• Latest
  • Trending
Wrath of God: The story of Mossad's revenge

रॅथ ऑफ गॉड : मोसादच्या प्रतिशोधाची कहाणी

April 4, 2021

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 5, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
Wednesday, February 8, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

रॅथ ऑफ गॉड : मोसादच्या प्रतिशोधाची कहाणी

Wrath of God: The story of Mossad's revenge | १९७२ ते १९८८ अशी तब्बल वीस वर्षे ‘मोसाद’ (Mossad) म्युनिक नरसंहाराचा बदला घेत होती. ‘मोसाद’ने (Mossad) कसा घेतला बदला, याची ही पूर्ण कहाणी....

Mahesh Pathade by Mahesh Pathade
April 4, 2021
in All Sports, Sports History
0
Wrath of God: The story of Mossad's revenge
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

रॅथ ऑफ गॉड : मोसादच्या प्रतिशोधाची कहाणी

१९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमधील नरसंहाराने संपूर्ण विश्व हळहळले. इस्राईलचे ११ खेळाडू या नरसंहारात मृत्युमुखी पडले. यामुळे इस्राईल खचला नाही तर पेटून उठला आणि या घटनेतील जबाबदार असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा करण्यासाठी इस्राईलच्या ‘मोसाद’ने ‘रॅथ ऑफ गॉड’ (Wrath of God) या नावाची एक मोहीम आखली. १९७२ ते १९८८ अशी तब्बल वीस वर्षे ‘मोसाद’ (Mossad) या घटनेचा बदला घेत होती. ‘मोसाद’ने (Mossad) कसा घेतला बदला, याची ही पूर्ण कहाणी…. (Wrath of God: The story of Mossad’s revenge)

१९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमधील घटनेनंतर संपूर्ण विश्व हळहळ करीत असले तरी इस्राईल मात्र या नरसंहाराचा बदला घेण्याच्या तयारीत गुंतला होता. ही जबाबदारी अर्थातच मोसाद (Mossad) या गुप्तचर संस्थेवर सोपविण्यात आली. इस्राईलची मोसाद (Mossad) ही संस्था जगातली सर्वांत चाणाक्ष गुप्तचर संस्था मानली जाते. आजपर्यंत या संस्थेने अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या आहेत.

म्युनिक नरसंहारास जबाबदार असलेले मास्टरमाइंड जगासमोर आले नव्हते. इस्राईलने अशा दहशतवाद्यांची एक यादी तयार केली. ‘मोसाद’च्या मोहिमेचं नाव होतं- ‘रॅथ ऑफ गॉड’ (Wrath of God). याचा अर्थ आहे ‘ईश्वराचा कहर!’ या मोहिमेचं लक्ष्य होतं, म्युनिक नरसंहारातील (1972 Munich massacre) जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडणं.

म्युनिक नरसंहारानंतर दोनच दिवसांनी इस्रायली सेनेने सीरिया आणि लेबाननमधील पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या दहा दहशतवादी तळांवर हल्ले केले. यात सुमारे २०० दहशतवादी आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. इस्राईलचा हा तर केवळ ट्रेलर होता. संपूर्ण पिक्चर तर पुढे होता…

एवढ्यावरच इस्राईल थांबला नाही. इस्राईलच्या पंतप्रधान गोल्डा मईर यांनी ‘मोसाद’सोबत (Mossad) गुप्त बैठक घेतली. याच बैठकीत ‘रॅथ ऑफ गॉड’ची (Wrath of God) बीजे रोवली गेली.

‘मोसाद’ने तयार केली दहशतवाद्यांची यादी

म्युनिक नरसंहार करणारे काही दहशतवादी मारले गेले, तर काही पकडले गेले. मात्र, या संपूर्ण कारस्थानामागील मुख्य सूत्रधार वेगळेच होते. ‘मोसाद’ने (Mossad) नेमक्या याच दहशतवाद्यांची एक यादी तयार केली. ‘रॅथ ऑफ गॉड’चं (Wrath of God) लक्ष्य हेच दहशतवादी होते. ‘रॅथ ऑफ गॉड’ (Wrath of God) मोहीम सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच म्हणजे 16 ऑक्टोबर 1972 रोजी ‘मोसाद’ने वाएल झ्वेटर (Wael Zwaiter) याला रोममध्ये ठार केले. तो रात्रीचे जेवण करून हॉटेलमध्ये परतत होता. त्याला काय माहीत आपला मृत्यू आपली वाट पाहत आहे. तो जसा परतला तसे ‘मोसाद’च्या एजंटांनी त्याच्यावर बारा वेळा फायर केले. झ्वेटर हा ‘ब्लॅक सप्टेंबर’शी संबंधित असल्यानेच मोसादने त्याचा काटा काढला. मात्र, पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनने (पीएलओ-PLO) तो या ब्लॅक सप्टेंबरशी संबंधित नसल्याचा खुलासा केला होता. ते काहीही असो, मोसादच्या हिटलिस्टमध्ये जो आला त्याचा खात्मा होणे अपरिहार्यच. ‘मोसाद’चं दुसरं लक्ष्य होता महमूद हमशारी (Mahmoud Hamshari). तो फ्रान्समध्ये पीएलओचं काम पाहत होता. इस्राईलला संशय होता, की हाच तो हमशारी आहे, जो ब्लॅक सप्टेंबरचा म्होरक्या होता. या हमशारीचा 8 डिसेंबर 1972 रोजी काटा काढण्यात आला. त्याची ओळख पटविण्यासाठी ‘मोसाद’च्या (Mossad) एजंटने त्याला पत्रकार असल्याचं भासवत फोन केला, की हमशारी बोलत आहे का? पलीकडून आवाज आला, होय, हमशारी बोलतोय… बस ‘मोसाद’ला एवढी माहिती पुरेशी होती. त्यांनी टेलिफोन लाइनला बॉम्बचा सिग्नल कनेक्ट केला आणि एका धमाक्यात त्याला उडविण्यात आले. पण यात हमशारीचा मृत्यू झाला नाही. मात्र, गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही आठवड्यांतच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ‘मोसाद’च्या मोहिमेतील हा पहिला हल्ला होता, जो फ्रान्समध्ये करण्यात आला. यादीतले दोन जण गेले. आता लक्ष्य होतं यादीतल्या इतर दहशतवाद्यांवर.

हॉटेलमध्ये केला खात्मा

‘ब्लॅक सप्टेंबर’ (Black September) मोहिमेतील दहशतवाद्यांमधील एका संशयितावर आता त्यांनी लक्ष केंद्रित केलं. हुसेन अल बशीर असं या दहशतवाद्याचं नाव. तो मूळचा जॉर्डनचा. मात्र पीएलओची सूत्रे तो सायप्रसमधून हलवायचा. तो सायप्रसची राजधानी निकोसिया (Nicosia) येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. मात्र, बशीर हॉटेलमध्ये फक्त रात्री यायचा आणि दिवसा हॉटेलमधून बाहेर पडायचा. ‘मोसाद’ने त्याला बॉम्बने उडवण्याची योजना आखली.

तसं पाहिलं तर ‘मोसाद’ला बॉम्ब पेरणं विशेष नव्हतं. त्यांनी त्याच्या बिछान्यातच बॉम्ब फिट केला. हे काम चुटकीसरशी झालं, पण ‘मोसाद’समोर प्रश्न हा होता, की आपल्याला समजेल कसं, की नेमका हुसेन अल बशीरच बिछान्यावर आहे? त्यासाठी ‘मोसाद’च्या एजंटने या बशीरच्याच शेजारी एक रूम बुक केली. या रूममधून बशीरच्या रूममध्ये डोकावता येत होतं. रात्री बशीर रूममध्ये झोपायला आला आणि काही वेळातच धमाका झाला. ही घटना होती 24 जानेवारी 1973 च्या रात्रीची. त्याच्या संपूर्ण रूमच्याच ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. हा बशीर सायप्रसमध्ये ‘ब्लॅक सप्टेंबर’चा प्रमुख होता. असं म्हंटलं जातं, की त्याच्या हत्येमागे रशियाची गुप्तचर संस्था केजीबी होती. या ‘केजीबी’शी त्याचे निकटचे संबंध असल्यानेच त्याची हत्या झाल्याचे मानले जाते.

दहशतवाद्यांना शस्त्रे पुरविणाऱ्याला गोळ्या घातल्या…

दहशतवाद्यांची ‘ब्लॅक सप्टेंबर’ (Black September) योजना शस्त्रास्त्रांशिवाय पूर्ण झालीच नसती. त्यांना शस्त्रपुरवठा करणारा ‘मोसाद’च्या हिटलिस्टवरच होता. त्याचं नाव होतं बैरूतमधील विधी महाविद्यालयाचा प्रोफेसर बासिल अल कुबैसी (Basil al-Kubaissi). ‘मोसाद’च्या एजंटांनी त्याच्यावर बारा गोळ्या झाडल्या. बेरूतच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कुबैसीच्या छातीवर आणि डोक्यावर अचूक निशाणा साधत गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. ‘मोसाद’च्या हिटलिस्टवर आता आणखी तीन जण होते. हे तिन्ही दहशतवादी लेबाननच्या सुरक्षाकवचात होते. एरव्ही इतर दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात ‘मोसाद’ला फारसे सायास करावे लागले नाहीत. पण या तिघांसाठी वेगळी मोहीम आखावी लागणार होती. त्यासाठी मोसादने (Mossad) एक विशेष मोहीम आखली. या मोहिमेचं नाव होतं- ‘ऑपरेशन स्प्रिंग ऑफ यूथ’ (Operation Spring of Youth). ही मोहीम ‘रॅथ ऑफ गॉड’चाच (Wrath of God) एक भाग होता.

अशी होती ‘ऑपरेशन स्प्रिंग ऑफ यूथ’ (Operation Spring of Youth)!

ही घटना होती ९ एप्रिल १९७३ च्या रात्रीची. इस्राईलचे काही कमांडो लेबाननच्या समुद्र किनाऱ्यावर एका स्पीडबोटने दाखल झाले. नंतर या कमांडोंना ‘मोसाद’च्या एजंटांनी एका कारमधून लक्ष्याजवळ आणले. सगळे कमांडो सामान्य पोशाखात होते. यातील काही कमांडोंनी महिलांचाही वेश परिधान केला होता. पूर्ण तयारीनिशी या कमांडोंच्या एका पथकाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरलेल्या इमारतीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्राईलच्या सेनेने मुहंमद योसेफ अल नज्जार (Muhammad Youssef al-Najjar) याला ठार केले. हा नज्जार ब्लॅक सप्टेंबरच्या मोहिमेचा लीडर होता. पीएलओचेच आणखी दोन सदस्य कमाल अडवान (Kamal Adwan) आणि कमाल नासेर (Kamal Nasser) याचाही खात्मा करण्यात आला. कमाल नासेर हा पॅलेस्टिनी पुढारी व पीएलओच्या कार्यकारी समितीचा सदस्य होता. या हल्ल्यात लेबाननचे दोन पोलिस अधिकारी, एक इटालियन नागरिक, तसेच नज्जारची पत्नीही ठार झाली. या हल्ल्यात इस्राईलचा एक कमांडोही जखमी झाला, तर दोन जणांना प्राण गमवावे लागले. मात्र, ते संपूर्ण इमारत उद्ध्वस्त करण्यात यशस्वी ठरले. यानंतर आणखी तीन हल्ले करण्यात आले. याच मोहिमेत सायप्रसमधील झाइद मुचासी (Zaiad Muchasi,) याला 11 एप्रिल 1973 रोजी ग्रीसमधील हॉटेलच्या रूममध्ये बॉम्बने उडवले.

मोसादचा प्रतिशोधाचा अग्नी अद्याप धगधगत होता. ते आता मोहम्मद बौदिया (Mohammad Boudia) याच्या मागावर होते. अल्जिरियात जन्मलेला हा बौदिया ब्लॅक सप्टेंबर मोहिमेचा संचालक होता. 28 जून 1973 रोजी कारमधील सीटखाली बॉम्ब ठेवून त्याचा खात्मा करण्यात आला.

मोसादच्या मोहिमा यशस्वी ठरत असल्या तरी त्यात कधी कधी त्रुटीही राहायच्या. काही वेळा माहिती चुकीचीही मिळायची. काही घटना तर त्यांच्या अंगाशीही आल्या होत्या. झालं काय, की मोसाद ही संस्था प्रतिशोधाने पेटलेली होती. ते आता अली हसन सालामेह (Ali Hassan Salameh) याच्या शोधात होते. त्याचं रेड प्रिन्स (Red Prince) असं टोपणनाव ठेवलं होतं. मोसाद ज्या दहशतवाद्यांच्या मागावर असायचे त्याला टोपणनाव ठेवायचे. हेतू हाच, की जरी ही माहिती लिक झाली, तरी या नावाची व्यक्ती नेमकी कोण, याचा थांगपत्ता लागत नसायचा. मात्र हा सालामेह म्युनिक नरसंहाराशी संबंधित नसल्याचा दावा केला जात आहे. या सालामेहचा इतर अनेक हल्ल्यांमध्ये हात होता. त्यामुळे तो म्युनिक नरसंहारात सहभागी होऊ शकला नसल्याचे म्हंटले जाते.

सालामेहने मोसादला दिली हुलकावणी

मोसादचा संशय होता, की सालामेह नॉर्वेतील लिल्लेहॅमर या छोट्याशा शहरात असावा. 21 जुलै 1973 रोजीची ही घटना आहे. हे प्रकरण लिल्लेहॅमर प्रकरण म्हणूनही ओळखलं जातं. मोसादने सालामेह समजून मोरोक्कन वेटर अहमद बौचिकी (Ahmed Bouchiki) यालाच गोळ्या घालून ठार केले. मात्र, नंतर समजले, की तो सालामेह नसून बौचिकी नावाचा एक वेटर होता. तिथल्या स्थानिक पोलिसांनी मोसादच्या तीन एजंटांना ताब्यात घेतलं. यात दोन महिलांचा समावेश होता. यात मोसादच्या पथकाचा प्रमुख मायकेल हजारी (Michael Harari) याचाही समावेश होता. मात्र, तो इस्राईलला पळून जाण्यात यशस्वी ठरला. उर्वरित पाच जणांची खुनाच्या आरोपाखाली कारागृहात रवानगी झाली. मात्र 1975 मध्ये त्यांना सोडण्यात आल्याने ते मायदेशी इस्राईलला परतू शकले. व्हिक्टर ओस्ट्रोवस्कीचा दावा आहे, की सालामेह यानेच स्वतःविषयी चुकीची माहिती मोसादपर्यंत पोहोचवत होता. मोसादला हे नंतर समजले. मोसादसारख्या चाणाक्ष संस्थेलाही अशाही प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे.

जानेवारी 1974 ची ही घटना आहे. मोसादच्या एजंटांना माहिती मिळाली, की सालामेह 12 जानेवारी रोजी स्वित्झर्लंडमधील एका चर्चमध्ये पीएलओच्या नेत्यांना भेटायला येणार आहे. माहिती लागताच मोसादचे एजंट स्वित्झर्लंडमध्ये सक्रिय झाले. दोन मारेकरी चर्चमध्ये आले.त्याच वेळी आणखी तीन अरब तेथे आले. त्यापैकी एकाने अचानक शस्त्र बाहेर काढले आणि तिघांवरही गोळ्या घालत ठार केले. मोसाद चर्चमध्ये सालामेहला शोधत होते, पण तो कुठेही आढळला नाही. काही वेळातच मोसादने तेथून काढता पाय घेतला नि मोहीम स्थगित केली.

बदला संपला नव्हता…

मोसादचे एजंट्स जगभरात जिथे कुठे दहशतवादी लपून बसले, तेथे जाऊन एकेकाला यमसदनी धाडत होते. मात्र बदला संपला नव्हता. त्यांच्या हिटलिस्टवर आणखी काही जणांचा समावेश होता. त्यांना यमसदनी धाडल्याशिवाय ‘मोसाद’ स्वस्थ बसणार नव्हती. जोपर्यंत या हिटलिस्टमधील सर्व दहशतवादी मारले जात नाही, तोपर्यंत  ‘रॅथ ऑफ गॉड’ (Wrath of God) मोहीम थांबणार नव्हती. बरीच वर्षेही उलटली होती. अनेक जण ‘म्युनिक नरसंहार’ विसरले असतील; पण इस्राईलमध्ये या वेदना अजूनही ताज्या होत्या. हिटलिस्टवरील दहशतवादी टप्प्याटप्प्याने ‘मोसाद’ने टिपले. यातील अनेकांना कोणी ठार केले हे गुलदस्त्यातच राहिले.

‘मोसाद’च्या मोहिमेत असे मृत्युमुखी पडले दहशतवादी…

28 जून 1973

‘ब्लॅक सप्टेंबर’शी संबंधित मोहम्मद बउदिया याला त्याच्यात कारमधील सीटला बॉम्ब लावून उडवले.

15 डिसेंबर 1979

अली सलेम अहमद आणि अब्दुल अजिज या दोन दहशतवाद्यांची सायप्रसमध्ये हत्या करण्यात आली.

17 जून 1982

पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या दोन वरिष्ठ सदस्यांना इटलीत वेगवेगळ्या हल्ल्यांत ठार केले.

23 जुलै 1982

पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या पॅरिसमधील कार्यालयातील उपनिदेशक फदल दानी याला कारबॉम्बने उडविण्यात आले.

21 अगस्त 1983

पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनचा आणखी एक सदस्य ममून मेराइश याला ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये ठार केले.

10 जून 1986

पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या डीएफएलपी गटाचा महासचिव खालिद अहमद नजल यालाही ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये ठार करण्यात आले.

21 ऑक्टोबर 1986

पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनचा सदस्य मुंजर अबू गजाला याला कारबॉम्बमध्ये उडविण्यात आले.

14 फरवरी 1988

सायप्रसमधील लिमासोलमध्ये एका कारबॉम्ब हल्ल्यात पॅलेस्टाइनचे दोन नागरिक ठार झाले.

हा सगळा घटनाक्रम पाहिला तर ‘मोसाद’ने जगभरात दहशतवाद्यांचा माग काढत तब्बल २० वर्षे म्युनिक नरसंहारचा बदला घेतला. या ‘रॅथ ऑफ गॉड’ (Wrath of God) मोहिमेत ‘ब्लॅक सप्टेंबर’ (Black September) हल्ल्याचा मास्टरमाइंड अली हसन सालामेह याला संपवण्यासाठी ‘मोसाद’चे (Mossad) तीन प्रयत्न अयशस्वी झाले होते. अखेर 1979 मध्ये त्याचाही काटा काढण्यात आला. एका कारबॉम्बमध्ये तो ठार झाला. ‘मोसाद’च्या (Mossad) वीस वर्षे सुरू असलेल्या या मोहिमेत एकूण ३५ पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचं म्हंटलं जातंय. मायदेशातल्या आपल्या निष्पाप खेळाडूंना गमावल्यानंतर इस्राईलने घेतलेला हा बदला ‘रॅथ ऑफ गॉड’ (Wrath of God) या नावाने अजरामर झाला आहे. इस्राईल या देशाचं भौगोलिक स्थान पाहिलं तर संपूर्ण देश शत्रूंनी वेढलेला आहे. मात्र, हा देश शांत डोक्याने आपल्यावरील हल्ल्यांचा बदला घेते. त्याचा ना कुठे गाजावाजा होतो, ना कशाची टिमकी वाजवली जाते. 

Follow us:


(समाप्त)

Read more at:

All Sports

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 5, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी
All Sports

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया
All Sports

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप
All Sports

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Tags: 1972 Munich massacreWrath of God: The story of Mossad's revenge
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

Coronavirus helpline in Nashik

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!