राजस्थानचा कर्णधार स्मिथला दंड
अबुधाबी | इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना षटकांची गती कमी राखल्याने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथला १२ लाखांचा दंड झाला.
राजस्थान रॉयल्सला ६ ऑक्टोबर २०२० रोजी अबुधाबीमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध ५७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, षटकांची गती न राखल्याने त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
षटकांची गती न राखल्याबद्दल राजस्थानला प्रथमच दंड सोसावा लागला आहे.
यापूर्वी स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरूचा कर्णधार विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरवर षटकांची गती कमी राखल्याबद्दल प्रत्येकी १२ लाखांचा दंड झाला होता.