• Latest
  • Trending
Unbelievable Facts About Selfish Players

खेळातच तुष्टता मोठी

April 28, 2021

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 5, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
Wednesday, February 8, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

खेळातच तुष्टता मोठी

Unbelievable Facts About Selfish Players | खेळात समाधान मानणारे खेळाबाहेर कसे बदलतात... ‘भारत श्री’, ‘आशिया श्री’सारखे मानाचे किताब पटकावणारा शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर याला लाचप्रकरणी नुकतीच अटक झाली.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
April 28, 2021
in All Sports, Other sports, Sports Review
0
Unbelievable Facts About Selfish Players
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

खेळातच तुष्टता मोठी

Unbelievable Facts About Selfish Players |  ‘भारत श्री’, ‘आशिया श्री’सारखे मानाचे किताब पटकावणारा शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर याला लाचप्रकरणी नुकतीच अटक झाली. त्याआधी ऑलिम्पिकपटू मल्ल नरसिंग यादव पोलिस उपअधीक्षकपदाच्या परीक्षेत कॉपी करताना सापडला. मैदानावर जीवतोड मेहनत करून पुढे आलेल्या खेळाडूंनी मैदानाबाहेर यशासाठी असे शॉर्टकट वापरणे धक्कादायक आहे. पण सरकारनेही नोकरीसंदर्भातील धोरणात काही बदल करणे अपेक्षित आहे. 
Follow us:

Unbelievable Facts About Selfish PlayersUnbelievable Facts About Selfish PlayersUnbelievable Facts About Selfish Players
Unbelievable Facts About Selfish PlayersUnbelievable Facts About Selfish PlayersUnbelievable Facts About Selfish Players

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार घेतल्यानंतर एका खेळाडूशी संवाद साधला असता, त्याने एक खंत व्यक्त केली. तो म्हणाला, की पुरस्कार मिळाल्याने अनेक ठिकाणी सत्कारासाठी बोलावले जाते. तेथे गेल्यावर शाल- श्रीफळ देऊन माझा सत्कार होतो. एखाद्या गावात जायचं म्हणजे ते किमान दोनअडीचशे किलोमीटर लांब असतं. त्यासाठी माझा पूर्ण दिवस वाया जातो आणि मिळते काय, तर शाल-श्रीफळ? एवढ्या लांब बोलावले, तर किमान काही रक्कम तरी द्यायला हवी. नाही गेलं तर लोकं म्हणतात, पुरस्कार मिळाल्याने हा लई मोठा झाला!
ही खंत म्हणावी की तक्रार, माहीत नाही. मात्र, ऐकल्यानंतर कोणीही अचंबित होईल. कितीही उंची गाठली तरी खेळाडूने पाय जमिनीवरच ठेवावे. म्हणजेच काय तर खेळात तुष्टता बाळगावी. ‘बुलंदियों पर पहुंचना कमाल नहीं, बुलंदियों पर ठहरना कमाल होता है’ असं म्हणतात ते खोटं नाही. ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना आर्थिक स्थितीने अखेरपर्यंत झुंजवले. मात्र, तरीही त्यांनी मैदान गाजवले. पैसा महत्त्वाचा नाही, तर मेहनत, निष्ठा महत्त्वाची हे विचार त्यांनी कृतीतून रुजवले. त्यांचा विचार आताच्या खेळाडूंना कदाचित खूपच आदर्शवादी वाटत असेल, पण तेच चिरंतन सत्य आहे.
क्रीडा कर्तृत्वावर नोकरी हवी तर त्याचेही काही नियम, संकेत आहेत. ते पाळावेच लागतील. ऑलिम्पिकपटू नरसिंग यादव याने पोलिस उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत कॉपी केली. ते समर्थनीय अजिबात नाही. निवड चाचणीला खेळाडूंना तसेही सामोरे जावेच लागतेच. त्यात कुठे तडजोड असते? मात्र, राज्य सरकारनेही खेळाडूंची बाजू समजून घेतली पाहिजे. इतर राज्यांत जोपर्यंत खेळाडू मैदान गाजवतो तोपर्यंत सरकार त्याच्यावर कसलंच बंधन लादत नाही. त्याला त्याच्या खेळासाठी जो वेळ द्यावा लागतो, त्याचा विचार सरकारने करायलाच हवा. जर खेळासाठीच खेळाडूला नोकरी दिली तर त्यासाठी परीक्षेचं बंधन कशासाठी?

Unbelievable Facts About Selfish Players

पनवेलचा नायब तहसीलदार असलेला सुहास खामकर याने शरीर कमावताना प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यासाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत, हे त्याच्यासारखा खेळाडूच सांगू शकेल. मात्र, त्याला लाच प्रकरणी अटक होणे हे क्रीडा क्षेत्रासाठी धक्कादायक आहे. त्याने लाच स्वीकारलीच नसल्याने केवळ कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याला अटक करणे अयोग्य आहे, असा दावा शरीरसौष्ठवपटूंचा आहे. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे संघटन सचिव मोहन चव्हाण यांनी खामकर हा दोन संघटनांतील वादाचा बळी ठरल्याचा आरोप केला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये खाबूगिरी सर्वश्रूत आहे. सचोटीने काम करणारा तिथे गुन्हेगार ठरतो. त्यामुळे तो निर्दोष असेलही. मात्र, जे प्रकरण लोकांसमोर आले आहे, त्यामुळे क्रीडा क्षेत्राला नक्कीच धक्का बसला आहे.
खेळ महाग झाले आहेत. त्यामुळेच कोणत्याही खेळात करिअर करणं म्हणजे जुगार झाला आहे. बुद्धिबळसारख्या खेळात तर अवघ्या वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासून प्रशिक्षणाला सुरुवात केली जाते. दक्षिणेकडे हा ट्रेंड सुरू आहे. तोच आता महाराष्ट्रातही आला आहे. महाराष्ट्रातील अनेक मुले बुद्धिबळात करिअर करताना शाळेत शेवटचे दोन-तीन महिने परीक्षेपुरती जातात. इतर दहा महिने स्पर्धांमध्ये गुंतलेली असतात. यात २० ते २५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. बुद्धिबळच नव्हे, तर सर्वच खेळांत ही स्थिती आहे.
स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्यामुळे खेळात करिअर नाही झालं तर काय होईल त्या मुलाचं? शाळाही गेली आणि खेळही! मात्र, कर्तृत्व गाजवल्यानंतर सरकारकडून दखलही घेतली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रकुल विजेत्यांच्या बाबतीत सरकारकडून झालेली दिरंगाई कोणी विसरलेले नाही. त्यांच्या भवितव्याचा विचार सरकारने करायलाच हवा. मात्र, नोकरी स्वीकारल्यानंतर तेथेही खेळासारखे काही नियम असतात याची जाणीव खेळाडूंना असायला हवी. त्यातून कोणाचीही सुटका नाही. खेळाने जेवढे दिले त्यात समाधानी हवे. अर्थात, खेळात तुष्टता मोठी आहे, तरच खेळाडू आणि खेळाचा, त्याच्या शिस्तीचा ऋणानुबंध कायम राहील.
सुहास खामकर निर्दोषच आहे, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने भारताचा लौकिक वाढवला आहे. २०११ मध्ये ज्युनिअर महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी त्याला प्रमुख पाहुणा म्हणून जळगावात बोलावले होते. त्या वेळी रात्री दोनपर्यंत तो स्पर्धास्थळी उपस्थित होता. त्याला लाच प्रकरणात गोवण्यात आले आहे.
– मोहन चव्हाण, संघटन सचिव, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन

Read more at:

All Sports

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 5, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी
All Sports

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया
All Sports

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप
All Sports

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Tags: खेळातच तुष्टता मोठीशरीरसौष्ठवपटू सुहास खामकर
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
change the government trek

‘सरकारी ट्रेक’ बदला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!