All SportsIPL

Who will win today? Delhi or Bengaluru? | आज कोण जिंकणार? बेंगलुरू की दिल्ली? 

 

Who will win today? Delhi or Bengaluru?

आज कोण जिंकणार? बेंगलुरू की दिल्ली? 

अबुधाबी, एक नवंबर |

Who will win today? Delhi or Bengaluru? | आज कोण जिंकणार, बेंगुलूरू की दिल्ली, हाच एक प्रश्न आहे. दिल्ली कॅपिटल्स Delhi Capitals | आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (Royal Challengers Bengaluru) हे दोन संघ आज, 2 नोव्हेंबर रोजी आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

दोन्ही संघांना पहिल्या दोन क्रमांकात यायचं आहे. खरं तर दोघांनाही पहिल्या दोन स्थानांपेक्षा प्लेऑफमध्ये Play-off | आपलं आव्हान राखण्याचंच आव्हान आहे. कारण दोन्ही संघांनी एकामागोमाग पराभव पत्करले आहेत.

दिल्ली DC | आणि बेंगलुरू RCB | या दोन्ही संघांसमोर पराभवाची मालिका तोडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल. कारण पराभवाची मालिका दोन्हीपैकी एकाच संघाला खंडित करता येणार आहे. 

उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळावी तसं दिल्ली आणि बेंगलुरू संघांची अवस्था झाली आहे. मुंबईचे कडवे प्रतिस्पर्धी म्हणून दिल्लीकडे पाहिलं जात होतं.

प्लेऑफमध्ये मुंबईपाठोपाठ दिल्लीचंच स्थान असेल, अशीच अटकळे बांधली जात होती. मुंबई आणि दिल्लीव्यतिरिक्त उर्वरित दोन संघ कोणते हाच प्रश्न होता.

दिल्लीला दुर्दैवाचा फेरा

दुर्दैव पाहा, दिल्लीला आता अस्तित्वासाठी झगडावं लागत आहे. दिल्लीने सलग चार सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडे आरसीबीनेही तीन सामने गमावले आहेत. हा खेळ किती अनिश्चिततेचा आहे याचं हे उत्तम उदाहरण. ड्रीम इलेव्हनचा संंघ तयार करावा इतकं सोपं नाही याची प्रचीती येते.

आता हेच पाहा ना, इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL 2020) चेन्नईचं आव्हान केव्हाच संपुष्टात आलं आहे. मात्र, जाता जाता त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबचंही आव्हान संपुष्टात आणलं. आता हे दोन्ही संघ रिकाम्या खुर्च्यांचा ताबा घेतील. 

दिल्ली आणि आरसीबी यापैकी कुणीही चेन्नई, पंजाबच्या रांगेत बसण्यास इच्छुक नाही. त्यामुळेच हा सामना अटीतटीचा होईल.

या दोन्ही संघांना फायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी दोन संधी मिळू शकतील. अर्थात, यातली दुसरी संधी जर-तरच्या भरवशावर असेल. 

दिल्ली आणि आरसीबी या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो संघसुद्धा फायनल खेळू शकेल. पण ते इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.

‘‘आम्हाला फलंदाजीचा क्रम बदलावा लागेल. फलंदाजीत बेपर्वाईचं धोरण अवलंबावं लागेल. आता फार विचार करण्यात काही हशील नाही.’’

– श्रेयस अय्यर, कर्णधार, दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली पहिल्या चार टप्प्यांत मजबूत संघ म्हणूनच पुढे आला होता. नंतर कुणाची नजर लागली कुणास ठावूक, पण त्यांचं नाट्यमयरीत्या पतन सुरू झालं.

इतकं पतन झालं, की दिल्लीने शेवटचा विजय कधी मिळवला, हेही आता कुणाला आठवत नसेल. तुम्हाला धक्का बसेल, पण दिल्लीने अखेरचा विजय दोन आठवड्यांपूर्वी मिळवला होता. 

दिल्लीची फलंदाजी मजबूत आहे. मात्र, आता त्यांच्या फलंदाजीची धार बोथट झाली की काय…. गेलेली ताकद पुन्हा मिळवा असं कुठं दुबईतल्या भिंतींवर वाचायला मिळालं तर दिल्लीने तिथंही एकदा जाऊन यावं असं उगाच वाटतं. अर्थात, बायो बबलचं उल्लंघन होणार नसेल तर…

फलंदाजी एकीकडे कुचकामी ठरली तरी त्यांची गोलंदाजीलाही धार राहिली नाही. पहिल्या आक्रमणातच गोलंदाजी ढेपाळत आहे. दिल्लीच्या सलामी जोडीचेही ग्रह जुळेनासे झाले आहेत. कधी पृथ्वी साव, कधी अजिंक्य रहाणेने शिखर धवनशी जुळवून पाहिलं, पण त्यांच्या कामगिरीत कुठंही सातत्य दिसलं नाही.

ज्याला भरवशाचा सलामीचा जोडीदार बनवावा तो शिखर धवनच तीन सामन्यांत काहीही कमाल करू शकलेला नाही. म्हणायला तेवढं एक शतक ठोकलं होतं. अर्थात, ते आता विस्मरणात गेलं आहे. 

आता मागच्या तीन सामन्यांत त्याच्या धावा पाहिल्या तर काळजी करावी अशी स्थिती आहे. 0, 0, 6 अशी ही त्याच्या तीन सामन्यांतील अनुक्रमे धावांची संख्या आहे. 

दिल्लीची मधली फळी ऋषभ पंतवर अवलंबून आहे. त्याने आतापर्यंतच्या सामन्यांत एकून 274 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट आहे 112.29. मात्र पंतांनीही इतरांसारखंच फलंदाजीचं फारसं काही मनावर घेतलेलं दिसत नाही.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर मात्र स्वच्छंद फलंदाजी करीत आहे. मुंबईने नऊ गडी राखून दणदणीत पराभव केल्यानंतरही श्रेयसच्या बॅटीने हार मानलेली नाही. नेतृत्वाची धुरा खांद्यावर असल्याने त्याला जबाबदारीची जाणीव आहे. 

विराटच्या संघाची स्थिती चिंताजनक

विराट कोहलीच्या आरसीबीला सलग पराभवाने चिंतेने घेरले आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी, 31 ऑक्टोबर रोजी त्यांनी सनरायजर्स हैदराबादने पराभूत केले होते. सलग तीन पराभव पत्करल्यानंतर आता आणखी पराभव संघाला झेपणारा नाही. 

तसाही संघ विराट कोहली आणि एबी डिविलियर्सवरच विसंबून आहे आणि या भरवशाच्या फलंदाजांनाच सूर सापडलेला नाही.

मागचे दोन्ही सामन्यांत या दोघांनाही लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं. 

अॅरोन फिंचऐवजी जोश फिलिपने संघात एंट्री केली आहे. त्यामुळे आघाडीची फळी मजबूत झाली. फिलिपने सुरुवात तर चांगली केली. मात्र, मोठी धावसंख्या उभारण्यात तोही अपयशीच ठरला आहे. 

संयुक्त अरब अमिरातीत सध्या चांगलीच थंडी आहे. त्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकतो, तो क्षेत्ररक्षणालाच प्राधान्य देतो. नंतर फलंदाजी करणे अधिक सोपे जाते.

सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ही रणनीती कोहलीला कामी आली असती. मात्र, इथेच कोहली चुकला. अर्थात, पराभवाच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. 

संभाव्य संघ

दिल्ली कॅपिटल्स

श्रेयस अय्यर (कर्णधार), कॅगिसो रबाडा, मार्कस स्टोइनिस, संदीप लामिछाने, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, एलेक्स केरी, मोहित शर्मा, पृथ्वी साव, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा, एनरिच नॉर्जे, डॅनियल सॅम्स

रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू

विराट कोहली (कप्तान), एबी डिविलियर्स, पार्थिव पटेल, अॅरोन फिंच, जोश फिलिप, क्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उदाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरतसिंग मान, वाशिंगटन सुंदर, पवन देशपांडे, अॅडम झम्पा.

[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”87″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!