All Sportschesssports news

प्रग्नानंध विरुद्ध जगज्जेता मॅग्नस कार्लसन यांच्या डावाचा हा व्हिडीओ

सोळा वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रग्नानंध याने जागतिक विजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याचा पराक्रम केला. मेल्टवॉटर चॅम्पियन्स बुद्धिबळ मालिकेतील एअरथिंग्ज मास्टर्स स्पर्धेत काळी मोहरे असतानाही प्रग्नानंध याने नॉर्वेच्या कार्लसन याला पराभूत केले. मात्र, या सनसनाटी विजयानंतरही प्रग्नानंध स्पर्धेत अकराव्या स्थानावर राहिला आहे. संपूर्ण स्पर्धेत प्रग्नानंध याचे चार डाव बरोबरीत सुटले, तर सहा डावांत पराभव स्वीकारावा लागला आहे. कार्लसन याच्यासह लिवोन अरोनियन, रशियाचा आंद्रा एस्पिंको, महिला गटातील माजी विश्वविजेती अलेक्झांड्रा कोस्तनियुक आणि केमर याला पराभूत केले आहे. या कामगिरीनंतरही प्रग्नानंध अंतिम आठ जणांत स्थान मिळवता आले नाही.

रशियाचा इयान नेपोमनियाची 29 गुणांसह पहिल्या, तर कार्लसन 25 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. याशिवाय एस्पिंको, कॅनडाचा एरिक हेन्सेन, चीनचा डिंग लीरेन, लियम क्वांग ली आणि केमर यांनीही अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळवले आहे.

प्रग्नानंधविरुद्धच्या लढतीपूर्वी कार्लसन याने सलग तीन विजय मिळवले होते; पण प्राग या नावाने बुद्धिबळ जगतात प्रसिद्ध असलेल्या प्रग्नानंध याने कार्लसन याला चूक करण्यास भाग पाडले आणि त्याचा फायदा घेत विजय मिळवला. प्रग्नानंध याने कार्लसन याला पहिल्यांदाच पराभूत केले. विशेष म्हणजे कार्लसनला नमवलेला प्राग हा केवळ तिसराच भारतीय आहे. यापूर्वी ही कामगिरी केवळ विश्वनाथन आनंद आणि पी. हरिकृष्ण यांनी केली आहे. या स्पर्धेत लागोपाठच्या लढतीने प्राग खूपच थकला होता. त्यामुळे कार्लसनला पराजित केल्याचा आनंद कसा साजरा करणार या प्रश्नास त्याने आता मला झोप हवी आहे, एवढेच उत्तर दिले. भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे दोन वाजता ही ऑनलाइन स्पर्धेतील लढत संपली होती.

‘प्रागचा हा विजय धक्कादायक नाही. त्याला अव्वल स्पर्धकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्यास तो जागतिक बुद्धिबळात लक्षवेधक कामगिरी करील,’ असे भारतातील अभ्यासक सांगत होते. त्याने आता दोन वेळचा वर्ल्ड कप विजेता लेवॉन अॅरॉनियन आणि कार्लसन यांना काही तासांच्या अंतराने पराभूत केले. त्याने पाचव्या फेरीत अॅरॉनियला नमवले. त्याने सातव्या फेरीत अनिश गिरीविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली आणि आठव्या फेरीत कार्लसनचा पराभव केला. पांढरी मोहरे असलेला कार्लसनला प्रागविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागेल, असेच वाटत होते. डावाच्या अंतिम टप्प्यातील ही स्थिती पाहून कार्लसन काहीसा अस्वस्थ झाला होता. त्यातच त्याच्याकडून ३२ व्या चालीत चूक झाली. प्रागने सात चालीत विजय निश्चित केला.

कोण आहे प्रग्नानंध?

प्रग्नानंध कार्लसन

  • ग्रँडमास्टर किताब सर्वांत कमी वयात जिंकणाऱ्या खेळाडूंत आता पाचवा.
  • सातव्या वर्षी फिडे मास्टर किताब.
  • 2013 मध्ये जागतिक 8 वर्षांखालील स्पर्धा जिंकली.
  • 2015 मध्ये जागतिक 10 वर्षांखालील स्पर्धा जिंकली.
  • 2016 मध्ये सर्वांत लहान आंतरराष्ट्रीय होण्याचा मान. त्या वेळी वय 10 वर्षे, 10 महिने 19 दिवस
  • 2021 मध्ये पोल्गर चॅलेंज स्पर्धेत विजेतेपद
  • 2022 च्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत आंद्रे एसिपेंको, विदीत गुजराती, निल्स ग्रँडेलिउस यांच्याविरुद्ध विजय.
कार्लसनविरुद्धचा विजय मोलाचा आहे. त्यातही काळी मोहरे असताना मिळवला हे महत्त्वाचे आहे. या स्पर्धेत पहिल्या दिवशी चार फेऱ्यांत त्याने अर्धा गुण मिळवला होता. मात्र, त्यानंतर चार आघाडीच्या खेळाडूंविरुद्ध २.५ गुण मिळवले. या कामगिरीमुळे तो जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवणाऱ्या स्पर्धकांविरुद्धच्या लढतीसाठी तयार होईल.

– आर. बी. रमेश, प्रग्नानंधचे प्रशिक्षक

White- कार्लसन वि. Black- प्रग्नानंध

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=EClt8CmFKfU” column_width=”4″]

Follow on Facebook Page Kheliyad

अखेर आनंदची घरवापसी

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”83″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!