All SportsBadminton

Is Sindhu retiring? सिंधू संन्यास घेतेय…!!!

Your Content Goes Here

Sindhu is retiring?

सिंधू संन्यास घेतेय…?

नवी दिल्ली, २ नोव्हेंबर |

‘मी संन्यास घेतेय…’ विश्व चॅम्पियन बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने P V Sindhu | सोमवारी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आणि क्रीडाप्रेमींच्या काळजाचा ठोकाच चुकला… नंतर तिने आपल्या निवृत्तीचे कारण स्पष्ट केल्यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सिंधूची सोशल मीडियावरील ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. मात्र, तिच्या या पोस्टमध्ये तिने निवृत्तीमागचे कारणही स्पष्ट  केले आहे. तिने म्हंटले आहे, की मी वस्तुत: कोविड-19 | coronavirus | महामारीमुळे जी नकारात्मकता, भीती आणि अनिश्चितता पसरली आहे, त्यातून मी निवृत्ती घेत आहे…

ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी सिंधू सध्या लंडनमधील गेटोरेड स्पोर्ट्स सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये पोषण आहार आणि तंदुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या घटकांवर काम करीत आहे.

सिंधूने सोशल मीडियावरील पोस्टची सुरुवातच अशी धक्कादायक केली, की अनेकांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहिल्या नाहीत.

तिने पोस्टच्या सुरुवातीला नमूद केले, की ‘डेन्मार्क ओपन हा अखेरचा टप्पा होता. मी संन्यास घेत आहे.’

Is Sindhu retiringसिंधूने पुढे नमूद केले, की ‘‘मी आज तुम्हाला लिहीत आहे, की माझा प्रवास अजून संपलेला नाही. डेन्मार्क ओपनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे हा शेवटचा टप्पा होता.’’

सिधूने सांगितले, ‘‘सध्याच्या स्थितीत जी अशांती पसरली आहे, त्यातून मी संन्यास घेत आहे; मी नकारात्मकता, भय आणि अनिश्चिततेतून संन्यास घेत आहे. मी अशा अज्ञात गोष्टींतून संन्यास घेत आहे ज्यावर माझं कोणतंही नियंत्रण नाही.’’

ती म्हणाली, ‘‘सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मी स्वच्छतेच्या मार्गदर्शक सूचनांचा ढासळलेला दर्जा आणि विषाणूंबद्दलची बेफिकिरी यातून मला संन्यास घेण्याची इच्छा आहे.’’

मार्चमध्ये ऑल इंग्लंड खेळणारी सिंधू जानेवारीत वर्ल्ड टूरच्या आशिया स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करीत आहे.

ती म्हणाली, ‘‘ही महामारी माझे डोळे उघडणारी आहे. मी प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी आणखी मेहनत घेऊ शकते. संपूर्ण क्षमतेने मी अखेरच्या शॉटपर्यंत माझी ताकद लावू शकते. मी आधीही असं केलं आहे. मी पुन्हा ते सिद्ध करू शकते.’’

तिने पुढे म्हंटले आहे, ‘‘पण मी न दिसणाऱ्या विषाणूला कसं हरवू, ज्याने संपूर्ण विश्वाला वेठीस धरलं आहे? आम्ही अनेक महिन्यांपासून घरातच आहोत आणि प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना आम्ही स्वत:शीच प्रश्न करीत आहोत.’’

सिंधूने म्हंटले, मी माझ्या पोस्टची सुरुवात ‘मी संन्यास घेत आहे’ अशी यामुळे केली, की या धोकादायक विषाणूशी लढणाऱ्या अनेक लोकांपर्यंत माझं मत पोहोचावं.

तिने पोस्टच्या सुरुवातीलाच म्हंटले आहे, ‘‘मी तुमच्या हृदयाची ठोके वाढवली असेल. या अभूतपूर्व काळात अभूतपूर्व उपायांची गरज आहे. मला वाटतं, की तुम्ही माझ्या मतावर विचार करण्याची गरज आहे.’’

सिंधूने पुनरागमनावर पुन्हा जोर दिला. ती म्हणाली,  ‘‘आपण ही अपेक्षा करायला हवी, की सुरुंगाच्या दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे. मी डेन्मार्क ओपनमध्ये सहभाग घेऊ शकले नाही. कारण मला सराव करावा लागेल. त्यापासून मला कोणी थांबवू शकणार नाही. जेव्हा अशा कठीण प्रसंगात पुनरागमन करायचं असेल तर दुपटीने मेहनत घ्यावी लागणार आहे.’’

ती म्हणाली, ‘‘मी आशिया ओपनमध्ये खेळेन. मी लढल्याशिवाय पराभव मान्य करणार नाही. मी या भीतीवर विजय मिळविल्याशिवाय हार नाही मानणार. जर हे विश्वच सुरक्षित नसेल तर मी माझा लढा सुरू ठेवेन.’’

[jnews_block_8 first_title=”Read more at : ” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”98″]

Your Content Goes Here

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!