All SportsCricketIPL

‘मंकडिंग’ म्हणजे काय? | What is Mankading?

 

‘मंकडिंग’ म्हणजे काय?


Follow us

[jnews_footer_social social_icon=”rounded”]

‘मंकडिंग’ Mankading | हा शब्द क्रिकेटमध्ये ऐकला असेल. मराठीत क्रिकेटमध्ये ‘मंकडिंग’, तर हिंदीत ‘मांकडिंग’ असा शब्दप्रयोग वापरला जातो. मात्र, ‘मंकडिंग’ म्हणजे काय What is Mankading?, हे बऱ्याच जणांना माहीत नाही. हा शब्द नेमका कुठून आला आणि तो कुठे वापरला जातो, याविषयी…

‘मंकडिंग’ Mankading | रन आउट करण्याचा एक प्रकार आहे. मात्र, तो क्रीडाभावनेशी संबंधित नाही. ‘मंकडिंग’ Mankading | हा शब्द वीनू मंकड याच्या नावावरून तयार झाला आहे.

मंकड या आडनावावरून ‘मंकडिंग’, तर हिंदीत हेच आडनाव मांकड असं उच्चारलं जातं. म्हणून हिंदीत ‘मांकडिंग’ असा शब्दप्रयोग आहे.

‘मंकडिंग’ म्हणजे काय? mankading meaning in marathi |


मंकडिंगचा अर्थ mankading means | समजून घेणे आवश्यक आहे. गोलंदाज चेंडू फेकण्याच्या पवित्र्यात असतानाच नॉनस्ट्राइकर फलंदाज धाव घेण्यासाठी तत्पूर्वीच क्रीज सोडतो. अशा वेळी गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच त्याला जेव्हा बाद करतो तेव्हा त्या बाद करण्याच्या पद्धतीला ‘मंकडिंग’ Mankading | असे म्हणतात.

अर्थात, तो चेंडू षटकात गृहीत धरला जात नाही. मग फलंदाज धाव बाद होवो किंवा नाही. जर गोलंदाजाचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, तर अंपायर तो चेंडू ‘डेड बॉल’ म्हणून जाहीर करतो.

मंकडिंग’ Mankading | शब्दप्रयोग केव्हापासून सुरू झाला?


‘मंकडिंग’ Mankading | हा शब्द केव्हा रूढ झाला, याचाही एक इतिहास आहे. वीनू मंकड या भारतीय खेळाडूवरून हा शब्दप्रयोग सुरू झाला असला तरी या नावाचा उद्गाता भारत नाही.

हा शब्दप्रयोग सर्वांत प्रथम सुरू केला ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी. १९४७ मध्ये हा शब्दप्रयोग सर्वांत प्रथम ऑस्ट्रेलियन माध्यमांनी उपयोगात आणला. 

what is mankading?
अष्टपैलू विनोद तथा विनू मंकड

‘मंकडिंग’ Mankading | शब्दप्रयोगाला हा सामना ठरला कारणीभूत


भारतीय संघ १९४७ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या भारतीय संघात वीनू मंकड यांचा समावेश होता. वीनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राउनला एकदा नाही, तर दोन दोन वेळा क्रीज सोडल्यानंतर धावबाद केले होते.

तत्पूर्वी मंकड यांनी बिल ब्राउनला वॉर्निंगही दिली होती. त्या वेळी अशा पद्धतीने धावबाद करणे नवीनच होते. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते डॉन ब्रॅडमन. त्यांनी वीनू मंकड यांच्या धावबाद करण्याच्या पद्धतीला योग्य ठरवले होते.

मात्र, ऑस्ट्रेलियन मीडियाने मंकड यांच्या या धावबाद करण्याच्या पद्धतीवर प्रचंड टीका केली. ‘मंकडिंग’ Mankading | हा शब्दप्रयोग वापरत हेटाळणीही केली.

२०१२ मध्ये ‘मंकडिंग’ Mankading | चा उपयोग


भारताचा रविचंद्रन अश्विन यानेही ‘मंकडिंग’ mankading ashwin | प्रकाराचा उपयोग केला होता. मात्र, त्या वेळीही अशा पद्धतीने धावबाद करण्याबाबत नियम अस्तित्वात आला नव्हता.

२०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ बँक सीरिज झाली होती. त्या वेळी भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या मालिकेत सहभागी झाले होते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात लाहिरू थिरिमाने चेंडू टाकण्यापूर्वीच धाव घेण्यासाठी क्रीज सोडायचा.

त्या वेळी अश्विनने त्याला चेतावनीही दिली होती. मात्र, दुसऱ्या वेळीही असाच प्रकार घडल्यानंतर त्याला धावबाद केले. या मालिकेत भारताचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग होता. त्याने हे अपील मागे घेतले आणि अंपायरने हा चेंडू ‘डेड बॉल’ ठरवला.

मंकडिंग’ आणि वाद


‘मंकडिंग’ Mankading | हा तसा हेटाळणीयुक्त शब्द आहे, जो ऑस्ट्रेलियन मीडियाने १९४७ मध्ये वापरला होता. हा काही शब्दप्रयोग नियम म्हणून आलेला नव्हताच. यावरून अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहिले आहेत.

२०१९ च्या आयपीएल मोसमात IPL Mankading | राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये झालेल्या सामन्यात ‘मंकडिंग’ Mankading |मुळे वाद उद्भवला. पंजाबचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने राजस्थानचा जोस बटलर याला आपल्या १३ व्या षटकात ‘मंकडिंग’ Mankading | पद्धतीने धावबाद केले.

त्या वेळी अश्विनचं हे अखेरचं षटक होतं. या जोस बटलरच्या एका विकेटने संपूर्ण सामन्याचं चित्रच बदललं. कारण जोस बटलरची धडाकेबाज फलंदाजी पाहता राजस्थान सहज जिंकेल अशीच अटकळे बांधली जात होती.

बटलरने ४३ चेंडूंत ६९ धावा केल्या होत्या. यात १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. मात्र, बटलर बाद झाल्याने राजस्थानचा डाव कोलमडला आणि पंजाबविरुद्ध सामना गमवावा लागला. अश्विनने २०१२ मध्येही याच ‘मंकडिंग’ Mankading |चा उपयोग केला होता.

‘मंकडिंग’ Mankading | पद्धत आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरली जाते. मात्र, ‘मंकडिंग’ Mankading | हा शब्दप्रयोग हेटाळणीयुक्त आहे. अर्थात, आता हाच शब्द तेवढ्याच अदबीने घेतला जातो आणि त्या शब्दाला आता मान्यताही आहे.

नियम काय सांगतो? mankading law |


क्रिकेटमधील ४२.१४ च्या नियमानुसार, जेव्हा गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच नॉनस्ट्राइकर फलंदाज क्रीज सोडतो तेव्हा गोलंदाजाला त्याला बाद करण्याची परवानगी आहे. मात्र, हात संपूर्णपणे स्विंग केले नसतील तेव्हाच गोलंदाजाला नॉनस्ट्राइकर फलंदाजाला धावबाद करण्याची परवानगी मिळते.

७० वर्षांनी नियम अमलात! mankading rule in cricket |


क्रिकेट इतका रुढिवादी आहे, की एकविसाव्या शतकातही कालानुरूप नियम बदलले जात नाहीत. एखादा नियम बदलायचा असेल तर त्यासाठी पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो.

‘मंकडिंग’ Mankading |चेही असेच झाले. १९४७ मध्ये वीनू मंकड यांच्या या धावबाद करण्याच्या या पद्धतीला २०१७ मध्ये mankading new rule | मान्यता मिळाली. म्हणजे हा नियम २०१७ मध्ये अमलात आला. तब्बल ७० वर्षांनी हा नियम क्रिकेटच्या कर्मठयोग्यांनी स्वीकारला.

असे असले तरी ‘मंकडिंग’ Mankading | पद्धतीने बाद करणे अनेकांच्या पचनी पडलेले नाही. ज्याप्रमाणे वीनू मंकड यांना टीकेला सामोरे जावे लागले, तसेच अश्विनलाही अनेकांच्या टीका झेलाव्या लागल्या.

[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”65″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!