ऐतिहासिक क्रीडा पुरस्कार वितरण
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या इतिहासात प्रथमच ७४ खेळाडूंनी खेलरत्नसह अर्जुन पुरस्कार आभासी पद्धतीने स्वीकारले. National Sports Awards virtual Ceremony |
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आभासी पद्धतीने हा वितरण सोहळा २९ ऑगस्ट २०२० रोजी झाला.
National Sports Awards virtual Ceremony | करोना महामारीमुळे राष्ट्रीय क्रीडादिनी २९ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन आयोजित करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी आपल्या शहरात ‘लॉग-इन’ होऊन पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी ७४ खेळाडूंची निवड करण्यात आली.
यातील पाच खेळाडूंना खेलरत्न Khel ratna | आणि २७ जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यातील ६० खेळाडूंनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ११ केंद्रांत आभासी पुरस्कार सोहळ्यात सहभाग घेतला. National Sports Awards virtual Ceremony |
क्रिकेटपटू रोहित शर्मा (खेलरत्न) आणि ईशांत शर्मा (अर्जुन पुरस्कार) या सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. कारण ते इंडियन प्रीमियर लीगसाठी IPL | संयुक्त अरब अमिरातीत आहेत.
स्टार पहिलवान विनेश फोगाट (खेलरत्न) आणि बॅडमिंटनपटू सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी (अर्जुन पुरस्कार) करोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही.
रोहित आणि विनेश या दोन खेलरत्नप्राप्त खेळाडूंनी माघार घेतली असली तरी टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा, पॅरालिम्पिक सुवर्णपदकप्राप्त मरियप्पन थांगवेलू आणि महिला हॉकीपटू रानी रामपाल यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभाग घेतला.
National Sports Awards virtual Ceremony | या सोहळ्यात सहभागी होताना मनिका पुण्यातून, तर थांगवेलू आणि राणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बेंगलुरू केंद्रातून ‘लॉग इन’ होते.
राष्ट्रपती कोविंद यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. ज्यांचे नाव जाहीर करण्यात आले, त्यांची कामगिरीही या वेळी सांगण्यात आली.
National Sports Awards virtual Ceremony | या आभासी सोहळ्यात राष्ट्रपति भवनाच्या सभागृहातील तुरळक उपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
पुरस्कार वितरण सोहळा सुरू होण्यापूर्वी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले, ‘‘कोविड-19 संकटकाळातील हा पहिला पुरस्कार वितरण सोहळा आहे, ज्यात राष्ट्रपतींनी हजेरी लावली आहे.’’
पुरस्कार रकमेत वाढ
यंदाच्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. खेलरत्न पुरस्काराच्या रकमेत २५ लाखांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. यापूर्वी या पुरस्कारासाठी साडेसात लाख रुपये देण्यात येत होते.
अर्जुन पुरस्कारासाठी २२ खेळाडू ऑनलाइन होते. त्यांना प्रत्येकी १५ लाखांची रक्कम प्रदान करण्यात आली. यापूर्वी अर्जुन पुरस्कारासाठी पाच लाख रुपये देण्यात येत होते.
द्रोणाचार्य (जीवनगौरव) पुरस्कारांसाठी १५ लाख रुपये (यापूर्वी पाच लाख), नियमित द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी प्रत्येकी १० लाख (यापूर्वी ५ लाख), ध्यानचंद पुरस्कारासाठी १० लाख (यापूर्वी ५ लाख) रुपये प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक वाढ खेलरत्न पुरस्काराच्या रकमेत करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या रकमेत तब्बल १७.५ लाख रुपये वाढविण्यात आले आहेत. त्या खालोखाल अर्जुन पुरस्कारात १० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इतर पुरस्कारांमध्ये पाच लाखांची वाढ करण्यात आली आहे.
पुरस्कार | रक्कम २०२० | रक्कम २०१९ |
---|---|---|
खेलरत्न पुरस्कार | २५ लाख रुपये | ७.५ लाख रुपये |
अर्जुन पुरस्कार | १५ लाख रुपये | ५ लाख रुपये |
द्रोणाचार्य (जीवनगौरव) | १५ लाख रुपये | ५ लाख रुपये |
द्रोणाचार्य (नियमित) | १० लाख रुपये | ५ लाख रुपये |
ध्यानचंद पुरस्कार | १० लाख रुपये | ५ लाख रुपये |
४४ वर्षांनंतर प्रथमच
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या ४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपती भवनाच्या सभागृहात पुरस्कारप्राप्त खेळाडू, पाहुणे आणि मान्यवर व्यक्ती हजर राहू शकलेले नाहीत. करोना महामारीत सरकारने लागू केलेल्या नियमानुसार पाहुण्यांसह खेळाडूंना या सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहता आलेले नाही.
राष्ट्रपतींनी केले खेळाडूंचे कौतुक
राष्ट्रपति कोविंद यांनी सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे कौतुक केले आणि विश्वास दिला, की भारत २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दहा देशांत सहभागी होण्याचे लक्ष्य गाठू शकतील.
तब्बल एक तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी खेळाडूंच्या कामगिरीला अविस्मरणीय क्षण म्हंटले.
‘‘मला विश्वास आहे, की प्रत्येकाच्या योगदानामुळे आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर भारत क्रीडा क्षेत्रात महाशक्ती नक्कीच होईल. २०२८ च्या ऑलिम्पकमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये येण्याचं आपलं लक्ष्य आहे. आपण निश्चितच हे लक्ष्य साध्य करू.’’ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यंदा अर्जुन पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये धावपटू दुती चंद, महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा, गोल्फर अदिति अशोक आणि पुरुष हॉकी संघाचा स्ट्रायकर आकाशदीप सिंह यांचा समावेश होता.
पुरस्कार घेण्यापूर्वीच प्रशिक्षकाचे निधन

पुरस्कार वितरण सोहळ्याच्याच दिवशी २८ ऑगस्ट रोजी द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारप्राप्त अॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय (वय ७९) यांचे निधन झाले. हृदयविकारामुळे त्यांचे बेंगलुरू येथे निधन झाले.
कर्नाटक अॅथलेटिक्स संघटना (KAA) आणि खेळाडूंनी पुरुषोत्तम राय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. राय यांनी १९८० ते १९९० दरम्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंना प्रशिक्षित केले.
त्यांचा २८ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते. हा पुरस्कार मिळविणारे राय कर्नाटकमधील तिसरे व्यक्ती आहेत.
यापूर्वी एन. लिंगप्पा आणि गेल्या वर्षी व्ही. आर. बिदू यांना हा पुरस्कार मिळाला होता. द्रोणाचार्य पुरस्कार मिळविणारे भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनीही राय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
राय यांनी नेताजी क्रीडा संस्थेतून डिप्लोमाचे शिक्षण घेतले. त्यांनी १९७४ मध्ये प्रशिक्षणाला सुरुवात केली.
राय यांनी ऑलिम्पियन रिले धावपटू वंदना राव, हेप्टॅथलॉन खेळाडू प्रमिला अयप्पा, अश्विनी नाचप्पा, मुरली कुटान, एम. के. आशा, जी. जी. प्रमिला यांना प्रशिक्षण दिले.
१९८७ मधील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, १९८८ मधील आशियाई ट्रॅक अँड फिल्ड चॅम्पियनशिप आणि १९९९ मधील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे ते प्रशिक्षक राहिले आहेत.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
2020 मधील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादीखेळाडू | क्रीडा प्रकार |
---|---|
रोहित शर्मा | क्रिकेट |
विनेश फोगाट | कुस्ती |
मनिका बत्रा | टेबल टेनिस |
राणी रामपाल | हॉकी |
मरियप्पन थांगवेलू | पॅरा अॅथलीट |
अर्जुन पुरस्कार 2020
2020 मधील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादीखेळाडू | खेळ |
---|---|
अतनू दास | तिरंदाजी |
द्युती चंद | अॅथलेटिक्स |
सात्त्विक साईराज रांकीरेड्डी | बॅडमिंटन |
चिराग चंद्रशेखर शेट्टी | बॅडमिंटन |
विशेष भृगुवंशी | बास्केटबॉल |
सुभेदार मनीष कौशिक | बॉक्सिंग |
लवलीना बोरगोहेन | बॉक्सिंग |
ईशांत शर्मा | क्रिकेट |
दीप्ती शर्मा | क्रिकेट |
अजय अनंत सावंत | घोडेस्वारी |
संदेश झिंगन | फुटबॉल |
अदिती अशोक | गोल्फ |
आकाशदीप सिंह | हॉकी |
दीपिका | हॉकी |
दीपक हुड्डा | कबड्डी |
सारिका सुधाकर काळे | खो खो |
दत्तू बबन भोकनळ | रोइंग |
मनू भाकेर | नेमबाजी |
सौरभ चौधरी | नेमबाजी |
मधुरिका सुहास पाटकर | टेबल टेनिस |
दिविज शरण | टेनिस |
शिवा केशवन | शीतकालीन खेळ |
दिव्या काकरान | कुस्ती |
राहुल आवारे | कुस्ती |
सुयश नारायण जाधव | पॅरा स्विमिंग |
संदीप | पॅरा अॅथलेटिक्स |
मनीष नरवाल | पॅरा नेमबाजी |
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)
2020 मधील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादीखेळाडू | खेळ |
---|---|
धर्मेंद्र तिवारी | धनुर्विद्या |
पुरुषोत्तम राय | अॅथलेटिक्स |
शिव सिंह | बॉक्सिंग |
रोमेश पठाणिया | हॉकी |
कृष्ण कुमार हुड्डा | कबड्डी |
विजय भालचंद्र मुनीश्वर | पॅरा पॉवरलिफ्टिंग |
नरेश कुमार | टेनिस |
ओम प्रकाश दहिया | कुस्ती |
द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
2020 मधील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादीखेळाडू | खेळ |
---|---|
ज्यूड फेलिक्स | हॉकी |
योगेश मालवीय | मलखांब |
जसपाल राणा | नेमबाजी |
कुलदीप कुमार | हांडू वुशू |
गौरव खन्ना | पॅरा बॅडमिंटन |
ध्यानचंद पुरस्कार
2020 मधील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादीखेळाडू | खेळ |
---|---|
कुलदीपसिंह भुल्लर | अॅथलेटिक्स |
जिन्सी फिलिप्स | अॅथलेटिक्स |
प्रदीप श्रीकृष्ण गंधे | बॅडमिंटन |
तृप्ती मुरगुंडे | बॅडमिंटन |
एन. उषा | बॉक्सिंग |
लखा सिंह | बॉक्सिंग |
सुखविंदरसिंग संधू | फुटबॉल |
अजित सिंह | हॉकी |
मनप्रीत सिंह | कबड्डी |
जे. रंजीत कुमार | पॅरा अॅथलेटिक्स |
सत्यप्रकाश तिवारी | पॅरा बॅडमिंटन |
मंजीत सिंह | रोइंग |
स्वर्गीय श्री सचिन नाग | जलतरण |
नंदन बाळ | टेनिस |
नेत्रपाल हुड्डा | कुस्ती |
तेन्झिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार
2020 मधील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादीखेळाडू | खेळ |
---|---|
अनीता देवी | साहसी खेळ |
कर्नल सरफराज सिंह | साहसी खेळ |
टाका तमूत | साहसी खेळ |
नरेंद्र सिंह | साहसी खेळ |
केवल हिरेन कक्का | साहसी खेळ |
सतेंद्र सिंह | साहसी खेळ |
गजानंद यादव | साहसी खेळ |
स्वर्गीय मगन बिस्सा | साहसी खेळ |
विद्यापीठ | शहर |
---|---|
पंजाब विद्यापीठ | चंडीगड |
नवोदित तरुण प्रतिभावान खेळाडूंची ओळख आणि त्यांचे पोषण | लक्ष्य संस्थान, सेना क्रीडा संस्थान |
---|---|
उद्योगांच्या सामाजिक जबाबदारीनुसार खेळांना प्रोत्साहन | तेल तथा नैसर्गिक गॅस महामंडळ |
खेळाडूंना रोजगार आणि क्रीडा कल्याणाचे उपाय | वायुसेना क्रीडा नियंत्रण मंडळ |
विकासासाठी खेळ | आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रबंधन संस्था (आयआयएसएम) |
Good information