• Latest
  • Trending
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
लवलिना बोर्गोहेन भारतीय बॉक्सिंग

2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

December 5, 2022
कतार फिफा वर्ल्ड कप

कतार फिफा वर्ल्ड कप वेळापत्रक 2022

November 21, 2022
hand of god

Hand of God देणार ३० लाख डॉलर!

November 17, 2022
Thursday, February 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham) याची साहसी आणि प्रेरणादायी कहाणी अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहे. आगीत पायाचा कोळसा झाला, तरी तो धावला.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 24, 2022
in All Sports, Athletics, Sports History, sports news
0
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham) याची साहसी आणि प्रेरणादायी कहाणी अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहे. आगीत पायाचा कोळसा झाला, तरी तो धावला. निर्जीव पायांतही बळ भरणारा हा धावपटू दुर्दम्य आशावादी होता. क्रीडा कारकीर्द संपुष्टात आल्यानंतरही त्याने आपल्या प्रेरणादायी कामांनी सर्वांच्या मनात घर केलं. कोण आहे हा ग्लेन कनिंघम?

स्नोहोमिश (Snohomish River) नदीकाठावर वसलेलं एक छोटंसं टुमदार गाव- एव्हरेट्स. हे गाव स्नोहोमिश काउंटीत येतं. स्नोहोमिश म्हणजे काय, याबाबत स्पष्टता नाही. मात्र, असं म्हणतात, की स्नोहोमिश म्हणजे झोपेचं पाणी (Sleeping water). कोणी म्हणतं स्नोहोमिश समुदायावरून नदीला स्नोहोमिश म्हणतात. असो… एव्हरेट्स (Everetts, Kan) हे कृषिप्रधान गाव. हिवाळ्यात सकाळी गावात कमालीची थंडी असते.

शेतकऱ्यांचं गाव आहे म्हंटल्यावर अंगमेहनत या गावाला नव्याने सांगायची गरज नाही. दिवसरात्र काम काम नि काम. लहानगी मुलंही मेहनतीची कामे करतात. या गावात क्लिंट नावाचा कष्टकरी विहिरीत ड्रील करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. कुटुंबासाठी त्याने फारच खस्ता खाल्ल्या. 4 ऑगस्ट 1909 मध्ये क्लिंट अटलांटा येथे राहिला. त्या वेळी क्लिंटच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं- ग्लेन. वयाच्या सहाव्या वर्षीच ग्लेनही कामाला जुंपला. कष्टकऱ्यांच्या कुटुंबात कष्टाला वय नसतं.

ग्लेन आणि त्याचा नऊ वर्षांचा भाऊ फ्लॉइड (Floyd) या दोघांना दोन मैलांवरील शाळेपर्यंत जात तेथे चूल पेटविण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. ही अशी शाळा होती, जेथे सोडून गेलेल्या घरांचं शाळेत रूपांतर करण्यात आलं होतं. त्याला स्कूल हाऊस (शाळाघर) असं म्हंटलं जायचं. ग्लेन आणि फ्लॉइड यांनी चूल पेटवल्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक येईपर्यंत ती खोली गरम व्हायची. कारण थंडीच इतकी भयंकर होती!

फेब्रुवारी 1916 मध्ये आगळिक घडली. कडाक्याच्या थंडीत सकाळी सकाळी फ्लॉइड आणि ग्लेन नेहमीप्रमाणे शाळाघरात आले. त्यांनी दार उघडले आणि कडाक्याच्या थंडीने त्यांचं अंग शहारलं. चिमुकले सख्खे भाऊ हुडहुडत शाळेच्या खोलीत आले. दोघांनी लाकडे चुलीत घातली. रॉकेलचा डबा घेतला आणि नेहमीप्रमाणेच लाकडे नीट भिजवली. हा त्यांचा नेहमीचाच उद्योग. दोघा भावांसाठी आजची सकाळ काही तरी वेगळीच होती. दोघांकडून काही तरी चुकलं होतं.

लाकडे थोड्या वेळ रॉकेलमध्ये भिजवल्यानंतर फ्लॉइडने आगकाडी पेटवली आणि लाकडांवर टाकली. अचानक छोटासा स्फोट झाला. आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने संपूर्ण खोलीला वेढलं. यात फ्लॉइडही वेढला गेला. कोणी तरी चुकून रॉकेलच्या कंटेनरमध्ये पेट्रोल भरलं होतं. ग्लेन आणि फ्लॉइड दोघेही वेदनेने विव्हळत होते. छोट्याशा स्फोटामुळे दोघेही जमिनीवर धाडकन कोसळले. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत शाळेसमोरील खोल्यांना वेढू लागल्या. ग्लेन आणि फ्लॉइडचं नशीब इतकंच, की त्या दिवशी त्यांची मोठी बहीण लेथा त्यांच्यासोबत शाळेत आली होती. ती जवळपास दुसरी ड्युटी करीत होती. तिला शाळाघरातला भडका दिसला. ज्वाळा दिसताक्षणी ती खोलीच्या दरवाजाकडे धावली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले.

तिने कसाबसा दरवाजा उघडला आणि दोन्ही भावांना बाहेर काढण्यात ती यशस्वी झाली. ती मदत मागण्यासाठी धावली. ती परत आली तेव्हा फ्लॉइड मोठ्या मुश्किलीने वाचला होता. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. लहानगा ग्लेन काही तास बेशुद्धावस्थेत होता. स्थानिक डॉक्टरांनी त्याला जवळजवळ मृतच घोषित केलं होतं. त्याचे खालचे शरीर आगीत अक्षरश: कोळसा झाले होते. स्थानिक रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तो उठला तेव्हा त्याच्या पायाला बँडेज लावलेले होते. वेदना असह्य होत होत्या. त्याला त्याच्या मोठ्या भावाची आठवण झाली. त्याला शोधण्यासाठी तो खाटेवरून उतरण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, तो पाय हलवूच शकला नाही.

भाऊ आता या जगात नाही, हे कळल्यावर तो स्तब्धच झाला. आठवडाभर त्याला रुग्णालयातच राहावे लागले. त्याच्या पायाला मलमपट्टी होती. मात्र, पाय क्षीण झाले होते. जसा तो शुद्धीवर आला, तेव्हा आई आणि डॉक्टर काही तरी कुजबुजत होते. ग्लेनच्या कानावर काही वाक्ये पडली. डॉक्टर म्हणत होते, की आधी मला वाटलं, तो जिवंत राहू शकणार नाही. नंतर डॉक्टर पुढे म्हणाले, तरीही तो पुन्हा कधीही चालू शकणार नाही. त्याचे दोन्ही पाय कापावे लागतील.

आईला काही सुचत नव्हतं. आधीच ग्लेनने भाऊ गमावला. आता त्याला पायही गमवावे लागणे असह्य होते. आईने तसं करण्यास नकार दिला.

अखेर ग्लेनला घरी सोडण्यात आल. त्याच्या पायाला बांधलेली पट्टी काढण्यात आली, तेव्हा जाणवलं, डॉक्टर का इतके निराशावादी होते?

ग्लेनने डाव्या पायाची सर्वच बोटे गमावली होती. टाच आणि बोटे यांच्यामधली कमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. गुडघ्यावरील मांस आणि पोटऱ्या तर राहिल्याच नाहीत. उजवा पाय तर विकृत झाला होता. तो डाव्या पायापेक्षा दोन इंच लहान झाला होता.

ग्लेन आता चालू शकत नव्हता.

जेवढे करता येईल तेवढे सगळे डॉक्टरांनी केले होते. त्या वेळी प्रत्यारोपण आणि त्वचा ग्राफ्ट करण्याची सुविधा अस्तित्वातच नव्हती. ग्लेन अंथरुणावर खिळलेला एक शरपंजरी बालक उरला होता. व्हीलचेअर आणि कुबड्यांसह त्याला घरी पाठवण्यात आलं. कुटुंबाला सल्ला देण्यात आला, की मांसपेशी वाढण्यासाठी त्याच्या पायाची मालीश करा आणि कंबरेखालील अंगाची लवचिकता वाढविण्याचा प्रयत्न करा.

अमेरिकन मिलर : दि लाइफ अँड टाइम्स ऑफ ग्लेन कनिंघम (American Miler: The Life and Times of Glenn Cunningham) या आत्मचरित्रात ग्लेनने या कठीण पथ्यावर विस्तृतपणे लिहिले आहे.

“वेड्यासारख्या जखमा झाल्या होत्या.” ग्लेनने आत्मचरित्रात नमूद केलंय, की “माझे वडील माझे पाय ताणण्याचा प्रयत्न करायचे. जेव्हा वडील थकायचे, तेव्हा मी आईला मालिश आणि स्ट्रेचिंग करण्यास सांगायचो. जेव्हा आई थांबायची तेव्हा मी स्वत: प्रयत्न करायचो.”

ग्लेन पुन्हा चालण्याचा प्रयत्न करू लागला. एक आवश्यक, परंतु भयंकर कष्टदायी दिनचर्या त्याने सहन केली.

1919 मधील ते उन्हाळ्याचे दिवस होते. नेहमीप्रमाणे आईने ताजी हवा खाण्यासाठी ग्लेनला बाहेर फिरवण्यास गेली. नंतर ती घरात गेली. काही मिनिटांत ती बाहेर आली. बघते तर काय, ग्लेन जमिनीवर रांगत होता! तिला भयंकर आश्चर्य वाटलं.

काही तरी गडबड आहे म्हणून आई घाईघाईने त्याच्यापर्यंत आली. मात्र, तोपर्यंत ग्लेनने स्वत:ला गवताच्या पलीकडे खेचले. तो कुंपणाला धरून उभाही राहिला. कुंपणाच्या बाजूने तो पुढे गेला. थोडा अडखळला. कारण पायावर ताण दिल्याने वेदना होत होत्या. आईने मदतीचा हात पुढे केला. मात्र, ग्लेनने तो नाकारला. मीच चालणार, असा त्याने निश्चय केला होता.

आठवडाभर त्याने असा प्रयत्न सुरू ठेवला. हळूहळू काही महिन्यांनी ग्लेनचे पाय काम करू लागले. डॉक्टरही चकित झाले. चालायला लागल्यानंतर त्याने नवा शोध लावला-

“चालताना भयंकर वेदना होत होत्या. मात्र जेव्हा मी धावायचो, तेव्हा मला अजिबातच वेदना होत नव्हत्या. त्यामुळे पाच-सहा वर्षांपर्यंत मी काहीच केलं नाही. फक्त धावत राहिलो.”

ग्लेनने धावण्याव्यतिरिक्त वेगाने उड्या मारणे असे काही करायला सुरुवात केली. मात्र, ग्लेन कनिंघम या घटनेआधीही वेगाने धावण्यात संपूर्ण समुदायात ओळखला जात होता. कारण तो प्रत्येक ठिकाणी पळतच असायचा.

तो एकदा म्हणाला होता, की मी एकदा धावण्याचा प्रयत्न केला, पण दहा फुटांपेक्षा जास्त धावू शकलो नाही. नंतर मी फक्त धावत राहिलो आणि धावतच राहिलो… ”

ग्लेन 12 वर्षांचा असताना त्याच्या पायावर चट्टे होते. तरीही एल्खार्ट येथे तो धावायचा. याच एल्खार्टमध्ये त्याच्या कुटुंबाचं मूळ गाव. त्याच्या वयोगटातील सर्वांना तो मागे टाकत होता.

तो एल्खार्ट हायस्कूलमध्ये ट्रॅकवर धावला आणि ‘मायलर’ (miler) बनला. शालेय गटातल्या अखेरच्या शर्यतीत त्याने राष्ट्रीय विक्रम नोंदवला. या शर्यतीत त्याने मैलाचं अंतर 4 मिनिटे आणि 24.7 सेकंदांत पार केलं.

एल्खार्टमधील ही कामगिरी कौतुकास्पदच होती. मात्र, कुत्सितपणे कुणी तरी म्हंटलं, की तो चार मिनिटांचं अंतर धावला! अर्थात, ही अपमानजनक टिप्पणी त्याने कधीही मनावर घेतली नाही.

ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham) याने 1930 मध्ये कॅन्सस विद्यापीठात प्रवेश केला. हे असे विद्यापीठ होते, जेथे महान ट्रॅक प्रशिक्षक ब्रुटस हॅमिल्टन मार्गदर्शन करीत होता. हा हॅमिल्टन प्रसिद्ध डेकॅथलॉनचा खेळाडू होता, ज्याने 1920 मधील अँटवर्प स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

ग्लेन प्रथमच विद्यापीठाच्या मैदानावर दाखल झाला होता. त्याने 1931-32 च्या मोसमात कारकिर्दीतली पहिली आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा खेळली. याच मोसमात नेब्रास्कातील लिंकन येथे बिग सिक्स मीटमध्ये त्याने अर्धा मैल शर्यतीत एक मिनिट 53.3 सेंकंदांची वेळ नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित केला. मैलाच्या शर्यतीतही त्याने 4 मिनिटे आणि 14.3 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवली. पुढच्याच आठवड्यात शिकागोतील नॅशनल कॉलेजिएट मीटमध्ये त्याने एनसीएएचा विक्रम मोडीत काढत 4 मिनिटे आणि 11.1 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवली.

अमेरिकेतील मैदानी स्पर्धेत एवढ्या वेगाने कोणताही खेळाडू धावलेला नव्हता. ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham) याचं नाव आता राष्ट्रीय स्तरावर झळकलं होतं. देशातील अव्वल मध्यम अंतराच्या शर्यतीत तो अव्वल स्थानावर पोहोचला, जेथे त्याला दशकभरात कोणीही हलवू शकलं नाही. 1932 मध्ये ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham) याने एनसीएए (NCAA)ची 1,500 मीटरची शर्यत जिंकली आणि अमेरिकेच्या ऑलिम्पिक चमूत स्थान मिळवलं. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या 1,500 मीटर शर्यतीत त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पोडियमवर पदक मिळविण्याची त्याची संधी क्षुल्लक अंतराने हुकली.

1933 मध्ये कन्सास विद्यापीठातून सर्वोच्च गुणांसह ग्लेनने पदवी मिळवली. या वर्षात मैदानातही तो सर्वोत्तम ठरला. एएयूची 800 मीटर शर्यत 1 मिनिट 51.8 सेकंदांची वेळ नोंदवत जिंकली, तर एएयूच्याच 1500 मीटर शर्यतीत त्याने 3 मिनिटे 52.3 सेकंदांची वेळ नोंदवली. एनसीएएच्या मैलाची शर्यत पुन्हा जिंकली. या शर्यतीत त्याने 4 मिनिटे 9.8 सेकंदांची वेळ नोंदवली.

त्याच्या या कामगिरीची दखल अमेरिकेच्या अॅथलेटिक्सने घेतली. त्याला 1933 मध्ये सुलिवन स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले.

1933 च्या ग्रीष्मकालीन मोसमातील युरोप दौऱ्यावर असलेल्या अमेरिकी ट्रॅक संघाचा तो कर्णधार होता. तब्बल 20 इव्हेंटमध्ये धावल्यानंतर ग्लेन याला ‘दि कन्सास आयर्नमॅन’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

ग्लेनला आव्हान देणारा तसा कोणीही नव्हता. मात्र, 1934 मध्ये ग्लेन कनिंघम याला प्रिंसटन येथील बिल ब्रोंथ्रोन याचे आव्हान मिळू लागले.

शर्यतीच्या दुसऱ्या टप्प्यात आधीपेक्षा अधिक वेगाने धावणे ही ग्लेन कनिंघम याने नवी रणनीती अवलंबली.

प्रिन्सटन येथील मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 16 जून 1934 रोजी आमंत्रितांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. यात ब्रोंथ्रोन, ग्लेन आणि जीन वेंझकी एक मैलाच्या शर्यतीत धावणार होते.

ही शर्यत पाहण्यासाठी अमेरिकेत प्रचंड उत्सुकता होती. सुमारे 25 हजारांवर लोकांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली, तर हजारो लोकांना तिकीट न मिळाल्याने मागे फिरावे लागले. या शर्यतीचा हिरो ग्लेन कनिंघम हाच ठरला. त्याने 61.8, 64.0, 61.8 आणि, 59.1 सेकंदांची लॅप वेळ नोंदवत स्पर्धा जिंकली. त्याने एकूण 4 मिनिटे 6.7 सेकंदांची वेळ नोंदवत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

ग्रीष्मकालीन मोसमानंतर ब्रोंथ्रोनने पराभवाचा वचपा काढण्यासाठी नवे डावपेच आखले. त्याने ग्लेन कनिंघम याला सलग 1,500 मीटर शर्यतींमध्ये पराभूत केले. ग्लेन याला पराभूत केलेच, शिवाय 3 मिनिटे 48.8 सेंकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रम प्रस्थापित केला. ग्लेनने 3 मिनिटे 48.९ सेकंदाची वेळ नोंदवत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

ग्लेन कनिंघम याने 1935 मध्ये प्रमुख शर्यतींमध्ये हुकूमत राखली. त्याने 3 मिनिटे 52.1 सेकंदाची वेळ नोंदवत एएयू 1,500 मीटर शर्यत जिंकली. या शर्यतीत जीन वेंझके दुसऱ्या, तर ब्रोंथ्रोन याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

1936 मधील यूएस ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत ग्लेनची गती मंदावली. मात्र, कसाबसा तो अमेरिकी संघात स्थान मिळवू शकला. त्याच्या आवडत्या 1,500 मीटर शर्यतीत त्याने जागतिक विक्रम मोडीत काढला खरा, मात्र शर्यत गमावली!

न्यूझीलंडच्या जॅक लव्हलॉकने 3:47.8 मिनिटांची विश्वविक्रमी वेळ नोंदवत ग्लेन कनिंघमला मागे टाकले. ग्लेनने ही शर्यत 3:48.4 या वेळेत पूर्ण केली. त्या वेळी तो लव्हलॉकविषयी म्हणाला, “तो आतापर्यंतचा सर्वांत महान धावपटू असला पाहिजे.” कॉर्डनर नेल्सन आणि रॉबर्टो क्वेर्सेटानी यांच्या ‘द मिलर’ या पुस्तकात ही नोंद आहे.

ग्लेन कनिंघम याने दोन एनसीएए किताब, आठ एएयू चॅम्पियनशिप आणि एका विश्वविक्रमासह आपल्या कारकिर्दीची सांगता केली. यात 1934 मधील जागतिक एक मैल शर्यतीत 4: 06.8 अशी वेळ नोंदवत केलेला विश्वविक्रम तीन वर्षांपर्यंत अबाधित राहिला.

त्याने मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 31 पैकी 21 इनडोअर शर्यती जिंकल्या. 1916 मध्ये शाळेतल्या आगीत त्याच्या पायाला झालेली इजा, त्यामुळे रक्ताभिसरणाची उद्भवलेली समस्या सहन करीत स्ट्रेचिंग आणि वॉर्मअपसारखा क्षमतेची कसोटी पाहणारा सराव इतर धावपटूंच्या तुलनेने त्याच्यासाठी कित्येक पटीने आव्हानात्मक होता.

नेल्सन आणि क्वेर्सेटानी यांच्या मते, कनिंघमची सहनशक्ती कौतुकास्पद होती. मागे वळून पाहिलं तर त्याचे बालपणातील ते अंधकारमय दिवस भयंकर होते. आपल्या निर्जीव पायांमध्ये बळ भरण्यात त्याला किती तरी यातना सहन कराव्या लागल्या होत्या.

नेल्सन व क्वेर्सेटानी म्हणतात, “जर तुम्हाला शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला ग्लेन व्हावं लागेल. जर तुमच्याकडे धैर्य असेल, तर तुम्ही नक्की विजयी व्हाल.”

जर हे सगळं पुरेसं नसेल तर कनिंघमची रेसिंगनंतरची कारकीर्द सर्वांत उल्लेखनीय कामगिरी चिन्हांकित करू शकेल.

अमेरिकेच्या इतिहासात सर्वांत मोठ्या आर्थिक मंदीतून प्रौढावस्थेतील जीवन जगत असताना ग्लेन कनिंघम याने हुशारीने बक्षिसांच्या रकमेची सुयोग्य गुंतवणूक केली. त्यामुळेच तो एक नव्हे, तर दोन विस्तीर्ण शेती घेतली.

त्यापैकी एक शेती, जी आता दक्षिण मध्य कॅन्सस (बर्न्सजवळ) कनिंघम चेस काउंटी रँच म्हणून ओळखली जाते. ती त्याने 1939 मध्ये विकत घेतली. अर्थात, त्याची पहिली पत्नी मार्गारेट एस. कनिंघम (Margaret S. Cunningham) हिला घटस्फोटाच्या तडजोडीचा एक भाग म्हणून देण्यात आली.

ग्लेन कनिंघम याची मुलगी- डॉ. सँड्रा कनिंघम, आजपर्यंत 320 एकर मालमत्ता राखून आहे. एवढेच नाही, तर तेथे इजिप्शियन, अरबी जातीचे अश्वपालन केले जाते. तिच्या वडिलांनी अनेक प्राण्यांची सुटका केली होती आणि त्यांचे पुनर्वसन 822 एकरच्या जागेत केले होते.

ग्लेन कनिंघम याने शारीरिक शिक्षणात डॉक्टरेट मिळवली आणि कॉर्नेल कॉलेजमध्ये 1940 ते 44 दरम्यान फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर म्हणून सेवाही दिली. तत्पूर्वी दोन वर्षे त्याने अमेरिकी नाविक दलातही सेवा दिली होती.

त्याने 1947 च्या ग्रीष्मकाळात रुथ शेफिल्ड (Ruth Sheffield) हिच्याशी दुसरा विवाह केला. त्यांनी 1938 मध्ये विकत घेतलेल्या रँचमध्ये ते स्थायिक झाले आणि कॅन्ससच्या सीडर पॉइंटजवळ तब्बल 840 एकर जमीन त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवली.

ग्लेनचं कुटुंबं बऱ्यापैकी विस्तारलं होतं. मार्गारेटपासून झालेली दोन मुलं आणि दुसऱ्या बायकोची दहा मुलं असा भलामोठा परिवार 12 खोल्यांच्या रँच हाउसमध्ये सुखेनैव राहत होता.

ग्लेन आणि रुथ यांनी अखेरच्या टप्प्यात त्रासलेल्या तरुणांसाठीही घर चालवले. विशेष म्हणजे या दाम्पत्यापैकी एकालाही या क्षेत्रात कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नव्हते. त्यांच्याकडे तब्बल 84 लोक होते. त्यापैकी बहुतेक मुलेच होती, जी एकत्र राहत होती.

कनिंघमने अखेरीस ग्लेन कनिंघम यूथ रॅंचमध्ये 9,000 पेक्षा जास्त त्रासलेल्या आणि वंचित तरुणांना मदत केली. ‘बायोग्राफिकल डिक्शनरी ऑफ अमेरिकन स्पोर्ट्स’मधील (Biographical Dictionary of American Sports) फ्रँक बी. बाउल्सच्या मते, कनिंघम यांची पद्धत सोपी होती:

“बाह्य मदतीपेक्षा या दाम्पत्याने तरुणांना जुन्या पद्धतीच्या संयम आणि सहनशीलतेने हाताळले.’’

कदाचित कनिंघमला त्याच्या आवडत्या धर्मग्रंथातील शब्दांमध्ये सर्वांत चांगले अभिव्यक्त करण्यात आले आहे. एक म्हणजे ज्याने त्याला मृत्यूसोबत आपल्या जीवघेण्या ब्रशपासून वाचण्यासाठी शांत केले आणि दुसरे म्हणजे त्याने अनेक तरुणांना दु:खाच्या गर्तेतून उभारी दिली.

यशया 40:31 च्या वचनाप्रमाणे…

“तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.”

खरोखर, ग्लेन व्ही. कनिंघमने देवदूतांसारखी पंखांनी भरारी घेतली किंवा कदाचित त्याला चित्त्याचे पायही म्हणता येईल, जे न खचता धावत राहिले. तो इतर धावपटूंसारखा सहज, सुबक किंवा गुळगुळीत नव्हता; तो त्यांच्यापेक्षा अधिक दृढ होता.

त्याने देशातील नागरिकांच्या हृदयात स्थान मिळविले. त्याच्या धैर्याची आणि प्रेरणेची कहाणी पिढ्यान् पिढ्या पुढे जावी…

ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham) याची माहिती

ग्लेन कनिंघम Glenn Cunningham
पूर्ण नाव  ग्लेन व्हर्नाइस कनिंघम (Glenn Vernice Cunningham)
राष्ट्रीयत्व  अमेरिकन
जन्म  4 ऑगस्ट 1909, ॲटलांटा कॅन्सस, अमेरिका
मृत्यू  10 मार्च 1988 (वय 78)
उंची  5 फूट 10 इंच (178 सेंमी)
वजन  70 किलो
खेळ  ॲथलेटिक्स
इव्हेंट्स  800 मी., 1500 मी., माइल
संघ  कॅन्सस विद्यापीठ
निवृत्ती  1940
सर्वोत्तम जागतिक रँकिंग  1
वैयक्तिक सर्वोत्तम  800 मी.- 1:49.7 (1936) | 1500 मी.- 3:48.2 (1940) | मैल- 4:04.4 (1938)
ऑलिम्पिक  1500 मी. (1936, बर्लिन)

धावपटू मिल्खा सिंग-‘फ्लाइंग सिख’ उडाला आकाशी!

Facebook

twitter 

 

Read more at:

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)
All Sports

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी
All Sports

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

August 27, 2022
एलिसन फेलिक्स
All Sports

‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स

October 12, 2022
All Sports

धक्कादायक! इक्वाडोरच्या धावपटूला गोळ्या घातल्या!!!

October 29, 2021
मिल्खा सिंग फ्लाइंग सिख
All Sports

धावपटू मिल्खा सिंग-‘फ्लाइंग सिख’ उडाला आकाशी!

February 4, 2022
Who holds the world record in the 100 meter race
All Sports

100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे?

April 3, 2021
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

LEGAL

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!