Footballsports news

Indian Football | यंदा भारतीय फुटबॉल संघ स्पर्धेविना!

यंदा भारतीय फुटबॉल संघ स्पर्धेविना!

खेळियाड


फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये होणार आहे. मात्र, करोना महामारीमुळे ‘फिफा’ने या स्पर्धेची पात्रता फेरी यंदा २०२१ या वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्याचा फटका भारतीय फुटबॉलला Indian Football | बसला आहे. भारतीय फुटबॉल यंदा एकही स्पर्धा खेळू शकणार नाही.

आशियाई फुटबॉल परिसंघाने (Asian Football Confederation) २०२२ ची वर्ल्डकप आणि २०२३ मधील आशिया कपसाठी यंदा पात्रता स्पर्धा घेणार होता. 

ही पात्रता स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२० मध्ये होणार होती. मात्र, करोना महामारीमुळे पुरुष गटातील ही पात्रता स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.

भारताने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०१९ मध्ये मस्कतमध्ये ओमानविरुद्ध खेळला होता. हा संयुक्त पात्रताफेरीचा सामना होता. या सामन्यात भारताला ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

आता पात्रताफेरीचे सामनेच स्थगित झाल्याने भारत फिफा वर्ल्डकपच्या पुढच्या फेरीत दाखल होण्याच्या शर्यतीतूनच बाहेर पडला आहे. मात्र, २०२३ च्या आशिया कपसाठी पात्रताफेरीत सहभागी होण्याची भारताची आशा कायम आहे.

फिफा वर्ल्डकपची यंदाची पात्रताफेरी ८ ऑक्टोबरमध्ये होणार होती. यात भारतीय फुटबॉल संघासमोर कतारचे आव्हान होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध, नंतर बांगलादेशविरुद्ध भारताला खेळायचे होते.

भारत गटात तिसऱ्या स्थानावर राहिला, तर २०२३ च्या आशिया कप पात्रताफेरीसाठी थेट प्रवेश करता येईल.


हेही वाचा… फुटबॉलपटूंनी आळवले निषेधाचे सूर


फिफा आणि एएफसीने सांगितले, ‘‘अनेक देशांमध्ये करोना महामारीचा फैलाव वाढत आहे. सध्याची स्थिती पाहता, फिफा आणि आशियाई फुटबॉल परिसंघाने पात्रताफेरीचे सामने स्थगित केले आहेत. 

कतारमध्ये २०२२ मध्ये फिफा विश्व कप, चीनमध्ये २०२३ मध्ये एएफसी आशियाई कप होणार आहे. या स्पर्धांसाठी पात्रताफेरीचे सामने आता २०२१ मध्येच खेळविण्यात येतील. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे हे सामने ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२० मध्ये होणार होते.’’  

फिफा आणि एएफसीने सांगितले, की करोना महामारीत खेळाडूंची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळेच यंदाचे पात्रताफेरीचे सामने स्थगित करण्यात आले आहेत.  नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

एकूण पात्रताफेरीच्या सामन्यांत भारत सध्या पाच सामन्यांत तीन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सर्वाधिक १३ गुणांसह कतार पहिल्या, तर ओमान ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

आशिया खंडात पात्रताफेरीतील आठ गटांतील विजेते आणि चार सर्वोत्कृष्ट उपविजेत्या अशा एकूण १२ संघांना फिफा वर्ल्डकपच्या अंतिम पात्रताफेरीत स्थान दिले जाणार आहे. 

वर्ल्डकप आशियाई पात्रताफेरीच्या दुसऱ्या टप्प्यात ४० देशांनी सहभाग घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!