सत्तरच्या दशकातील रोड मार्श यांच्या निधनाचा धक्का पचवत नाही तोच क्रिकेटविश्वाला दुसरा धक्का बसला. तो म्हणजे 90 च्या दशकातील फिरकीचा जादूगार शेन वॉर्न याच्या निधनाचा. आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना कोंडीत पकडणारा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचे 4 मार्च 2022 रोजी थायलंडमधील समुई येथे निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्न याने आपल्या बंगल्यात अखेरचा श्वास घेतला. ही बातमी धडकली तेव्हा कोणाचाही विश्वासच बसला नाही. मात्र, ते एक कटू सत्य होतं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत शेन वॉर्न याचंही एक नाव कायम स्मरणात राहील. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1992 मध्ये पाऊल ठेवलं. त्याचा लेग स्पिन अफलातूनच. खेळपट्टी कशीही असो, शेन वॉर्न जर समोर असेल तर फलंदाजाचं काही खरं नाही. असा दरारा फार कमी खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो. शेन वॉर्न त्यापैकीच एक. कारकिर्दीत त्याने 145 कसोटी सामने खेळले आणि तब्बल 708 विकेट घेतल्या. त्याची वनडे कारकीर्दही तेवढीच समृद्ध. कारकिर्दीत 194 वनडे सामने खेळताना त्यानेे 293 विकेट घेतल्या. आयपीएलचे पहिले सत्रही शेन वॉर्न यानेच गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आयपीएलच्या 2008 च्या मोसमात त्याने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आणि विजेतेपदही संघाला मिळवून दिलं.
फिरकी गोलंदाज श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) याच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा वॉर्न जगातला दुसरा फिरकी गोलंदाज होता. क्रिकेटविश्वातील या दोन फिरकी गोलंदाजांच्या सन्मानार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका क्रिकेटने 2007 मध्ये या दोन्ही देशांदरम्यान कसोटी मालिका सुरू केली. या मालिकेचे नाव आहे वॉर्न मुरलीधरन ट्रॉफी.
भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये शेन वॉर्न कायम लक्षात राहील. विशेषतः सचिन तेंडुलकर विरुद्ध वॉर्न हे द्वंद्व क्रिकेटप्रेमी डोळ्यांत प्राण आणून पाहायचे. भारताविरुद्ध तो पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला. त्याच्या 1992 ते 2007 दरम्यानच्या क्रिकेट कारकिर्दीतील अतुल्य कामगिरीची नोंद विज्डेन मासिकानेही घेतली. विज्डेन मासिकाने शतकातील पाच क्रिकेटपटूंपैकी शेन वॉर्न याचा समावेश केला. त्याला 2013 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्येही समाविष्ट करण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने 1999 विश्वकरंडक जिंकला. या संघात वॉर्न होता. याच वॉर्नने अॅशेस क्रिकेटमध्ये सर्वाधिक 195 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर शेन वॉर्न आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार झाला. नंतर याच संघाचा प्रशिक्षकही झाला. शेन वॉर्न याची कारकीर्द मैदानात आणि मैदानाबाहेरही या ना त्या कारणाने चर्चेत राहिली. तो उत्तम गोलंदाज, प्रशिक्षक होताच, शिवाय उत्तम समालोचकही होता.
सकाळी मार्श यांना श्रद्धांजली आणि…
70 च्या दशकातील महान यष्टिरक्षक रोड मार्श यांचे 4 मार्च 2022 रोजी सकाळी निधन झाले. वॉर्न यांनी सकाळी त्यांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हंटले, ‘‘ रोड मार्श यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःखी झालो. ते आमच्या अनेक युवा क्रिकेटपटूंचे प्रेरणास्रोत होते. त्यांनी क्रिकेटला विशेषतऋ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेटला बरंच काही दिलं. रेस्ट इन पीस दोस्त.’’ त्याच्या काही तासांतच सायंकाळी वॉर्न यांनीही जगाचा निरोप घेतला.
शेन वॉर्नची कसोटी कारकीर्द
वनडे कारकीर्द
प्रथमश्रेणी कारकीर्द
मानसिक खच्चीकरणासाठी क्रिकेट विश्वातील स्लेजिंग!
Read more at:
या मैदानावर आहे जगातील सर्वांत मोठा मानवी फलक
या मैदानावर आहे जगातील सर्वांत मोठा मानवी फलक On this ground is the largest manually operated scoreboard in the world...
सचिन तेंडुलकर याच्याविषयी न ऐकलेल्या क्रिकेट गोष्टी
सचिन तेंडुलकर नावाचं गारूड अजूनही क्रिकेट-प्रेमींच्या मनात घर करून आहे. सचिन रमेश तेंडुलकर Sachin Ramesh Tendulkar | या नावाच्या लोकप्रियतेमागे...
बुमराह…मासिक आयसीसी पुरस्कारासाठी नामांकन
इंग्लंडविरुद्ध अष्टपैलू कामगिरीची पावती जसप्रीत बुमराहला मिळाली, असं म्हणायला हरकत नाही. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत...
कोरोनाची दहशत, या तीन क्रिकेटपटूंचा खेळण्यास नकार
coronavirus-cricket-west-indies किंग्स्टन कोरोना विषाणूमुळे coronavirus | जगाला वेठीस धरलं आहे. या विषाणूच्या भीतीने जीवनशैलीच बदलली आहे. त्यामुळे अनेक...
एम. ए. चिदंबरम स्टेडियम | M. A. Chidambaram cricket Stadium
एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई M. A. Chidambaram cricket Stadium ‘एम. ए. चिदंबरम स्टेडियम’ (M. A. Chidambaram cricket Stadium) हे...
मिताली @ 10,000
मिताली @ 10,000 Mithali Raj @ 10,000 | भारतीय क्रिकेट संघाची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार...