॅरेथॉनच्या गोष्टी आणि धावूया.”

“बोस्टन मॅरेथॉनमध्ये महिला धावू शकत नाहीत.” – अर्नी म्हणाला.

“का नाही? मी तर एका रात्रीत दहा मैलांचं अंतर धावते.” – कॅथरिन उत्तरली.

“नाजूक महिलांसाठी बोस्टन मॅरेथॉनचं अंतर खूपच जास्त आहे.” – अर्नी

कॅथरिनला हे अजिबात मान्य नव्हतं. ती म्हणाली, मग गेल्या एप्रिलमध्ये रॉबर्टा गिबने या स्पर्धेत उडी घेतली आणि ही शर्यत पूर्णही केली होती.

“छे छे… कोणतीही महिला बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत धावलेली नाही.” अर्नीने कॅथरिन स्वित्झर हिचे म्हणणे धुडकावले.

नंतर अर्नी कॅथरिन स्वित्झर हिला म्हणाला, “जर एखाद्या महिलेने हे अंतर पार केले असेल तर तूही करू शकतेस. मात्र, त्यासाठी तुला ते माझ्यासमोर सिद्ध करावं लागेल. जर तू सरावात हे अंतर धावू शकलीस, तर बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत तुला घेऊन जाणारा मी पहिला असेन.”

कॅथरिनने खिन्नपणे हलकेसे स्मित केले.

कॅथरिन स्वित्झर हिने विचार केला- आपल्याकडे प्रशिक्षक आहे, चांगला प्रशिक्षण भागीदार आहे, योजना आहे आणि ध्येय आहे आणि समोर जगातली सर्वांत मोठी शर्यत आहे- बोस्टन मॅरेथॉन.

बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेच्या तीन आठवड्यांपूर्वी अर्नी आणि कॅथरिन स्वित्झर 26 मैलांचं अंतर धावले. घरी आल्यानंतर कॅथरिनला ते खूपच सोपे वाटले. त्या वेळी कॅथरिननेच सुचवले, आपण यात आणखी पाच मैल धावायला हवे. म्हणजे या स्पर्धेत धावण्याचा आत्मविश्वास आणखी वाढेल.

अर्नीने कॅथरिनचा हा विचार लगेच मान्य केला. दोघेही नंतर 31 मैल धावले. इतके अंतर धावल्यानंतर ते राखाडी दिसू लागले. कॅथरिनला कोण आनंद झाला! 31 मैल धावल्याच्या आनंदात तिने अर्नीला मिठीच मारली. अर्नी मात्र थंड पडला. दुसऱ्या दिवशी अर्नी तिच्या वसतिगृहात आला. त्याला पाहताच कॅथरिन स्वित्झर हिने बोस्टन मॅरेथॉन स्पर्धा साइन करण्याचा आग्रह धरला.

अर्नी म्हणाला, “नोंदणी केल्याशिवाय तुझं धावणं चुकीचं ठरेल. शिवाय अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक युनियन आणि खेळाची प्रशासकीय संस्था यामुळे मी अडचणीत येऊ शकतो.”

कॅथरिन आणि अर्नी यांनी नियमांची पुस्तिका आणि प्रवेश अर्ज पाहिला. त्यात कुठेही लिंगाबद्दल उल्लेख नव्हता. कॅथरिनने अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक युनियनचा क्रमांक (AAU number) नमूद करीत 3 डॉलर प्रवेश शुल्क भरले. अर्जाच्या खाली कॅथरिनने स्वाक्षरी केली- के व्ही स्वित्झर. कॅथरिन नेहमी पूर्ण नाव लिहूनच स्वाक्षरी करते. असे नाव नमूद केल्याने पुरुष आहे की स्त्री हे कळणार नव्हतं. नंतर फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी युनिव्हर्सिटी इन्फर्मरीमध्ये कॅथरिन गेली. (आता पात्रता वेळ निश्चित केली जाते. मात्र, त्या वेळी मॅरेथॉनला पात्रता वेळेची आवश्यकता नव्हती.)

अर्नीने प्रवास परवाना घेतला नि प्रवेशाचा अर्ज टपालाने पाठविला. दोन आठवड्यांनी कॅथरिनच्या प्रियकराने आश्चर्याचा धक्का दिला. बिग टॉम मिलर म्हणून ओळखला जाणारा हा तिचा प्रियकर 235 पौंडाचा ऑल अमेरिकन फुटबॉलचा माजी खेळाडू आणि राष्ट्रीय मानांकित गोळाफेकपटू होता.

“जर एक मुलगी मॅरेथॉनमध्ये धावू शकते, तर मीही मॅरेथॉनमध्ये धावू शकतो,” असे सांगत बोस्टन मॅरेथॉनमध्ये उतरण्याचा निर्णय जाहीर केला. मी पुरुष असल्याने मला कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही, अशी पुस्तीही त्याने जोडली.

टॉम अधिकृत खेळाडू असल्याने त्याला नकार मिळण्याचा प्रश्नच नव्हता.

आता विद्यापीठाच्या क्रॉस कंट्री संघाचा जॉन लिओनार्डो यानेही स्पर्धेत उतरण्याचा निर्णय जाहीर केला. एकूणच कॅथरिन स्वित्झर आणि अर्नीकडे बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेचा सामना करण्यासाठी मजबूत क्रू (crew) तयार झाला होता.

बोस्टन मॅरेथॉनची तारीख होती 19 एप्रिल 1967. हा दिवस मॅसेच्युसेट्समध्ये राष्ट्रभक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

कॅथरिनच्या मते, मॅसेच्युसेट्समधील लोकांना अमेरिकन क्रांतीच्या पहिल्या लढाईत ब्रिटिशांशी लढलेल्या तरुण अमेरिकन देशभक्तांच्या स्मरणार्थ एक विशेष सुट्टी मिळाली. अथेन्समध्ये ऑलिम्पिकला संजीवनी मिळाल्यानंतर 1897 मध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा राष्ट्रभक्ती दिवसाचाच एक भाग बनली. त्या वेळी अथेन्स ऑलिम्पिकची महती नुकतीच कानी पडू लागली होती. कॅथरिन स्वित्झर हरखूनच गेली, की ही बोस्टन मॅरेथॉन तिच्यासाठी किती ऐतिहासिक ठरणार आहे! तिला कोणतीही कल्पना नव्हती, की या स्पर्धेतला सहभाग तिच्यासाठी किती ऐतिहासिक ठरणार आहे. बोस्टन मॅरेथॉनमध्ये काहीही सिद्ध करायचे नव्हते. ती फक्त एका लहानग्या मुलीसारखी उत्साहित होती, जी तिच्यासाठी पहिली मॅरेथॉन स्पर्धा होती.

अर्नीने मंगळवारी दुपारी जॉन, टॉम आणि कॅथरिनला सोबत घेतले आणि दुपारी तीनला बोस्टनच्या पाच तासांच्या प्रवासासाठी निघाले. तिघांना नॅटिक (Natick) शहरात एक मॉटेल सापडले. (मॉटेल म्हणजे मोटर आणि हॉटेल यांचा एकत्रित व्यवसाय). रात्रीचे जेवण उरकल्यानंतर रात्री दहा वाजता अर्नीने तिघांना मॅरेथॉनचा कोर्स सांगितला. त्या वेळी बाहेर कमालीची थंडी आणि पावसाची बरसात सुरू होती. हा कोर्स सांगताना अर्नी प्रचंड उत्साही होता. तो सांगायचा, इथं ना वेलेस्ली कॉलेज आहे, इथं अमूक आहे… वगैरे असे किती तरी लँडमार्क तो सांगायचा. कॅथरिनला तर खिडकीच्या काचेवर जमा झालेल्या दवबिंदूंमुळे बाहेर काहीही दिसत नव्हते. कॅथरिनला हा बोस्टन प्रवास जणू अनंतकाळाचा वाटत होता. त्यांची गाडी ताशी 40 किमीच्या वेगाने बोस्टनच्या दिशेने धावणार होती. त्या रात्री अर्नीने सांगितलेला बोस्टन मॅरेथॉन कोर्स कॅथरिन स्वित्झर हिच्यासाठी पहिलाच अनुभव होता. खरं तर हा प्रकार मनोबल खच्ची करणारा वाटला. तिला 26 मैलाचं अंतर खूपच लांब वाटलं…

कॅथरिनने तिच्या रूममधून व्हर्जिनियात आईवडिलांना फोन केला. तिने त्यांना समजून सांगितले, की मॅरेथॉन काय आहे, मी का बोस्टनला निघाले आणि माझ्यासाठी ही शर्यत पूर्ण करणे किती महत्त्वाचे आहे वगैरे वगैरे… कॅथरिन जर काळजीत असेल तर वडील तिच्याबाबत जागरूक असायचे. कॅथरिनने त्यांना शर्यतीबाबत सांगितले, तेव्हा ते म्हणाले, बाळा, तू हे करू शकशील. तू स्ट्राँग आहे. तू चांगली तयारी केली आहे. तू उत्तम करशील.” या वडिलांच्या या प्रोत्साहनाने कॅथरिनला आत्मविश्वास मिळाला. तिला याच प्रेरणाशब्दांची गरज होती. वडिलांना पूर्ण विश्वास होता, की कोणत्याही सरावाशिवाय कॅथरिन मोठी उडी घेणार नाही. मॅरेथॉनमध्ये कॅथरिनचा सहभाग त्यांच्यासाठी आश्चर्यकारक असला तरी ती शर्यत पूर्ण करील यात त्यांच्या मनात कोणताही किंतू-परंतु नव्हता. अर्थात, कॅथरिन त्यांना सगळंच काही समजावून सांगू शकली नाही. कारण मॅरेथॉनबाबत त्यांना माहिती नव्हती. यात काहीही घडू शकते. डायरियाही होऊ शकतो, कारच्या दरवाजाचाही धक्का बसू शकतो. अर्नीने एकदा तिला याची सगळी कल्पना दिली होती. खरं तर या सगळ्या गोष्टींची चिंता करून कॅथरिन थकली होती. त्यावर ती नियंत्रण मिळवू शकली नाही. कॅथरिनला सर्वाधिक चिंता सतावत होती साहसाची. कदाचित खरंच मला काही झालं तर मी धावण्याचं धाडस करू शकेन का? जर मी धावू शकले नाही तर मग खरोखर माझ्यातलं धैर्य खचेल.

बोस्टन मॅरेथॉन दुपारी सुरू होणार होती आणि ही कॅथरिन स्वित्झर हिच्यासह चौघांसाठी दिलासादायक बाब होती. कारण ते उशिरा झोपले आणि सकाळी नऊपर्यंत ते नाश्ताही करू शकले नव्हते.

भरपेट जेवल्यानंतर अर्नी म्हणाला, “आता आपल्याला भरपूर इंधनाची गरज आहे. कारण पल्ला लांबचा आहे आणि बाहेर प्रचंड थंडी आहे.”  अर्नी गंमत करीत नव्हता. हाडे गोठवणारा तो पाऊस, प्रचंड वेगाने वाहणारे वारे… त्यामुळे प्रत्येकाने अंडी, मांस, पॅनकेक, ज्यूस, कॉफी, मिल्क, अतिरिक्त टोस्ट खाल्ले.

तसं पाहिलं तर तिघांनाही अशा हवामानाची अजिबात चिंता नव्हती. कारण अशा वातावरणात पाच महिने त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. कॅथरिनला चिंता याचीच होती, की छानसे इस्त्री केलेले बरगंडी शॉर्ट्स आणि टॉपमध्ये तिला सुंदर ललना दिसायचे होते. चौघे आपापल्या रूममध्ये गेले. सामान बांधले. कॅथरिनने कानातले सोन्याचे झुमके, मेकअपचे सामान घेतले. तेवढ्यात टॉमने दारावर टकटक केले. दारात टॉम उभा होता. त्याने शौचालयाच्या मागून एक सॅनिटरी नॅपकिनची बॅग आणि एक मोठी सेफ्टी पिन हातात पकडलेली होती. “हे बघ, आम्ही ग्लव्हज मागून पिन करीत आहोत. यामुळे डेक्सट्रोजच्या (dextrose) गोळ्या योग्य प्रकारे पकडता येतात. तू चार गोळ्या घे. त्या बॅगच्या मध्यभागी ठेव. वरतून बंद करून त्या वरतून फोल्ड कर आणि ग्लव्हजवर पिन कर. जेव्हा तुला डेक्सट्रोज हव्या असतील, तेव्हा ते फोल्डिंग काढून घेता येतील.”

“तुला काय गरज आहे डेक्सट्रोजची?” -कॅथरिन

“ही साखर आहे ऊर्जेसाठी. तुला देऊ?” टॉमचं बोलणं कॅथरिनला मूर्खपणाचं वाटलं. कारण तिला हे माहितीच नव्हतं, की ब्रेडच्या तुकड्यापेक्षा साखर जास्त ऊर्जा देईल. बऱ्याचदा असे व्हायचे, की धावल्यानंतर भूक लागली वा थकवा आला तर कॅथरिनला कधीही साखरेची गरज वाटली नाही किंवा तिची ऊर्जेशी बरोबरी केली नाही. कॅथरिन टॉमला म्हणाली, “मला साखरेची गरज नाही. आम्हाला आधी कधी त्याची गरज भासली नाही.”

“तुला काय माहीत? आम्ही आधीच पिन केले आहे.” तो म्हणाला. कॅथरिनने खांदे उडवले. सर्वांत उत्तम म्हणजे कोणताही युक्तिवाद न करणे. कदाचित कॅथरिनला ते मूर्खपणाचे वाटलेही असेल, पण जेव्हा ती कारजवळ आली तेव्हा अर्नी आणि जॉन या दोघांनीही सॅनिटरी नॅपकिनची बॅग ग्लव्हजला पिन केलेली होती. कॅथरिनने मनाशीच म्हंटलं, वाह, काय हा संघ!

जेव्हा ते हॉपकिंटन हायस्कूलजवळ पोहोचले, तेव्हा बर्फवृष्टी सुरू झाली होती. एक संघ म्हणून आम्ही आधीच प्रवेश घेतलेला होता. त्यामुळे शर्यतीच्या आयोजकांजवळ कर्णधारासाठी आमची सगळी सामग्री एकत्र ठेवलेली होती. काही मिनिटांनंतर अर्नी लिफाफ्यासह आला. त्याच्या पाठीवर आणि पुढे क्रमांक लावलेले होते. एखाद्या कारच्या नंबरप्लेटसारखा तो भासत होता. सर्वांनी प्रिंट केलेली नावे पाहत एकमेकांकडे नाराजीनेच स्मित केलं. कॅथरिनने आपलं प्रिंटेड नाव पाहिलं. त्यावर नमूद केलेलं होतं- “के. स्वित्झर” आणि दुसऱ्या बाजूला नंबर होता “261.” कॅथरिनच्या मनात किंचितशी भीती आणि रोमांच या दोन्ही भावना डोकावल्या. या स्पर्धेत तब्बल 741 जणांनी भाग घेतला होता. ही एक भलीमोठी शर्यत होती.

कॅथरिनने तिचा क्रमांक बरगंडी टॉपऐवजी स्वेटशर्टवर पिन केला. तिने गरम स्वेटशर्टवरच संपूर्ण शर्यत पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. कॅथरिन खूश होती. याच स्वेटशर्टवर ती सिराक्यूजमध्ये अनेक मैल धावली होती. त्यामुळे स्वेटशर्ट तिचा खास मित्र बनला होता. बरगंडी टॉपवर धावून बोस्टनच्या रस्त्याच्या कडेला मरण्यापेक्षा स्वेटशर्टवर आणखी एक दिवस जिवंत राहू, अशी तिची भावना झाली. सर्वांनी वार्मअप सुरू केले. प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला वॉर्मअप करीत होते. प्रत्येकाने राखाडी स्वेटसूट परिधान केलेले होते. काहींनी हूडी, काहींनी त्यावर नायलॉन विंडब्रेकर्स, काहींचे पाय उघडे आणि काहींनी पँटवर शॉर्ट परिधान केलेले होते. घाम गाळण्याची ही पद्धत कॅथरिनला काही समजली नाही. ते सगळेच जणू टपोरीसारखे दिसत होते.

जसजसे धावपटू जॉगिंग करू लागले, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यांत खिन्नताच दिसली. शर्यतीआधीच काहींनी एकाग्रता गमावली. ते जेव्हा वॉर्मअप करायचे तेव्हा कॅथरिनला हसूच आले. होय, मी मुलगी आहे- मागे वळताना कॅथरिन मनाशी पुटपुटायची. सगळे कॅथरिनला पाहून चकित होते.

“तू संपूर्ण मार्ग धावणार आहेस?” “हे देवा, इथं एका मुलीला पाहून खूप छान वाटलं!” “माझ्या बायकोला धावण्यासाठी तू काही टिप्स देऊ शकशील का? मी तिला सुरुवात करू शकलो तर तिला आवडेल.” अर्नी हे ऐकत होता. तो म्हणाला, “या मुलीने मला संपूर्ण मैदानभर पळवलंय. तेही रोज.” अर्नी चमकत होता.

अर्नी म्हणाला, “बघ मी तुला म्हणालो होतो ना, तुझं बोस्टनमध्ये स्वागत होईल?”

कॅथरिन म्हणाली, “खरोखर, मला खूप स्वागत वाटलं. मला स्वतःचा अभिमान वाटतो. मला असं काही माहीत होतं, जे इतर महिलांना माहीत नव्हतं. मला माझ्यात विशेष चमक जाणवतेय.”

जॉगिंग करीत असताना टॉम म्हणाला, “अरे बापरे, तू लिपस्टिक लावली आहेस.”

“मी नेहमीच लिपस्टिक लावते. गैर काय त्यात?” – कॅथरिन

“कोणी तरी पाहील तुला, की तू मुलगी आहेस. ते तुला धावू देणार नाही. लिपस्टिक पुसून टाक.” – टॉम

“मी लिपस्टिक काढणार नाही.” – कॅथरिन

आम्ही मैदानावर पोहोचलो. वेगवेगळ्या वेशभूषेत धावपटू दिसत होते. बोस्टन अ‍ॅथलेटिक संघटनेचे अधिकारी आले. लेपलवर निळी रेबिन असलेले लाँग ओव्हरकोट त्यांनी परिधान केलेले होते. डोक्यावर हॅट आणि त्यांच्या हातात क्लिपबोर्ड होते. प्रत्येक जण भिजलेला होता. त्यांच्या हॅटवर बर्फ जमा झालेला होता.

धावपटू जसजसे गेटमधून पुढे येत होते, तसतसे अधिकारी त्यांचे बिब क्रमांक तपासत होते. कॅथरिन आली, बिब क्रमांक व्यवस्थित दिसावा म्हणून तिने स्वेटशर्ट पुढे ताणत तो दाखवला. अधिकारी म्हणाला, चला पुढे चालत राहा.

कॅथरिन मैदानाच्या बाजूला आली, तेवढ्यात अर्नी म्हणाला, “मी म्हणालो होतो ना, काही अडचण नाही.”

कॅथरिनच्या आजूबाजूचे सर्व पुरुष एका महिलेच्या उपस्थितीने खूश दिसत होते.

स्वतःची उपस्थिती कमीत कमी जाणवेल अशा पद्धतीने कॅथरिन वावरण्याचा प्रयत्न करीत होती. तिला विश्वास वाटला, की या क्षणी कोणीही लक्ष देण्याचा प्रयत्न करीत नव्हता. मात्र, कॅथरिनने मिसळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका धावपटूने पत्नीला दुसऱ्या बाजूला करीत कॅथरिनसोबत फोटो घेण्यावर जोर दिला. गर्दी शांत झाली. कोणी तरी समोरून घोषणा करीत असावा. आम्ही एकमेकांच्या जवळ होतो आणि लिनिमेंटचा (वेदनेवर लावण्याचे तेल) उग्र वास आल्याने कॅथनरिनचे डोळे विस्फारले…

बोस्टन नेहमीच धावपटूंची पंढरी होती. आता कॅथरिनही या पंढरीची एक वारकरी झाली होती. अर्नीसोबत अनेक महिने प्रशिक्षण घेतले होते. इथं येण्याचे त्यांनी स्वप्न पाहिल्यानेच ते शर्यतीपर्यंत पोहोचले होते. एक रनिंग इव्हेंटपेक्षा कॅथरिन इथं घरासारखं वातावरण अनुभवत होती.

सुरुवातीचे काही मैल प्रत्येक मॅरेथॉनमध्ये मजेदार असतात. धावणे सोपे आहे, गर्दीतला आवाज रोमांचक आहे आणि सहकारी बोलकी आणि प्रेमळ आहेत. तुम्हाला ही जाणीव आहे, की पुढे हे सगळं दुखापती देणारं आहे. म्हणून आता या क्षणाचा आनंद लुटा. अर्नी आणि टॉम कॅथरिनसोबत अर्थात एका मुलीसोबत धावत होते. सर्वांनी सकारात्मक प्रोत्साहनामुळे असं लक्ष दिलं, जे यापूर्वी त्यांनी कधीही दिलं नव्हतं. टॉम छाती काढून पळत होता आणि अर्नीही उड्या मारत होता. ते पाहून कॅथरिनला छान वाटलं.

जवळपास चार मैलांनंतर हॉर्न वाजला. कोणीतरी ओरडत होतं, “धावपटूंनो, आपल्या उजव्या बाजूने जा.” एका मोठ्या ट्रकमुळे सर्वांना रस्त्याच्या कडेला जावे लागले. त्यामुळे धावपटूंमध्ये काहीशी चुळबूळ होती. काहींनी शिव्याही हासडल्या. तो फोटो प्रेस ट्रक होता. तो ट्रक आमच्या समोर हळू झाला आणि छायाचित्रकारांनी धावपटूंची छायाचित्रे घेतली. शर्यतीत एक महिला पाहून छायाचित्रकारांमध्ये विशेष उत्साह दिसला. कॅथरिनने त्यांना आपला क्रमांक व नाव दाखवण्यासाठी लडखडली. कॅथरिनसह सर्वच हसू लागले. हा तिच्यासाठी “हाय-मॉम-ऑन-दि-नाइटली-न्यूज” क्षण होता. तो खूपच मजेदार होता.

ओव्हरकोट व हॅट परिधान केलेला एक माणूस रस्त्याच्या मधोमध कॅथरिनकडे बोट हलवत उभा होता. कॅथरिन येत असताना तो पुढे आला. तिचे हात पकडत असताना त्याच्या हातात कॅथरिनचे ग्लव्हज निघाले. कॅथरिनने अडखळत पाऊल टाकले. सर्वांनाच त्याच्या आजूबाजूने धावावे लागले. जेव्हा कॅथरिन जवळून गेली तेव्हा तिचे त्याच्या लेपलवर एका निळ्या आणि सोनेरी बीएए रेबिनकडे लक्ष गेलं. तो कुठून आला होता?

काही क्षणानंतर कॅथरिनला आपल्या मागे वेगाने चामड्याचे बूट खरचटण्याचा आवाज ऐकू आला. रबरी तळव्यांनी धावताना बुटांचा अनोळखी, धोकादायक तो आवाज होता. जेव्हा धावपटूच्या कानावर असा आवाज पडतो, तेव्हा नक्कीच काही तरी धोक्याची सूचना असते. जसे फूटपाथवर कुत्र्याच्या पंजांचा आवाज असतो तसा तो तिला जाणवला. सहज म्हणून कॅथरिनने मान वळवली तेव्हा ती भेदरलीच. एक आडदांड माणूस दात विचकत अंगावर धावून येत होता. काही प्रतिकार करण्यापूर्वीच त्याने कॅथरिनचा खांदा पकडला. तिच्यावर खेकसत म्हणाला, “माझ्या शर्यतीतून बाहेर नीघ आणि मला ते क्रमांक दे. ” नंतर त्याने तिच्यावर जोराने प्रहार केला. तो तिचा बिब क्रमांक फाडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, कॅथरिन पटकन मागे झाल्याने बिब क्रमांक त्याच्या हाती लागला नाही. या प्रकाराने कॅथरिन घाबरली. तिची पँट थोडीशी ओली झाली. तिने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या माणसाच्या हाती तिच्या शर्टाचा काही भाग होते आणि तिच्या पाठीवरील बिब क्रमांक ओढण्याचा तो प्रयत्न करीत होता. कॅथरिन विव्हळत होती. त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार तिच्या डोक्यात नव्हता. तेवढ्यात अर्नी तेथे आला नि त्याने त्याच्यावर प्रहार करीत त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. तिला “एकटे सोड, जॉक. मी तिला प्रशिक्षण दिलं आहे. ती ठीक आहे. तिला एकटं सोड.” तो माणूस ओरडला, “हिच्यापासून लांब राहा, अर्नी.” असे म्हणत त्याने अर्नीला झुरळासारखे बाजूला फेकले.

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झर
कॅथरिन स्वित्झर हिला जोराचा धक्का देताना जॉक सेम्पल.

अर्नी त्या वेड्या माणसाला ओळखत होता. एक कॅमेरामन काही तरी ओरडत होता. तो काय म्हणतोय हे कॅथरिनला काही समजत नव्हते. कॅथरिनची बॉटम पोटावरून खाली घसरत होती. असा अपमानास्पद आणि भीतिदायक प्रसंग तिने यापूर्वी कधीही अनभुवला नव्हता. तिला बालपणीही असं कुणी मारलं नव्हतं. मात्र, या हल्ल्याने ती अचंबित होती. ती पळून जाण्यास असमर्थ होती. त्या माणसाने, जॉकने तिचा शर्ट पकडलेला होता. अचानक जॉकवर प्रहार झाला. तो बिग टॉमचा प्रहार होता. नारिंगी सिराक्यूज स्वेटशर्टमध्ये टॉम जॉकवर तुटून पडला. टॉमच्या दणक्याने जॉक हवेतच उडाला. सुरकुत्या पडलेल्या कपड्यांचा ढीग पडावा, तसा जॉक रस्त्याच्या कडेला पडला. कॅथरिनला आता भीती वाटत होती. आपण जॉकला मारला. भलेही टॉमने त्याला मारलं असेल, पण ही चूक माझी आहे. बापरे, आता आपल्याला जेलची हवा खावी लागणार. कॅथरिनला वेगळ्याच भीतीने ग्रासले होते. नंतर तिने अर्नीचाही भीतियुक्त चेहरा पाहिला. त्याच्या डोळ्यांच्या वर पट्टी बांधली. तो ओरडला, “नरकासारखं पळा.” सगळे पळत सुटले. घरातून मुलांनी धूम ठोकावी तसे ते पळत सुटले.

या घटनेने कॅथरिन स्तब्ध होती. शारीरिक हिंसा तिला माहीत नव्हती. मात्र, त्या घटनेनंतर तिने पहिल्यांदा तो प्रसंग अनुभवला. तिला धक्का या गोष्टीचा होता, की एक मजबूत महिलेच्या रूपाने ती त्या प्रसंगात किती हतबल होती. टॉम नेमक्या वेळी तिथे आला. मात्र, त्याने वाचवले म्हणून मी त्याचे आभारी नव्हते. तिला मनाने आजारी असल्याचे जाणवत होते. ती भयंकर घटना होती. कदाचित तेथे टॉम नसता तर तीही तेथे नसती.

प्रत्येक जण ओरडत होते. ट्रकमध्ये बसलेले पत्रकार ओरडताना कॅथरिन ऐकत होती. “तिच्या मागे चला, तिच्या मागे चला.” चालकाने वेग वाढवला.

या घटनेनंतर प्रत्येक जण शिव्याशाप देत होता. यात अर्नी सर्वांत पुढे होता. टॉम तर भयंकर संताप व्यक्त करीत होता.  जॉन त्रासलेला वाटला. कॅथरिनाला वाटलं, की हे सगळे जॉक सेम्पल याला गंभीर जखमी करतील. त्यामुळे इथच थांबून हे प्रकरण सोडवलं पाहिजे. मात्र, एक गोष्ट नक्की होती, की जॉक कोणता तरी अधिकारी होता. नंतर कळलं, की तो रेस मॅनेजर होता. आता तो सावध आहे आणि कॅथरिन, अर्नी, टॉम कठीण स्थितीत आहेत. तिघांनाही अटक होऊ शकेल. कॅथरिन तर खूपच घाबरलेली होती, शिवाय ती अपमानितही झाली होती. या घटनेनंतर कॅथरिनने विचार केला, की आपण शर्यतीतून बाहेर व्हायला हवं. या प्रतिष्ठित स्पर्धेला गालबोट लावण्यात काही अर्थ नाही. मात्र, हे विचार काही क्षणापुरतेच ठरले. कॅथरिनला हेही माहीत होतं, की जर शर्यत अर्ध्यावरच सोडली तर कोणालाही विश्वास होणार नाही, की महिला 26 मैलांपेक्षा अधिक धावण्याची क्षमता आहे. जर ही शर्यत अर्ध्यावरच सोडली तर प्रत्येक जण हेच म्हणेल, की हा तर पब्लिसिटी स्टंट होता. कॅथरिनच्या मागे हटण्यामुळे महिला क्रीडाविश्व पुढे जाण्यापेक्षा मागे जाईल. तिला पुन्हा कधीही बोस्टनमध्ये धावता येणार नव्हतं. जॉक सेम्पल आणि त्याच्यासारखे किती तरी लोक विजयी ठरले असते. इथं कॅथरिनची भीती आणि अपमान संतापात परावर्तित झाला.

काही वेळाने प्रेस ट्रकने तिघांनाही गाठलं आणि त्यांच्यापासून तीन फूट अंतरावर ड्रोनिंग इंजिन घिरट्या घालू लागलं. पत्रकारांनी मागून आणि रस्त्याच्या कडेने आक्रमक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. छायाचित्रकार तर या तिघांची छबी टिपण्यासाठी जवळच उभे होते. त्यांचे स्वर आता बदलले होते. आता ते विचारू लागले, “तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहात?”

आता कॅथरिनचाही सूर बदलला. ती म्हणाली, “तुम्ही केव्हा नोकरी सोडणार आहात.?”  कॅथरिन विनम्र होती, पण आता तिलाही हे सहन होण्यापलीकडचं होतं. तिने स्पष्ट केले, की मी इथं काहीही ‘सिद्ध’ करण्याचा प्रयत्न करीत नाहीये. मला फक्त धावायचंय. मी या शर्यतीसाठी गांभीर्याने प्रशिक्षण घेतलं आहे. मी या शर्यतीतून बाहेरही जात नव्हते.

तेवढ्यात तेथे बस आली. बसच्या दरवाजात रेलिंगला पकडून जॉक सेम्पल उभा होता. त्याला पाहताच कॅथरिन चकित झाली. तिने मनोमन देवाचे आभार मानले, की तो जिवंत आहे. तिला प्रचंड दिलासा मिळाला. मात्र, जशी बस जवळ आली आणि कॅथरिनजवळ थांबली. जॉक पुन्हा दातओठ खात मूठ वळवत ओरडला, “तुम्ही सर्व आता मोठ्या संकटात आहात.”

अर्नी जॉकवर ओरडला. “इथून नीघ जॉक, आम्हाला एकटं सोड.” कॅथरिनने मान खाली घातली. तिला एकही शब्द बोलायचं नव्हतं.

अखेर प्रेस ट्रकनेही हार मानली. कारण त्यांनी पाहिलं, की कॅथरिन आता काहीही बोलण्यास तयार नव्हती आणि ती शर्यत पूर्ण करण्यासाठी धावू लागली. त्या वेळी पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली. तिघेही विचारात हरवले.

कॅथरिन अर्नीला हलक्या आवाजात म्हणाली, “तुला माहीत आहे का, तो जॉक पुढे गेला आहे. कदाचित तो आयरिश पोलिसांपैकी एकाशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. जर असं झालं तर मी अटकेला विरोध करीन. आणखी काही…” कॅथरिन अर्नीकडे वळली आणि त्याच्या डोळ्यांत पाहिलं.

“अर्नी, मला विश्वास नाही, की तू यात कुठे उभा आहेस? मात्र काहीही झालं तरी मी ही शर्यत पूर्ण करायला हवी. तुम्ही करू शकला नाही तरी मी हातांवर, गुडघ्यांवरही चालावं लागलं तरी बेहत्तर. जर मी ही शर्यत पूर्ण करू शकले नाही, तर लोक म्हणतील, की महिला धावू शकत नाहीत. तुम्हाला जे करायचं ते करा, पण मी ही शर्यत पूर्ण करीनच.”

“ठीक आहे. एक लक्षात ठेव, हळू धाव. वेळेच्या आधी धावण्याचा विचार सोडून दे. फक्त ही शर्यत पूर्ण कर.” अर्नी आता सार्जंट झाला होता. टॉम, जॉन आणि कॅथरिनने गती कमी केली. बाह्या खाली केल्या. कॅथरिनचा उजवा हात ओला आणि गोठला होता. या संपूर्ण घटनेत तिने ग्लव्हज गमावले होते. तिने हात झाकण्यासाठी स्वेटशर्टच्या बाह्या खाली केल्या. अर्थात त्या बाह्याही फारशा लांब नव्हत्या.

सर्व अर्नीच्या लयीत धावू लागले. मात्र, टॉम, अजूनही संतापात होता. तो कॅथरिनला म्हणाला, मेरी ओर मुड़ा और कहा, “तू मला प्रत्येक प्रकारे अडचणीत टाकतेस.”

ते निळ्या रंगाचे होते.

“टॉम, तू कशाबद्दल बोलत आहेस?” – कॅथरिन

“मी एका अधिकाऱ्याला मारले आहे आणि आता मला एएयू (AAU)मधून बाहेर काढले जाईल.” टॉमला ऑलिम्पिकमध्ये हॅमर थ्रोमध्ये भाग घेण्याची आकांक्षा होती.

कॅथरिनला खरंच वाईट वाटलं, पण त्याचा रागही आला. ती शांतपणे म्हणाली, “मी अधिकार्‍याला मारले नाही, तू अधिकार्‍याला मारलेस, टॉम.” मैत्रिणीशी अशा प्रकारे भांडण करणं टॉमचा मूर्खपणाच तिला वाटला. या प्रकाराने सगळेच लाजलेले दिसत होते.

“वाह ग्रेट, होय, खूप खूप धन्यवाद. मी कधीच बोस्टनला यायला नको होतं, ” टॉम खेकसला.

“बोस्टनला येण्याची कल्पना तुझी होती!” – कॅथरिनने पुन्हा गोळी डागली.

त्याबरोबर टॉमने त्याच्या स्वेटशर्टच्या पुढच्या आणि मागच्या बाजूचे क्रमांक फाडले आणि फूटपाथवर फेकत कॅथरिनवर ओरडला, “मी कधीही ऑलिम्पिक संघ बनवणार नाही आणि ही सर्व तुझी चूक आहे!” मग त्याने आपला आवाज कमी केला आणि म्हणाला, “तू खूप हळू धावतेस.” तो धावत समोरच्या धावपटूंमध्ये दिसेनासा झाला.

टॉमला मदत करू शकले नसल्याची कॅथरिनला खूप लाज वाटली. कॅथरिन रडत होती. टॉमने तिला पुन्हा जाणीव करून दिली, की ती फक्त एक मुलगी आहे, एक जॉगर आहे आणि माझ्यासारख्या व्यक्तीने आता त्याच्या आयुष्यातून ऑलिम्पिकचं स्वप्नभंग केलं आहे. तिला वाटले, की त्याच्यासाठी ती एक गंभीर मैत्रीण आहे. आता तिला लक्षात आले, की तेदेखील संपलं आहे. ही आतापर्यंतची मोठी शर्यत आहे, हे निश्चित आहे आणि त्यांना अजून 20 मैलांपेक्षा जास्त धावायचंय.

“त्याला जाऊ दे. विसरा, विचार झटकून टाका!” कॅथरिनने अर्नीला फटकारले. कॅथरिनने कर्तव्यदक्षपणे तिचे हात सोडले जसे सरावात तिने अनेकदा केले होते.  माझे डोके खाली ठेवले, मला कोणालाही पाहायचे नव्हते, कारण सार्वजनिक ठिकाणी माझ्या जखमा चाटण्याचा हा एकमेव मार्ग होता. मला स्वतःला थकवाच्या खोल गर्तेत गेल्याचे जाणवले. खरं तर, आर्नी, जॉन आणि मी एकत्र जाऊ लागलो; मला खाली येणारा खेच जाणवत होता. मला माहित होते की एड्रेनालाईन गेली होती. देवा, मी फक्त थोडा वेळ झोपण्यासाठी काय देऊ, मी विचार केला. आम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा होता, पण मला आता पर्वा नव्हती, टॉमबद्दल नाही, पूर्ण करण्याशिवाय कशाचीही पर्वा नव्हती. मला किती दुखापत झाली किंवा किती वेळ लागेल किंवा मला तुरुंगात टाकले गेले किंवा मी मेला तरी त्याची मला पर्वा नव्हती. काहीही झाले तरी मी पूर्ण करणार होतो. बराच वेळ ते सगळे शांत होते.

“जाऊ दे त्याला. त्याचा काही विचार करण्याची गरज नाही.” कॅथरिनने अर्नीला फटकारले. तिने हात सैल सोडले. सरावात तिने असे अनेकदा केले होते. तिने खाली पाहिले. तिला आता कोणालाही पाहायचे नव्हते. कारण सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्याच जखमांवर फुंकर घालण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. तिला कमालीचा थकवा जाणवत होता. अर्नी, जॉन आणि कॅथरिन एकत्र धाऊ लागले. तिला कोणी तरी खाली खेचत असल्याचं जाणवत होतं. त्यांना खूप मोठा पल्ला गाठायचा होता. तिला आता कोणाचीही पर्वा नव्हती. ना टॉमची, ना दुखापतीची, ना वेळेत पोहोचण्याची, ना तुरुंगात जाण्याची, ना मरण्याची. तिला फक्त शर्यत पूर्ण करायची होती. बराच वेळ ते सगळे शांत होते.

काही मैलांच्या अंतरानंतर त्यांना हळूहळू काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. जसं की तुम्ही पहिल्यांदा भुलीतून बाहेर आल्यावर जाणवतं तसं. ऊर्जा संचारत होती. प्रथम आम्ही काही क्षीण आवाजातले जयघोष ऐकले. मग ते पुन्हा मागे फिरले. कॅथरिनला वाटले, की ती खूप हळू चालत आहे. तिची ओलसर लांब पँट तिला खाली ओढतेय की काय, असे तिला वाटले. म्हणून ती रस्त्याच्या कडेला गेली आणि पँट खाली ओढली. आणि दूर फेकली. त्या वेळी आठ वर्षांच्या एका बालकाने धावत जाऊन पँट पकडली. ती त्याने डोक्याभोवती गरागरा फिरवली आणि आनंदाने ओरडला. कॅथरिनासह तिघेही एकमेकांकडे पाहत मनात म्हंटले असतील, “अरे देवा, तो ती पँट घरी घेऊन आल्यावर त्याची आई त्याला काय म्हणेल?”

आता आम्ही अर्ध्या वाटेवर प्रसिद्ध वेलेस्ली हिल्सवर होतो. अर्नीच्या एका सिद्धान्तानुसार, “शर्यत सुरू झाली…” कॅथरिनाला अचानक समोर राखाडी धुक्यात मला एक नारिंगी स्वेटशर्ट दिसला. तो बिग टॉम होता आणि तो चालत होता. तिघांनी त्याला पटकन पकडले. त्याला आश्चर्य वाटले. “माझ्याबरोबर थोडा वेळ चल,” त्याने कॅथरिनाला विनवणी केली.

“मी नाही तुझ्यासोबत चालू शकणार, टॉम,”- कॅथरिना

“मी जितकी सावकाश चालले तितका मला इथे थोडा वेग आला आहे,” असा विचार करीत त्याला चालायचे असेल तर त्याने टॅक्सी बोलवावी. कॅथरिना पुढे निघाली. टॉमने तिला मागून आवाज दिला, “मी तुला कधीही सोडून जाणार नाही!”

दीर्घ अंतर नेहमीच कॅथरिनाला विचार करण्यास प्रवृत्त करायचं. आता तिचा माझा राग शांत झाला. जॉक सेंपलला कॅथरिन स्वित्झर हिच्या बोस्टन मॅरेथॉन शर्यतीमागचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही आणि म्हणूनच त्याने तिच्यावर हल्ला केला. तिला आश्चर्य याचं वाटतं, की इतर महिला का धावत नाहीत? कदाचित त्यांनी मिथकांवर विश्वास ठेवला असेल. म्हणजे धावण्याने तुमचे गर्भाचे अवयव खराब होतात, या धारणेमुळेच त्या घाबरल्या असतील. हा मूर्खपणा आहे आणि कोणीही त्यांना हा मूर्खपणा खोटा असल्याचं सांगितलं नाही. कॅथरिनच्या लोकांनी आणि अर्नीने तिला ही संधी दिली होती आणि तिला हे जाणवले, की ती फार काही विशेष नव्हती; फक्त भाग्यवान आहे. मोठ्या विद्यापीठांमध्ये महिलांसाठी कोणतेही आंतरमहाविद्यालयीन खेळ नाहीत, कोणतीही शिष्यवृत्ती, बक्षीस रक्कम किंवा 800 मीटरपेक्षा लांब कोणत्याही शर्यती नाहीत. याचे कारण म्हणजे महिलांना त्या गोष्टी हव्या आहेत हे सिद्ध करण्याची संधी नाही. जर ते फक्त भाग घेऊ शकले तर त्यांना शक्ती आणि कर्तृत्व जाणवेल आणि परिस्थिती बदलेल. आज जे घडले त्या नंतर कॅथरिनला त्या संधी निर्माण करण्याची जबाबदारी वाटली. तिला शर्यतीत धावण्याचा इतका आनंद झाला, की जणू काही चांगला शोध लावला आहे. खरं तर, तिच्याकडे ती क्षमता होती.

तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिच्यासमोर वेदना काहीच नव्हत्या. एखाद्या उच्च उदात्त हेतूसाठी आनुषंगिक वेदना स्वीकारणे, हा तुम्हाला नायक बनवण्याचा भाग होता. अर्नी म्हणाला, की एमिल झाटोपेक ( Emil Zatopek) जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो धावत असतो. अर्नी कोणाविषयी बोलतोय हे कॅथरिनला कळलं नाही.

“अजून किती लांब आहे?” खरं तर हा प्रश्न कॅथरिनला विचारायचा नव्हतं. तिला धूसर दिसत होतं. म्हणून ती म्हणाली, “अर्नी, आपण हार्टब्रेक हिलवर कधी पोहोचू?” अर्नी चकित मुद्रेने म्हणाला, “का, तू तर खूप आधी हार्टब्रेक ओलांडून आलीयेस!”

“आपण ओलांडला? अरे देवा, माझ्या लक्षातच आले नाही. तू आम्हाला का सांगितलं नाही?” कॅथरिन निराश दिसली. तिला वाटलं, वरती सॅक्सोफोन किंवा काही तरी असेल. वास्तविकपणे कोणीतरी एखादा व्यक्ती तिथं दवंडी देण्यासाठी नियुक्त करायला हवी आणि सांगायला हवं, “तुम्ही यशस्वीपणे पोहोचलात! तुम्ही हार्टब्रेक हिलच्या शिखरावर आहात!” मात्र, त्या दिवशी तिला शिखरावर पोहोचल्याची कोणतीही खूण दिसली नाही. यापूर्वी ती कोणत्याही डोंगरावर चढलेली नव्हती.

अर्नी हसत होता आणि डोके हलवत होता. ती म्हणाली, “तू एकमेव व्यक्ती असेल ज्याला हे माहीत नसेल की ते हार्टब्रेक हिलवर धावले!”

कॅथरिन आणि अर्नी कॉमनवेल्थ अ‍ॅव्हेन्यूवरून बीकन स्ट्रीटकडे वळले. तिला हा मार्ग आता अंतहीन वाटू लागला. तेथे ओळीने असलेले रो-बंगले ठोकळ्यामागून ठोकळ्यासारखी दिसत होती. ट्रॉली ट्रॅकचे 100 संच ठेवावेत तसे तिला ते भासत होते. तिला भीती वाटत होती, की धावताना घोटा मोडेल. प्रत्येक वेळी ती हलके हलके पावले टाकताना तिच्या पायाचे फोड फुटले आणि टोचायचे. कोणीतरी ओरडलं, “आणखी एक मैलाचं अंतर धावायचंय!” अर्नी म्हणाला, “त्यांचे नको ऐकूस. आपल्याने किमान तीन मैल धावायचं आहे.” जॉन कण्हत होता. एका पोलिसाने त्यांना हेअरफोर्ड स्ट्रीटकडे मार्ग दाखवला. ते फिनिशिंग लाइनच्या एक्सेटर स्ट्रीटवर होते. कॅथरिनाला वाटत होते, की कोणी तरी चुकीचे मार्गदर्शन करीत आहे. पण हेअरफोर्डच्या वरच्या बाजूला, ते बॉयलस्टन मार्गाकडे वळले आणि तिथे फिनिशिंग लाइन होती. प्रुडेंशियल इमारतीच्या समोरील लांब उतार, रस्त्यावर रंगवलेल्या रेषेपर्यंत लिहिलेले होते- फिनिश (FINISH). मग त्यांना कळलं, की आपल्याला कोणीही चुकीचं सांगितलं नाही, ना कोणी अटक करायला आलं होतं.

जॉनने म्हणाला, “पहिल्यांदा अर्नी फिनिशिंग लाइन पार करेल” अर्नी म्हणाला, “नाही, आपण सर्व एकाच वेळी ही शर्यत संपवू ” जॉनने कॅथरिनाकडे पाहत डोळे मिचकावले आणि अखेरच्या कणी ते हळू झाले आणि त्यांनी अर्नीला ढकललं. तिघेही प्रत्येक वेळी सोबत धावले. यापूर्वी ते असे कधी धावले नव्हते आणि त्यांनी एकमेकांवर कधी शंकाही घेतल्या नव्हत्या. नंतर ते आनंदाने एकमेकांना बिलगले.

अंतिम रेषेच्या गर्दीत सुमारे डझनभर माझ्यावर शिंतोडे उडविणारे लोकही होते. त्यांच्यापैकी कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. हा अर्धा गट त्यांच्याजवळ गोळा झाला. थंडीने कुडकुडताना काहींना दया आली आणि ते तिघांकडे सैन्याचे ब्लँकेट फेकत होते. बाकीच्यांनी तर प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. प्रश्न विचारताना रिपोर्टरच्या वहीत लिहायचे. ते खूपच खेकड्यासारखे होते.

“तू हे कशासाठी केलं?” (मला धावायला आवडतं, जितके लांबचं अंतर तितकं चांगल.) “काही तरीच. बोस्टन का, क्रमांक का घातला?” (कारण महिलादेखील धावण्यास पात्र आहेत. सर्वांना समान अधिकार आहेत हे तुम्हालाही माहिती आहे.) “तुम्ही पुन्हा धावण्यासाठी इथे परत यणार का?” (होय.) “ते तुमच्या क्लबवर बंदी घालतील.” (मग आम्ही आमच्या क्लबचे नाव बदलू.) “तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे का?” (हं? मला वाटते, की आम्हाला 1920 मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला आहे!) प्रश्न इतक्या आक्रमक पद्धतीने विचारले गेले की कॅथरिनला पुन्हा अचानक आव्हान दिले गेले. ती शांत होती. तिने रागावर नियंत्रण राखले. तिला खूप छान वाटले. तिला असे वाटले, की ती हॉपकिंटनला पुन्हा धावू शकेल. काही वेळाने बीएएचा एक अधिकारी आला आणि त्याने पोडियाट्रिस्टकडून तिचे पाय तपासण्याचा आग्रह धरला. कॅथरिनने शूज काढले तेव्हा डॉक्टर जवळजवळ बेशुद्धच झाला. तिचे सॉक्स रक्ताने माखले होते. त्याने मलमपट्टी केली. त्यानंतर ती पुन्हा शूज घालू शकली नाही. तिने बँडेजवरून फक्त मोजे घातले आणि वरच्या मजल्यावर फिनिश-लाइन एरियाकडे आली. तिथे अर्नी आणि जॉन टॉमची वाट पाहत थांबले होते. एक तास उलटला तरी टॉम दिसला नाही. त्यांनी आता त्याची वाट पाहणं सोडलंच होतं, त्याच वेळी बिग टॉम लडखडत आला.

अर्नीच्या एका मित्राने चौघांना त्यांची कार आणण्यासाठी हॉपकिंटनला नेले. त्यांना गरम पाण्याने अंघोळ आणि रात्रीच्या शानदार भोजनासाठी आपल्या घरी नेले. ते मनसोक्त हसले, बीअर रिचवली आणि दिवसभरात घडलेल्या गोष्टी एकमेकांना सांगू लागले. आता रात्रीचे दहा वाजले होते. सिराक्यूजकडे निघण्यासाठी त्यांना दीर्घ प्रवास करायचा होता. या संपूर्ण गडबडीत तिला घरी फोनही करता आला नाही.

जवळच अल्बानी होतं. रात्री एकच्या सुमारास ते न्यू यॉर्क स्टेट थ्रू वेजवळ कॉफीसाठी थांबले. शरीर इतकं कडक झालं होतं, की ते मुश्किलीने कारबाहेर निघू शकले. रेस्टॉरंटमध्ये यू आकाराच्या काउंटरवर एकच माणूस बसलेला होता. तो वृत्तपत्र वाचत होता. कॅथरिनचं लक्ष त्या वृत्तपत्रावर पडल्यानंतर ते लांब लांब बसले. “अरे देवा!” ती ओरडली आणि त्याच्याजवळ धावतच आली. म्हणाली, “क्षमा करा, कृपया मला वृत्तपत्र देता का!” ती इतकी उतावीळ होती, की त्याला धक्का बसला, जणू काही आग लागली.”

पहिल्या आणि शेवटच्या पानावर त्या चौघांची छायाचित्रे होती. जसजसे ते एका पानावरून दुसऱ्या पानावर गेले, प्रत्येक ठिकाणी कॅथरिनाची वेगवेगळी छायाचित्रे. धावताना एक मुलगी, एका मुलीवर हल्ला होताना, मुलीला वाचवताना तिचा प्रेमी, सुंदर मोजात सुंदर मुलगी… तिला आश्चर्य वाटलं, त्यांनी एवढी छायाचित्रे केव्हा खेचली असावीत? त्या काउंटरवरील माणसाने तिच्या हातात पेपर ठेवला. “हा तुमच्याकडेच ठेवा.”

निश्चितच त्यानंतर कोणीही शांत झोपले नव्हते. सर्वांसाठी स्वर्ग दोन बोटांवर होते. कॅथरिनने एका वेगळ्याच विश्वात पाऊल ठेवले होते. लोकांसाठी कदाचित ही एक घटना होती. मात्र, कॅथरिनसाठी ती त्या पलीकडची होती. खूप वेगळी.

कॅथरिनचा साठच्या दशकातील दुर्मिळ व्हिडीओ…

The Real Story of Kathrine Switzer’s 1967 Boston Marathon

विल्मा रुडॉल्फ हिची प्रेरणादायी कहाणी

हेही वाचा...

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?
All Sports

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
लिस हार्टेल
All Sports

लिस हार्टेल- एका डॅनिश महिलेची ‘घोडदौड’

February 11, 2023
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी
All Sports

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

August 27, 2022
एलिसन फेलिक्स
All Sports

‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स

February 16, 2023
Tags: अर्नीकॅथरिनलाप्रशिक्षणफिनिशिंगबोस्टनमॅरेथॉनमध्येसिराक्यूज
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

चेस ऑलिम्पियाड : लक्ष भारताच्या कामगिरीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!