• Latest
  • Trending

फुटबॉलपटूंनी आळवले निषेधाचे सूर…

July 28, 2020
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
लवलिना बोर्गोहेन भारतीय बॉक्सिंग

2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

December 5, 2022
कतार फिफा वर्ल्ड कप

कतार फिफा वर्ल्ड कप वेळापत्रक 2022

November 21, 2022
Thursday, February 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

फुटबॉलपटूंनी आळवले निषेधाचे सूर…

Mahesh Pathade by Mahesh Pathade
July 28, 2020
in All Sports, Football, sports news
2
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email
Justice for George Floyd
Justice for George Floyd 
Team Kheliyad
Justice for George Floyd | एकेकाळचा शालेय स्तरावरील उत्तम फुटबॉल आणि बास्केटबॉलपटू, मात्र गरिबीमुळे नोकरीसाठी मिनीयापोलिस शहरात आलेल्या जॉर्ज फ्लॉयड | George Floyd | याचा मृत्यू चटका लावून गेला आहे. अमेरिकेतील गोऱ्या पोलिसांनी फ्लॉयडची हत्या केल्यानंतर संपूर्ण विश्वात संतापाची लाट पसरली. अनेक खेळाडूंनी मैदानातच विरोधाचे सूर आळवले. निषेध नोंदविणाऱ्या खेळाडूंमध्ये बहुतांश फुटबॉलपटू आहेत, ज्यांनी उघडपणे मैदानातच निषेध व्यक्त केला. अशी धमक मात्र इतर खेळांमध्ये दिसली नाही. वर्णद्वेषाची कीड खेळांतही पाहायला मिळते. आफ्रिकन फुटबॉलपटूंना तर या वर्णद्वेषाचा अनेकदा सामना करावा लागला. क्रिकेटमध्येही काही खेळाडूंची अवहेलना झाली आहे. मात्र क्रिकेटविश्वात कोणीही याविरुद्ध बोलण्यास तयार नाहीत. फुटबॉलपटूंनी मात्र कुणाचीही तमा न बाळगता निधड्या छातीने निषेधाचे सूर आळवले आहेत, ज्याचे कौतुक आता दस्तूरखुद्ध फिफानेही केले आहे. त्यामुळे निषेधाचे सूर आणखी उमटणार, यात शंका नाही.

या चार युवा फुटबॉलपटूंनी घडविली क्रांती


बर्लिन
अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड george floyd | यांचा मृत्यू आणि पोलिसांनी केलेली कृष्णवर्णीयांची हत्या यामुळे युरोप खंडात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. अमेरिकेत हिंसाचार भडकला आहे. याचे पडसाद आता खेळातही जाणवायला लागले आहेत. जर्मनीतील बुंदेसलीगाच्या चार युवा फुटबॉलपटूंनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
इंग्लंडचा २० वर्षीय विंगर जाडोन सांचो winger jadon sancho |, मोरोक्कोचा २१ वर्षीय अश्रफ हकिमी achraf hakimi आणि २२ वर्षीय मार्कस थुरम marcus thuram | यांनी रविवारी मैदानावरच कृष्णवर्णीयांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी शाल्केचा अमेरिकी मिडफील्डर वेस्टन मॅकेनीने Weston McKennie | विरोध दर्शवला होता. बोरुसिया डार्टमंडविरुद्ध हॅटट्रिक नोंदविणारा सांचो याने पहिला गोल नोंदविल्यानंतर अंगातून जर्सी काढली. त्याच्या टी- शर्टवर हाताने लिहिले होते, ‘जस्टिस फॉर जॉर्ज फ्लॉइड.’’ Justice for George Floyd |

निदर्शने केली म्हणून हंगेरी महासंघाने फुटबॉलपटूला सुनावले


बुडापेस्ट
गोल केल्यानंतर शर्ट काढून टी-शर्टवरील जस्टिस फॉर जॉर्ज फ्लॉयड Justice For George Floyd | ची घोषणा देणाऱ्या टोकमक एनगुएन Tokmac Nguen | या मूळच्या आफ्रिकन खेळाडूला हंगेरी फुटबॉल संघाने समज दिली.
केनियाच्या शरणार्थी शिबिराज टोकमक एनगुएनचा जन्म झाला आहे. त्याचे आईवडील दक्षिण सुदानमधील होते. मात्र, एनगुएन नॉर्वेत वाढला. पुस्कास एकाडेमिया Puskas Akademia | क्लबविरुद्ध 31 मे 2020 मध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात 1-1 अशी बरोबरीची स्थिती असताना एनगुएनने फेरेनकवारोसकडून  Ferencvaros | गोल केला होता. महासंघाच्या शिस्तपालन समितीने 1 जून रोजी आदेश काढला, की जर एनगुएनने भविष्यात असं वर्तन केलं तर त्याला तत्क्षणी शिक्षा केली जाईल. मात्र, फिफाने स्पष्टपणे सांगितले, की जर कोणी जॉर्ज फ्लॉयडच्या समर्थनार्थ निदर्शने करीत असेल तर त्या खेळाडूंवर कोणतीही बंधने किंवा शिक्षा लादू नये.

शिक्षा नाही, तर कौतुक करा!


वॉशिंगटन
फिफाचे अध्यक्ष जियानी इनफँटिनो Gianni Infantino | यांनी सांगितले, की सामन्यादरम्यान जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूप्रकरणी निषेध करणाऱ्या बुंदेसलीगातील खेळाडूंना शिक्षा नाही, तर त्यांचे कौतुक केले पाहिजे. जर्मनीतील बुंदेसलीगा स्पर्धेत चार युवा फुटबॉलपटूंनी अमेरिकेतील फ्लॉयडच्या मृत्यूनंतर न्यायाची मागणी केली होती.
इंग्लंडचा 20 वर्षीय विंगर जाडोन सांचो, मोरोक्कोचा 21 वर्षी राइट बॅक अश्रफ हकिमी आणि 22 वर्षांचा मार्कस थुरम यांनी ३१ मे २०२० रोजी मैदानावरच निषेधाचे सूर आळवले होते. यापूर्वी शाल्केचा अमेरिकी मिडफिल्डर वेस्टन मॅकेनी यानेही विरोध प्रदर्शन केले होते. बोरुसिया डार्टमंडविरुद्ध हॅटट्रिक नोंदविणारा सांचो याने पहिला गोल केल्यानंतर अंगातली जर्सी काढली होती. त्याच्या टी- शर्टवरील बाह्यांवर लिहिले होते ‘ जस्टिस फॉर जॉर्ज फ्लॉयड.’’ Justice For George Floyd | त्यामुळे त्यांची तक्रारही करण्यात आली होती.
ट्विटरवर त्यांनी लिहिले आहे, की ‘‘पहिली व्यावसायिक हॅटट्रिक. कटू-गोड अनुभव. कारण जगभरात इतरही काही महत्त्वाच्या घटना घडत आहेत. आपण त्यावर आपले मत व्यक्त केले पाहिजे. सर्वांनी एक होऊन न्यायासाठी लढायला हवं.’’
इनफँटिनो यांनी सांगितले ,‘‘यात कोणताही संशय नाही, की बुंदेसलीगा सामन्यांत प्रदर्शन करणाऱ्या या खेळाडूंना अजिबात शिक्षा होऊ नये. कारण ते कौतुकास पात्र आहेत.’’ फिफाद्वारे केलेले हे विधान फिफाच्या सर्वच 211 सदस्यदेशांना पाठवले जाणार आहे. युरोपीय फुटबॉलची प्रतिष्ठित यूएफा स्पर्धेतही फ्लॉयड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

खेळाडूंना आम्ही शिक्षा करणार नाही ः जर्मनी


फ्रँकफर्ट
जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचे पडसाद जगभर उमटल्यानंतर मैदानावर निषेध नोंदविणाऱ्या खेळाडूंची संख्याही वाढत आहे. अशातच हंगेरीतील एका स्पर्धेत जॉर्ज फ्लॉयडच्या खुनाचा निषेध नोंदविणाऱ्या फुटबॉलपटूंना हंगेर फुटबॉल महासंघाने सुनावले होते. त्या वेळी फिफाने या खेळाडूंचे वर्तन योग्य असल्याचे समर्थन केले होते. फुटबॉलची सर्वोच्च संघटना फिफा या खेळाडूंच्या पाठीशी राहिल्यानंतर अनेक फुटबॉल महासंघानेही आपल्या भूमिकेत बदल केला आहे. जर्मन सॉकर महासंघाने DFB | सांगितले, की जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर निदर्शने करणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करणार नाही.
जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अनेक खेळाडूंनी आपल्या कपड्यांवर संदेश लिहिले होते. महासंघाचे अध्यक्ष फ्रिट्ज केलेर fritz keller | यांनी सांगितले, ‘‘डीएफबी कोणत्याही वर्णद्वेष, भेदभाव किंवा हिसेंच्या विरुद्ध उभा राहिला आहे. सहिष्णुता, मोकळेपणा आणि विविधतेसोबत डीएफबीची विचारधार आहे. हे सिद्धान्त डीएफबीच्या नियमांतही आहेत. त्यामुळे खेळाडूंनी केलेल्या निषेधाचं आम्हीही समर्थन करतो.’’
केलेर यांनी आपल्या या विधानात चार खेळाडूंची नावे घेतली होती, ज्यांनी वर्णद्वेषाचा धिक्कार केला होता. फ्लॉयडला न्याय देण्यास समर्थन दिले होते. हे चार खेळाडू होते, अश्रफ हकिमी, जेडन सांचो, वेस्टन मॅकिनी आणि मार्कस थुराम. भविष्यात कोणत्याही विरोधाबाबत आमची हीच भूमिका राहील. जर्मनीच्या या भूमिकेचे फिफानेही समर्थन केले आहे.

Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

क्रिकेटवीरांनो, तुम्ही कधी बोलणार?

Comments 2

  1. Pingback: अवघ्या ३९ व्या वर्षी भारताचे माजी फुटबॉलपटू मनितोम्बी यांचे निधन - kheliyad
  2. Pingback: Indian Football | यंदा भारतीय फुटबॉल संघ स्पर्धेविना! - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

LEGAL

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!