All SportsFootball

फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ऐनवेळी बदल

फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ऐनवेळी बदल

तार वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा जेमतेम शंभर दिवसांवर आलेली असताना स्पर्धा कार्यक्रमात ऐनवेळी बदल होण्याची चिन्हे आहेत. यामुळे यजमान कतारने जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) चांगलीच कोंडी केली आहे. यजमानपद दिल्यापासून वादात असलेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेबाबत नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे.

कतारला 12 वर्षांपूर्वी वर्ल्ड कपचे यजमानपद देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी स्पर्धेचा कार्यक्रमही निश्चित झाला. मात्र, संयोजकांनी स्पर्धा एक दिवस अगोदर सुरू करण्याची विनंती केली आहे. खरे तर काही स्पर्धांपासून वर्ल्ड कपचे यजमान सलामीची लढत खेळतात. मात्र, यंदाच्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी चार सामने घेताना कतारची पहिली लढत तिसरी खेळवण्याचे ठरले आहे. ही लढत 21 नोव्हेंबरला होणार आहे.

कतारने आता आपली सलामीची लढत 20 नोव्हेंबरला खेळवण्याची विनंती केली आहे. स्पर्धा कार्यक्रमात बदल करणे भाग पडल्यास त्याबाबत निर्णयाचा अधिकार उच्चस्तरीय समितीचा आहे. या समितीत सहा खंडांच्या महासंघांचे प्रमुख; तसेच ‘फिफा’चे अध्यक्ष असतात. त्यांना आता हा बदलाचा निर्णय घेणे भाग पडणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीची लढत यजमान अन्यथा गतविजेता संघ खेळतो. जर्मनीने 2006 मध्ये स्पर्धा घेताना यजमान संघाची सलामीची लढत सलामीला ठेवली. तेव्हापासून यजमान देशाची सलामीला लढत होण्यास सुरुवात झाली. मात्र, यंदाच्या स्पर्धेतील सलामीची लढत नेदरलँड्स आणि सेनेगल यांच्यात आहे. यापैकी कोणीही गतविजेता नाही अथवा यजमानही नाही. आता ‘फिफा’ची उच्चस्तरीय समिती कतारची विनंती मान्य करील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यांनी वर्ल्ड कपमधील पहिला सामना गतविजेते किंवा यजमान खेळत असल्याची परंपरा आहे, अशा आशयाचे पत्र लिहिले असल्याचे समजते.

काय घडणार

  • वर्ल्ड कपमधील कतार – इक्वेडोर लढत 21 ऐवजी 20 नोव्हेंबरला.
  • सेनेगल-नेदरलँड्स लढत दुपारी 3.30 ऐवजी रात्री 9.30 ला अपेक्षित.
  • इक्वेडोरची लढत एक दिवस अगोदर झाल्यास पूर्वतयारीवर परिणाम.
  • इक्वेडोर संघातील अनेक खेळाडू युरोपियन साखळीत. त्यांना पूर्वी ठरल्यानुसारच ब्रेक असल्याने संघाची पूर्वतयारी कमी.
  • ‘फिफा’ला स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करण्यापूर्वी माध्यम हक्क, पुरस्कर्त्यांबरोबरील करार याचाही विचार करणे भाग.
  • सामना एक दिवस अगोदर झाल्यास अनेकांना कतारच्या प्रवासाच्या कार्यक्रमात बदल करावा लागेल. त्याचे दूरगामी परिणाम

संयोजनातील प्रश्न

  • कतारच्या कडक उन्हाचा खेळाडूंच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची भीती.
  • वर्ल्ड कप फुटबॉल कायम जून-जुलैत होत असते. त्याऐवजी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होत असल्याने व्यावसायिक लीग कार्यक्रमावर परिणाम.
  • स्पर्धेचा कालावधी केवळ 28 दिवस. 32 संघ असूनही हा निर्णय.
  • व्यावसायिक लीगना 12-13 नोव्हेंबर हा शनिवार- रविवार मिळेल; तसेच 26 डिसेंबरच्या ‘बॉक्सिंग डे’च्या लढती होतील, हे विचारात घेऊन कार्यक्रम.
  • कतारमध्ये हॉटेलची चणचण. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड
  • मद्यसेवनाबद्दल अद्याप निर्णय नाही
  • कतारने 2010 मध्ये यजमानपदाच्या शर्यतीत अमेरिकेला हरवले होते. त्या वेळच्या 14-8 असा यजमानपदाच्या निकालात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप.
  • कतारने यजमानपद घेताना जून -जुलैत स्पर्धा होईल आणि त्या वेळी स्टेडियम वातानुकूलित करण्याची ग्वाही दिली होती; पण आता 25 ते 30 अंश तापमान असताना स्पर्धा
  • व्यावसायिक लीगचा कार्यक्रम लक्षात घेऊन ‘फिफा’ने 20 ऐवजी 21 नोव्हेंबरला सुरुवात ठरवली होती.

अखेर फिफाकडून कतारची विनंती मान्य

फिफा (जागतिक फुटबॉल) आणि वर्ल्ड कप फुटबॉल संयोजक कतार स्पर्धा एक दिवस अगोदर सुरू करण्याचा अतिरीक्त खर्चाचे गणित करीत आहेत. त्याचवेळी अचानक वर्ल्ड कप स्पर्धेस शंभर दिवस राहिल्याने त्यानिमित्त होणारे कार्यक्रमच होऊ शकले नाहीत. फिफा तसेच कतारने स्पर्धा 21 ऐवजी 20 नोव्हेंबरला सुरू झाल्यानंतरही पुरस्कर्ते, चाहते, प्रक्षेपक यांचे कमीत कमी नुकसान होईल, अशी ग्वाही 18 ऑगस्ट 2022 रोजी दिली, पण त्याबाबतचा तपशील जाहीर करणे टाळले. फिफा तसेच कतारने स्पर्धेतील सलामीची लढत 21 ऐवजी 20 नोव्हेंबरला होईल, असे जाहीर केले. त्यादिवशी उद्घाटन सोहळा होणार आहे आणि कतार तसेच इक्वेडोर यांच्यात सलामीचा सामनाही होईल.

स्पर्धा जेमतेम तीन महिन्यांवर आली आहे आणि अचानक स्पर्धा कार्यक्रमात बदल झाला आहे. हे जास्त गंभीर नाही, पण डोकेदुखी निश्चितच आहे. भविष्यात या स्पर्धेबाबत अचानक काय निर्णय होतील, असेही सांगता येत नाही, अशी टिप्पणी फिफातील काही पदाधिकाऱ्यांनी केली. स्पर्धा एक दिवस अगोदर सुरू करण्याचा निर्णय फिफाने एकमताने घेतला आहे. स्पर्धेतील उद्घाटनाच्या दिवशी यजमान अथवा गतविजेत्यांची लढत होणे योग्यच असते, त्यानुसार हा निर्णय झाला, असे फिफाच्या पत्रकात म्हटले आहे.

दोन सामन्यांच्या वेळेत बदल झाला असला तरी त्यासाठी विकलेली तिकीटे कायम राहणार आहेत, एवढाच दिलासा सध्या देण्यात आला आहे. आम्ही या सामन्याच्या चाहत्यांना साह्य करणार आहोत. त्यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहोत. इक्वेडोरच्या चाहत्यांना आता एक दिवस अगोदर कतारमध्ये यावे लागणार आहे.

पुरस्कर्ते नाराज

स्पर्धा एक दिवस सुरू करण्याचा निर्णय ऐनवेळी घेतल्यामुळे पुरस्कर्ते नाराज झाले आहेत. पुरस्कर्ते आपल्या पाहुण्यांना सामन्यांची तिकीटे देत असतात. त्यांची सर्व व्यवस्थाही करीत असतात. यावेळी पाहुण्यांना कोणतेही प्रश्न येणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र आता या सर्व कार्यक्रमात बदल करण्याचे आव्हान असेल, असे सांगितले जात आहे.

100 दिवसांचे काउंटडाउन सुरू

वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे शंभर दिवसांचे काउंटडाउन शनिवारी सुरू होणार होते, पण ते आता शुक्रवारी सुरूही झाले. स्पर्धेचे काउंटडाउन घड्याळात बदल करण्यात आला. मात्र, शंभर दिवसांपूर्वीचा कोणताही सोहळा झाला नाही. फिफाच्या हॉस्पिटॅलिटी पॅकेजची विक्री करीत असलेल्यांनी स्पर्धेतील साडेचार लाख तिकिटे आरक्षित केली आहेत. त्यांनी इक्वेडोरच्या चाहत्यांना एक दिवस आणणे हा फार गंभीर प्रश्न नाही, असे सांगितले.

The tragedy of a footballer | एका फुटबॉलपटूची शोकांतिका

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!