• Latest
  • Trending
suyash-jadhav-inspirational-story

Suyash Jadhav’s inspirational story | संकटलाटांना आव्हान देणारा मार्लिन!

January 13, 2021
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Friday, March 24, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

Suyash Jadhav’s inspirational story | संकटलाटांना आव्हान देणारा मार्लिन!

सुयश जाधव... अर्जुन पुरस्कार... टाळ्यांच्या गजरात ही घोषणा कानी पडली नि डोळ्यांत आनंदाश्रू तरळले...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
January 13, 2021
in All Sports, Inspirational Sport story, Inspirational story, swimming
0
suyash-jadhav-inspirational-story
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

संकटलाटांना आव्हान देणारा मार्लिन!

सुयश जाधव… अर्जुन पुरस्कार… टाळ्यांच्या गजरात ही घोषणा कानी पडली नि डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. काही क्षणांत त्याच्या संघर्षाचा फ्लॅशबॅक डोळ्यांसमोर तरळून गेला. सुयशच्या जिद्दीची मी एक साक्षीदार आहे. त्याचा हा थक्क करणारा प्रवास… Suyash Jadhav’s inspirational story |

suvarna-deolankar

प्रचंड उत्कंठा होती यंदाच्या राष्ट्रीय क्रीडादिनाची. मी इतिहासातला असा पुरस्कार वितरण सोहळा पाहत होते ज्याची मी यापूर्वी कधीही कल्पना केली नव्हती. दूरदर्शनवर एकटक आणि अगदी जिवाचे कान करून मी हा सोहळा पाहत होते. कारणही तसेच होते. इतिहासात प्रथमच राष्ट्रीय क्रीडादिनाचे पुरस्कार आभासी अर्थातच ऑनलाइन पद्धतीने झाले. Suyash Jadhav’s inspirational story |

म्हणजे दिल्लीत राष्ट्रपती पुरस्कार देत होते, तर देशभरातील कानाकोपऱ्यात विखुरलेले पात्र खेळाडू वेगवेगळ्या क्रीडा प्राधिकरणांतून ते स्वीकारत होते. म्हणूनच करोना महामारीच्या काळातला शनिवार, 29 ऑगस्ट 2020 चा हा आभासी पुरस्कार वितरण सोहळा ऐतिहासिक ठरला.

तासभर चाललेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि एक विश्वासही व्यक्त केला, की 2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल दहामध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य गाठू शकतो.

पुरस्कार सोहळ्यात निवेदक एकेका खेळाडूचे नाव पुकारत होते. सोबतच खेळाडूंच्या कामगिरीची व्हिडीओद्वारे माहितीही देत होते. मी लक्षपूर्वक एकेका खेळाडूची नावे ऐकत होते. सुरुवात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारापासून झाली.

त्यानंतर अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे पुकारली गेली. माझी उत्कंठा शिगेला पोहोचली. जे नाव ऐकण्यासाठी मी जिवाचे कान करून ऐकत होते, अखेर ते नाव कानी पडले… सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार…

टाळ्यांचा गजर झाला नि सुयशच्या कारकिर्दीचा व्हिडीओ पाहताना डोळ्यात आनंदाश्रू तरळले. चमकत्या अश्रूंत काही क्षणांत त्याच्या संघर्षाचा फ्लॅशबॅक डोळ्यांसमोर झरझर सरकत गेला.

Suyash Jadhav’s inspirational story |

सात-आठ वर्षांपूर्वीची ही घटना आहे. पुण्याच्या टिळक जलतरण तलावात मी माझ्या मुलाला सरावासाठी घेऊन जायचे. कल्पना आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलगा धडे गिरवत होता.

साधारणतः ही २०१२-१३ मधील घटना आहे. त्याच वेळी बारा वर्षीय मुलाला घेऊन एक जण आगाशेंकडे आला. दोन्हीही हात कोपरापासून नसलेला हा मुलगा पाहून भुवया उंचावल्या.

आगाशेंनी क्षणाचाही विलंब न करता त्याला सराव करण्यास संमतीही दिली आणि नियमितपणे त्याचा सरावही सुरू झाला. हाच तो मुलगा- सुशांत जाधव.

सुयश दिव्यांग होता, पण त्याला वेगळा न्याय अजिबात नव्हता. सरावात त्याला कोणतीही सवलत नव्हती. बारा वर्षांखालील वयोगटातील सर्वसामान्य मुलांबरोबरच रोज तीन तास चार किलोमीटर पोहण्याचा सराव करायचा.

सुयश तसा पुण्यात नवीन होता. मात्र, दिव्यांग खेळाडू म्हणून तो कधीच वावरला नाही आणि सर्व मुलेदेखील त्याला मदत करायची. अतिशय शांत स्वभावाचा सुयश सर्व मुलांमध्ये अगदी पाण्यासारखा मिसळला. जेव्हा स्पर्धा असायची, तेव्हा त्या धडधाकटांच्या गटात नसला तरी इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून हजर असायचा.

त्याचा हा प्रवास सतत चार वर्षे मी पाहत होते. सर्वांचा तो आदर्श सुयशदादा होता. प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा…

सुयशला दोन्ही हात नाहीत हे इतरांना कधी जाणवलेच नाही. म्हणजे तो कुणावरही विसंबून राहिलेला कधी दिसलाच नाही. इतर मुलांसारखीच सगळी कामे तो अगदी सफाईदारपणे करायचा.

सराव संपल्यानंतर तो स्वतःच स्वतःचे सामान आवरायचा. जलतरणातील फीन्स घालणे, ती काढून ठेवणे, स्वीमिंग कॉस्च्युम परिधान करणे, कपडे बदलणे, खिशातला मोबाइल काढून बोलणे, लॅपटॉपवरील कामे करणे इत्यादी गोष्टी तो सहजपणे करायचा. मी हे सर्व बघून एक दिवस कल्पना आगाशे यांच्याकडे सुयशची माहिती विचारली, तेव्हा सुयशची करुण कहाणी उलगडली…

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात पांगरे नावाचं एक छोटंसं गाव आहे. सुयश याच गावातला. त्याचे वडील नारायण जाधव क्रीडाशिक्षक.

माळशिरस तालुक्यातील वेळापुरातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नोकरीच्या निमित्ताने तेथेच स्थायिक झाले. सुयशचं शिक्षणही याच शाळेतलं. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तो फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाला.

वडील क्रीडाशिक्षक असल्याने खेळाचं महत्त्व त्यांच्याइतकं कोण समजणार… म्हणूनच पॅरालिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी त्याला आगाशेंकडे घेऊन आले होते. मुलगा खूपच हुशार आणि मेहनती असून, एक ना एक दिवस तो आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकेल एवढी त्याची क्षमता आहे, असा विश्वास कल्पना आगाशे यांनी त्याच वेळी व्यक्त केला होता.

Suyash Jadhav’s inspirational story | सुयशला सहानुभूती म्हणून नाही, तर उभारी देण्यासाठी मी त्याला शक्य तेवढी मदत करण्याचे ठरवले. सुयश तोपर्यंत विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करीत होता. त्याचं हेच “सुयश” प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचवलं.

बऱ्याच प्रतिनिधींनी जलतरण तलावावर येऊन त्याची मुलाखतही घेतली होती. याच दरम्यान त्याला मदतीसाठी काही लोकही पुढे आले. सरावात तसुभरही सवलत न देणाऱ्या कल्पना आगाशे यांनी प्रशिक्षणासाठी त्याला हंड्रेड पर्सेंट सवलत दिली. म्हणजे कोणतेही शुल्क आकारले नाही. त्याचं  “सुयश” जसजसं झळकत होतं, तसतसं मी त्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत होते.

suyash-jadhav-inspirational-story

 

हात गमावले, पण जिद्द नाही…

सुयश तुमच्याआमच्यासारखाच धडधाकट मुलगा होता. मात्र, एका घटनेने त्याचं बालपण हिरावून घेतलं. तो अकरा वर्षांचा होता. एकदा चुलतभावाच्या लग्नाला तो गेला होता. मुलांबरोबर खेळत असताना अचानक त्याचा हात इलेक्ट्रीक वायरला लागला आणि विजेचा जोरदार झटका बसला.

त्याचे दोन्ही हात भाजले. डॉक्टरांकडे त्याला नेले. दोन्ही हातांना गँगरिन झाले होते. आता त्यावर एकच उपाय होता… तो म्हणजे हात कापणे. हा भयंकर आणि अपरिहार्य उपाय होता. जीव वाचवण्यासाठी हात कापण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता.

अखेर त्याचे दोन्ही हात कोपरापासून वेगळे करावे लागले. इथे सुयशच्या बालमनावर काय बेतले असेल याची कल्पना करवत नाही. इतर मुलांसारखं पूर्वीसारखं बागडण्यात एका क्षणात मर्यादा आल्या.

मात्र, सुयशला खंबीर साथ दिली वडिलांनी. ते क्रीडाशिक्षक तर होतेच, शिवाय जलतरणातील राष्ट्रीय खेळाडू म्हणूनही त्यांचा लौकिक होता. सुयशलाही याच खेळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू तयार करण्याची त्यांची इच्छा होती.

हात गमावण्यापूर्वीच सुयश वयाच्या पाचव्या वर्षापासूनच पोहण्याचा सराव करीत होता. त्याच्या सरावाचा पहिला तलाव होता विहीर. सुरुवातीला विहिरीत शिकला. २००७ मध्ये पहिल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्याने तीन पदकेही मिळवली होती.

ही घोडदौड सुरू असतानाच आता हात गमावल्याने सुयशला जलतरण सरावाला नव्याने सुरुवात करावी लागणार होती. वडिलांनी नकारात्मक विचार बाजूला सारून सुयशचा सराव नव्या जोमाने सुरू केला. इथूनच सुरू झाली बापलेकाच्या जिद्दीची व संघर्षाची नवी कहाणी.

suyash-jadhav

मुलासाठी विकली दोन एकर जमीन!

वडिलांनी गावातील विहिरी, तलाव, नद्यांमध्ये मिळेल त्या ठिकाणी त्याला प्रशिक्षण दिले. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांत त्याला पाठवले. हळूहळू राज्य पातळीवर तो पदके मिळवू लागला होता. कौतुक होत होते; पण बापलेक इथपर्यंतच समाधानी नव्हते.

सुयशला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवायचेच हे वडिलांचे स्वप्न होते. स्पर्धा जिंकायची असेल तर त्याला त्याच पद्धतीचे प्रशिक्षण घेणे आवश्‍यक असल्याने ते सुयशला पुण्यात टिळक तलावावर घेऊन आले होते. पुण्यातील खर्च परवडत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी दोन एकर जमीनही विकली व प्रशिक्षणासाठी पैसा उभा केला.

Suyash Jadhav’s inspirational story | २०१७ मध्ये जाकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरालिम्पिक स्पर्धेत सुयशने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. या कामगिरीने मात्र त्याचे आयुष्यच बदलून गेले. सगळ्या देशांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

… आणि वडिलांचे स्वप्न केले साकार

आपल्या वडिलांच्या स्वप्नांची जाणीव सुयशलाही होती आणि याच जिद्दीतून त्याने जीवतोड मेहनत घेतली. दोन्ही हात गमावलेले असतानाही बघता बघता ‘उत्कृष्ट जलतरणपटू’ म्हणून त्याने नावलौकिक मिळवला आणि पदकांची कमाईही केली.

राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या 17 व्या राष्ट्रीय अपंग जलतरण स्पर्धेत सुयशने ५० मीटर फ्री स्टाइल, १०० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावताना ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा बहुमानही मिळवला.

केवळ शारीरिकच नव्हे, तर आर्थिक स्तरातूनही अत्यंत प्रतिकूलता असूनही सुयशने आज मिळविलेले हे यश कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. दोन्ही हात गमावल्यानंतरही सुयशने राज्यस्तरावर ५१, राष्ट्रीय स्तरावर ४६, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाच सुवर्णपदकांसह २१ पदके मिळविताना आजपर्यंत त्याने एकूण ११८ पदके पटकावली आहेत.

सुयशला २०१६- १७ मध्ये एकलव्य राज्य क्रीडा (दिव्यांग) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्य सरकारने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३२ खेळाडूंची विविध पदांवर थेट शासकीय नियुक्‍त्या केल्या. त्यात सुयशचा समावेश होता.

२०१८ मध्ये मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सुयशला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा शिवछत्रपती पुरस्काराने, तर वडील नारायण जाधव यांना उत्कृष्ट प्रशिक्षकाचा शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. या पिता-पुत्रांना एकाच वेळेस हा पुरस्कार मिळाला.

Suyash Jadhav’s inspirational story | रिओ पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धेत सुयशचे पदक थोडक्‍यात हुकले. या स्पर्धेनंतर सुयशला महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांचे पारितोषिक देऊन गौरविले होते.

आज जे सुयशने यश मिळवले त्यात त्याच्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी नुसतेच त्याला प्रोत्साहन दिले नाही, तर दिव्यांग असूनही कोणतेही नकारात्मक विचार त्याच्या मनात येऊ दिले नाहीत. तो कुठेही कमी नाही हे सतत सुयशच्या मनावर बिंबवले गेले.

आपला मुलगा अपंग आहे हे त्यांनीदेखील कधीच मानले नाही. त्यामुळे सुयश पूर्णपणे खेळाकडे लक्ष केंद्रित करू शकला. सुयश दहावी व बारावीची परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झाल्यानंतर जाधव कुटुंब पुण्यात स्थायिक झालं. सुयशला जलतरणाचे चांगले प्रशिक्षण मिळावे हाच एकमेव उद्देश त्यामागे होता.

सुयशाचा चढता आलेख…

२००९ मध्ये सुयश पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला होता. पॅरा जलतरण प्रकारात गेल्या काही वर्षांत भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंत सुयशचा समावेश आहे.

सुयशने गेल्या पाच वर्षांत सातत्याने चांगले यश मिळवले आहे. २०१५ मध्ये जर्मनीत तीन रौप्य, तर पोलंडमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राँझ पदके मिळवली.

२०१६ मध्ये रशियात झालेल्या स्पर्धेत एक रौप्य व एक ब्राँझपदक मिळवले, तर ब्राझीलमधील स्पर्धेत सुयश सहभागी झाला होता.

Suyash Jadhav’s inspirational story | २०१७ मध्ये बर्लिनमध्ये एक रौप्य व मेक्सिकोत जागतिक स्तरावर चौथा क्रमांक मिळवला.

२०१८ मध्ये शारजाह येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळवले.

इंडोनेशियात एशियन पॅरा गेम्समध्ये 50 मीटर बटरफ्लाय या प्रकारात यापूर्वी एकाही भारतीय खेळाडूस सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. ही उणीव सुयशने भरून काढली आणि या क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण पदकाबरोबरच आणखी दोन ब्राँझपदकेही जिंकली आणि भारताचा पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला.

२०१९ या एकाच वर्षात पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत सुयशने एक रौप्य मिळवले. त्याच वर्षी तो लंडन येथील जागतिक स्पर्धेत सहभागी झाला होता.

रिओ पॅरालिम्पिकमध्ये मात्र सुयशचे पदक अवघ्या चार सेकंदांनी हुकले होते, याची त्याला आजही खंत वाटते.

आता टोकियो (जपान) येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणे हेच सध्या सुयशचे मुख्य ध्येय आहे.

अर्जुन पुरस्काराचा मानकरी

पुण्यात क्रीडाधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या सुयशला अर्जुन पुरस्कार मिळाल्याची बातमी कळली आणि त्याच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.

सुयशच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला मिळालेला हा पहिलाच अर्जुन पुरस्कार आहे. आई सविता आणि वडील नारायण जाधव यांचा खंबीर पाठिंबा आणि त्यास सुयशच्या कठोर परिश्रमाची मिळालेली जोड, यामुळेच आज सुयश अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

अपंगत्वाचा बाऊ करण्यापेक्षा आणि आपल्याकडे जे नाही यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा विचार करून त्यास मेहनतीची जोड दिली तर यश नक्की मिळते, असे सुयश सांगतो.

जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणाऱ्या सुयशची राज्य सरकारने दखल घेऊन त्याला प्रथम वर्ग क्रीडा अधिकाऱ्याची नोकरीही दिली आहे.

टाळ्यांच्या गजरात जेव्हा सुयशने अर्जुन पुरस्कार व सन्मानपत्र स्वीकारले, त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोरून सुयशचा हा संपूर्ण प्रवास झरझर पुढे सरकत होता. सुयशचा या पुरस्कारावर नक्कीच हक्क आहे.

सुयशची ही फिनिक्स भरारी इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. माणसं एखाद्याला पाण्यात पाहतात तेव्हा वाईट वाटतं. मी मात्र कौतुकाने सुयशला पाण्यात पाहतेय… त्याने प्रवाहाविरुद्ध पोहत राहावं… त्याला हात नाही, पण ब्लॅक मार्लिन माशासारखे जिद्दीचे कल्ले आहेत…संकटाच्या लाटांना मागे सारणारे, मन खंबीर करणारे… !!

* ब्लॅक मार्लिन हा असा मासा आहे, ज्याचा वेग 128 किलोमीटर प्रतितास आहे.*

Keep up with news and events happening in the emerging game through our Facebook and Twitter pages.

 

Read more at :

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?
All Sports

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

by Mahesh Pathade
January 16, 2023
लिस हार्टेल
All Sports

लिस हार्टेल- एका डॅनिश महिलेची ‘घोडदौड’

by Mahesh Pathade
February 11, 2023
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी
All Sports

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

by Mahesh Pathade
August 27, 2022
एलिसन फेलिक्स
All Sports

‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स

by Mahesh Pathade
February 16, 2023
लता मंगेशकर क्रिकेटच्या तारणहार
All Sports

बीसीसीआयकडे पैसे नव्हते, तेव्हा लता मंगेशकर ठरल्या क्रिकेटच्या तारणहार

by Mahesh Pathade
February 18, 2023
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
sports quiz

Kheliyad Sports Quiz 4

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!