• Latest
  • Trending
मुहम्मद अली दि ग्रेटेस्ट

या बॉक्सरने केले 37 प्रतिस्पर्धी नॉकआउट

December 19, 2021
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Thursday, March 23, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

या बॉक्सरने केले 37 प्रतिस्पर्धी नॉकआउट

जगातला सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून मुहम्मद अली ‘दि ग्रेटेस्ट’ या नावानेही ओळखला जातो. मात्र, त्याचा मुष्टियोद्धा प्रवास थक्क करणारा आहे. 

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 19, 2021
in Boxing, Inspirational Sport story
2
मुहम्मद अली दि ग्रेटेस्ट
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email
जगातला सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून मुहम्मद अली ‘दि ग्रेटेस्ट’ या नावानेही ओळखला जातो. मात्र, मुष्टियोद्धा बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. 

अमेरिकेतील लुईसविले, केंटकी येथे १७ जानेवारी १९४२ रोजी जन्मलेल्या मुहम्मद अली (दि ग्रेटेस्ट) याचे मूळ नाव कॅसिअस मार्सेलस क्ले (ज्यु.) असे होते. हे नाव त्याच्या वडिलांचे होते. वडिलांच्या नावापुढे सीनिअर, तर अलीच्या नावापुढे ज्युनिअर एवढाच काय तो नावात फरक होता. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुहम्मद अलीचे वडील फलक रंगविण्याचे काम करायचे. यातून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह व्हायचा. बालपणापासूनच मुहम्मद अली मजबूत शरीरयष्टीचा होता. लहानपणी एकदा त्याची सायकल चोरीला गेली. त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या वेळी तेथे असलेले पोलिस अधिकारी जो मार्टिनला सांगितले, की जेव्हा तुम्ही चोराला पकडाल तेव्हा त्याला माझ्या हवाली करा. मी त्याला चांगलाच बुकलून काढतो. तेव्हा जो मार्टिनने त्याला सल्ला दिला, की तू आधी बॉक्सिंग शिकला तरच तुला चोराची धुलाई करता येईल. पुढे जो मार्टिनच त्याचा गुरू बनला आणि त्यांनी मुहम्मद अलीला बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले. त्याला त्यातले बारकावे शिकविले. सहा आठवड्यांतच अलीने पहिला सामना जिंकला. नंतर चार वर्षे त्याने कटमन चुक बोडाक यांच्याकडून बॉक्सिंगचे धडे गिरवले.

40 गुलांमांना केले मुक्त

गुलामीविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्याला वडिलांकडून मिळाली. त्यामुळेच त्याने आपल्या कारकिर्दीत ४० गुलामांना मुक्त केले होते. त्याने गुलामीविरोधी वृत्तपत्राचे संपादनही केले. अलीने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला. तोपर्यंत तो ‘कॅसिअस क्ले’ या नावानेच ओळखला जात होता. क्ले या नावात त्याला गुलामी वाटत होती. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतरही त्याने निश्चित असे नाव धारण केले नव्हते. त्यामुळे जोपर्यंत नवे नाव धारण करीत नाही तोपर्यंत माझ्या नावात ‘कॅसिअस क्ले’ ऐवजी ‘कॅसिअस एक्स’ असेच असेल. अखेर ६ मार्च १९६४ रोजी इस्लाम धर्माचे नेते अलीजाह मुहम्मदने त्यांचे नाव मुहम्मद अली असे ठेवले. आज हे नाव बॉक्सिंग विश्वात अजरामर झाले आहे. मुहम्मद अलीने कारकिर्दीतील ६१ लढतींपैकी ५६ लढतींमध्ये विजय मिळवला आहे. यातील ३७ लढतींत त्याने प्रतिस्पर्ध्यांना नॉकआउट केले आहे. केवळ पाच लढतींमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्याने अमेरिकेलाही जुमानले नाही

१९६७ मध्ये व्हिएतनाम युद्धात अलीने धार्मिक कारणामुळे अमेरिकी सेनेकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. एवढेच नाही, तर त्याचा बॉक्सिंग परवानाही निलंबित करीत त्याचे सर्व किताब काढून घेण्यात आले. पाच वर्षे त्याला जेलमध्ये काढावी लागली. याशिवाय दहा हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला. बंदी हटवल्यानंतर १९७० मध्ये जोरदार पुनरागमन करीत जेरी क्वेरीला नॉकआउट केले होते. मुहम्मद अली उत्तम मुष्टियोद्धा होताच, मात्र रिंगच्या बाहेर त्याने अखेरपर्यंत वर्णभेदाविरुद्धही लढा दिला. तीन जून २०१६ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी पार्किसनच्या आजाराने त्याने जगाचा निरोप घेतला. अलीचा वारसा आता त्याची मुलगी लैला अली चालवत आहे.

मुहम्मद अलीविषयी हे ऐकले आहे का?
मुहम्मद अली (दि ग्रेटेस्ट) यांचा जन्म १७ जानेवारी १९४२ रोजी झाला.
मुहम्मद अली यांचे कॅसियस क्ले ज्युनिअर हे जन्मनाव. १९७५ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर ३० वर्षांनी सुफिझमचा रस्ता धरला.
मुहम्मद अलीची अनेक टोपण नावे होती. दि ग्रेटेस्ट, दि पीपल्स चॅम्पियन्स, दि लुइसविले लिप ही नावे त्यापैकी अधिक लोकप्रिय होती.
१९७१ मध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने त्यांना सुनावलेली शिक्षा मागे घेतली. व्हिएतनामविरुद्ध अमेरिकी सेनेकडून लढण्यास त्यांनी नकार दिला होता. या निर्णयामुळे जे युद्धाच्या विरोधात होते त्यांचा तो नायक बनला होता. 
युद्धात सहभाग घेण्यास नकार दिल्याने मुहम्मद अली यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर त्याने जिंकलेले सर्व किताब काढून घेण्यात आले होते.
वयाच्या बाराव्या वर्षी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये त्यांनी पहिल्यांदा पाऊल ठेवले. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी १९६४ मध्ये सोनी लिस्टनला पराभूत करीत जागतिक हेविवेट चॅम्पियनशिपचा किताब जिंकला.
मुहम्मद अली (दि ग्रेटेस्ट) यांनी चार विवाह केले होते. त्यांना सात मुली आणि दोन मुलगे होते. यातील लैला अली या त्यांच्या मुलीनेच त्यांच्या बॉक्सिंगचा वारसा पुढे नेला. 

या चार खेळाडूंची कहाणी बदलून टाकेल तुमचे आयुष्य

Follow on Facebook page

Read more at:

रजनी नागेश लिमये
All Sports

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump
All Sports

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023
All Sports

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार
All Sports

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक
All Sports

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष
All Sports

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
जगातील सर्वात मोठे जंगल कोणते?

जगातील सर्वात मोठे जंगल कोणते?

Comments 2

  1. Unknown says:
    3 years ago

    Very nicely written informative article

    Reply
  2. Mahesh Pathade says:
    3 years ago

    thank you so much

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!