• Latest
  • Trending
why-should-naturalized-players-in-indian-basketball

Why should ‘naturalized’ players in Indian basketball? | भारतीय बास्केटबॉलमध्ये का हवाय ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू?

January 19, 2021

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 5, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
Wednesday, February 8, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

Why should ‘naturalized’ players in Indian basketball? | भारतीय बास्केटबॉलमध्ये का हवाय ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू?

भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार ‘नॅच्युरलाइज्ड’ naturalized players | खेळाडू सहभागी करण्याच्या बाजूने

Mahesh Pathade by Mahesh Pathade
January 19, 2021
in All Sports, Basketball
1
why-should-naturalized-players-in-indian-basketball
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

भारतीय बास्केटबॉलमध्ये का हवाय ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू?

लखनऊ, 17 जानेवारी |

Why should ‘naturalized’ players in Indian basketball? भारतीय बास्केटबॉलमध्ये का हवाय ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू? naturalized players |  भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार आणि अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आलेला विशेष भृगुवंशी याने ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडूचा naturalized players | मुद्दा उपस्थित केला आहे.

या मुद्द्यावरून आता ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players | असावा की नसावा, यावर चर्चेला सुरुवात झाली आहे.

विशेषने देशात बास्केटबॉलला उत्तम व्यासपीठ मिळण्याची आवश्यकता असल्याचे म्हंटले आहे. जगात इतर संघांप्रमाणे भारतातही ‘नॅच्युरलाइज्ड’ naturalized players | म्हणजेच अतिथी खेळाडूंना सहभागी करण्याचं धोरण आखण्याची गरज असल्याचे विशेष म्हणतो.

विशेषने रविवारी (१७ जानेवारी २०२१) सांगितले, की सरकार देशात बास्केटबॉलला basketball | क्रिकेट आणि हॉकीप्रमाणेच लोकप्रिय बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, काही उणिवा जाणवत आहेत.

विशेष म्हणाला, “महाविद्यालयांमध्ये सामान्यपणे बास्केटबॉलचे कोर्ट दिसते, पण या खेळासाठी जे वेडेपण लागतं, ते दिसत नाही. हा वेडेपणा क्रिकेट आणि हॉकीसाठी विशेषकरून दिसतो. ही स्थिती बदलायची असेल तर बास्केटबॉल लीग होण्याची खूप गरज आहे. या शिवाय बास्केटबॉलचे जास्तीत जास्त सामने होण्याचीही गरज आहे. या खेळाला माध्यमांमध्ये स्थान मिळणेही तेवढेच आवश्यक आहे.”

विशेषला उत्तर प्रदेशातील सर्वोच्च ‘लक्ष्मण’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणाला, “आज आपण कबड्डीची प्रो लीग पाहतो. का पाहतो? कारण ही लीग वह टीव्हीवर दिसते. बास्केटबॉल तर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जातो.

हा खेळ आधीपासूनच तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. आता या खेळाला फक्त एका मंचाची गरज आहे, जिथे जास्तीत जास्त बास्केटबॉल खेळला जाऊ शकेल. लोक जसजसे हा खेळ पाहू लागतील तसतसे त्याचे आकर्षण आपोआप वाढले.”

‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players | म्हणजे काय?

‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players |म्हणजे काय? विशेषने ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players | संघात समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावर अधिक जोर दिला आहे. भारताने ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players | अर्थात पाहुण्या खेळाडूला स्थान देण्यासाठी धोरण आखण्याची गरज विशेषने व्यक्त केली आहे.

विशेष म्हणाला, “जर तुम्ही आशियातील अन्य बास्केटबॉल संघ पाहिले, तर जवळपास सर्वच संघांकडे एक तरी ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players | किंवा पाहुणा खेळाडू असतो. जर परदेशातील एखादा चांगला खेळाडू असेल तर त्याला नागरिकत्व देऊन संघात सहभागी करता येते. अशा खेळाडूंना ‘नॅच्युरलाइज्ड खेळाडू’ naturalized players | किंवा ‘पाहुणा खेळाडू’ असे म्हणतात.”

भारतातही असावा ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players |

विशेष म्हणाला, “फुटबॉलचेच उदाहरण घ्यायचे तर या खेळाच्या अनेक संघांत ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players | खेळविला जातो. जर एखाद्या संघात उत्तम स्ट्राइकर, गोलरक्षक नसेल आणि ती उणीव एखादा उत्तम परदेशी खेळाडू भरून काढत असेल तर त्याला परस्परसहमतीने नागरिकत्व देऊन संघात सहभागी करता येऊ शकेल.

जगातील बहुतांश देशांच्या संघांत हे चित्र पाहायला मिळते. भारतात राहणारे अनेक मूळ विदेशी खेळाडू आहेत, ज्यांना भारतासाठी खेळावंसं वाटतं. पण भारतात ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू naturalized players | बाळगण्याचं कोणतंही धोरण नाही.”

गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने विशेषला गौरविण्यात आले होते. पुरस्काराबाबत विशेष म्हणाला, की भारतात बास्केटबॉल खेळाडूला फारसे गृहीत धरले जात नाही.

तो म्हणाला, “मला सप्टेंबर 2020 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. सुमारे 19 वर्षांनंतर एका पुरुष बास्केटबॉलपटूला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यापूर्वी 2001 मध्ये परमिंदर सिंह यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2020 मध्ये मला मिळाला आहे. या दरम्यान दोन महिला बास्केटबॉलपटूंना हा पुरस्कार मिळाला होता. ही स्थिती पाहिली तर एकूणच देशातील बास्केटबॉलचा अंदाज लावता येईल.”

कोविडने घातला खोडा

बास्केटबॉलची लीग सुरू व्हावी, यासाठी भारतीय बास्केटबॉल महासंघ प्रयत्न करीत आहे. मात्र, कोविड महामारीमुळे सगळे ठप्प झाले आहे. आता कोरोना विषाणूची लस आली आहे. मला आशा आहे, की आता सर्व काही पहिल्यापेक्षा चांगले होईल.

Keep up with news and events happening in the emerging game through our Facebook and Twitter pages.

Read more at:

why-should-naturalized-players-in-indian-basketball
All Sports

Why should ‘naturalized’ players in Indian basketball? | भारतीय बास्केटबॉलमध्ये का हवाय ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू?

by Mahesh Pathade
January 19, 2021
nada-bans-two-year-ban-on-basketball-player-bhamra
All Sports

NADA bans two-year ban on basketball player Bhamra | बास्केटबॉलपटू भामरावर दोन वर्षाची बंदी

by Mahesh Pathade
December 25, 2020
All Sports

मला श्वास घेता येत नाही…!

by Mahesh Pathade
January 29, 2023
कोबे ब्रायंट
All Sports

कोबे ब्रायंट : कुटुंबवत्सल पिता आणि महान खेळाडूची अकाली एक्झिट

by Mahesh Pathade
December 10, 2021
Tags: Indian basketballnaturalized playersWhy should ‘naturalized’ players in Indian basketball?भारतीय बास्केटबॉलमध्ये का हवाय ‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडूविशेष भृगुवंशी‘नॅच्युरलाइज्ड’ खेळाडू
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

kheliyad chess puzzle 1A

Comments 1

  1. Pingback: Why should ‘naturalized’ players in Indian basketball? - KheliyadSports

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!