All Sportssports newsTennis

निरोपाच्या स्पर्धेत सानिया मिर्झा हिचे स्वप्न अधुरे

निरोपाच्या स्पर्धेत सानिया मिर्झा हिचे स्वप्न अधुरे

हा तिचा निवृत्तीचा सामना होता. 2022 च्या विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीनंतर ती पुन्हा कोर्टवर दिसणार नाही.. होय, सानिया मिर्झा या भारतीय टेनिसपटूची अखेरची ही विम्बल्डन स्पर्धा अपयशी म्हणता येणार नाही, पण निरोप जेतेपदाचा मुकुट परिधान करून घ्यायचा होता. तो काही तिला घेता आला नाही.

ऑस्ट्रेलियन, फ्रेच, अमेरिकन ओपन या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावणाऱ्या सानिया मिर्झा हिला विम्बल्डन ट्रॉफीचीच तेवढी उणीव भासत होती. 2022 च्या निरोपाच्या सामन्यात हे स्वप्न मात्र तिला सत्यात उतरवता आलं नाही. कारण 2022 च्या टेनिस मोसमानंतर व्यावसायिक टेनिसला रामराम ठोकण्याचा निर्णय सानिया मिर्झा हिने आधीच जाहीर केला आहे. विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीतील तिचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे सानियाला ट्रॉफीशिवायच माघारी परतावे लागले आहे.

Sania Mirza inspired millions with her courage
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=s1Rnpk87mgQ” column_width=”4″]

उपांत्यफेरीत आव्हान संपुष्टात

यंदा सानिया मिर्झा क्रोएशियाच्या मॅट पॅव्हिचसह (Mate Pavic) विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीत सहभागी झाली. मात्र उपांत्य फेरीत त्यांना गतविजेत्या नील कुपस्की (ब्रिटन) (Neal Skupski) आणि डेसिरे कॉजिक (अमेरिका) (Desirae Krawczyk) यांच्याकडून ६-४, ५-७, ४-६ असा पराभव पत्करावा लागला.

सानियाने महेश भूपतीसह 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2012 मध्ये फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये मिश्रचे जेतेपद पटकावले आहे. 2014 मध्ये ब्राझीलच्या ब्रुनो सुआरेससह खेळताना तिने अमेरिकन ओपनच्या मिश्र दुहेरीचे जेतेपद जिंकले होते.

‘यंदाच्या विम्बल्डन वाटचालीत मी व पॅव्हिचने प्रतिस्पर्ध्यांपुढे तगडे आव्हान उभे केले. आमची मेहनत अर्थातच महत्वपूर्ण होती. यंदा तरी मला मिश्र दुहेरीचे विम्बल्डन पटकावता येईल, असे वाटत होते. मात्र तसे होऊ शकले नाही. या सगळ्यांत एक गोष्ट मात्र खरी की, गेली वीस वर्षे इथे खेळणे आणि जिंकणे माझ्यासाठी मोठ्या सन्मानाप्रमाणे ठरले’
– सानिया मिर्झा हिचे 7 जुलै 2022 रोजीचे ट्विट

आघाडी दवडली!

उपांत्य फेरीत पहिला सेट जिंकून आघाडी घेणाऱ्या सानिया-पॅव्हिच यांनी दुसऱ्या सेटमध्येही 4-2 अशी खणखणीत आघाडी घेतली होती; पण कामगिरीतील सातत्य, तीव्रता राखणे या दोघांना जमले नाही. परिणामी, पुढील सहापैकी पाच गेम या दोघांनी गमावले अन् आघाडी वाया गेली. निर्णायक सेटमध्येही सानिया-पॅव्हिचने प्रतिस्पर्ध्यांची सर्व्हिस मोडली, पण खूप वेळ दबाव राखणे सानिया व पॅव्हिचला जमले नाही. या सेटमधील 12 व्या गेममध्ये पॅव्हिचकडून दोनवेळा दुहेरी चुका झाल्या. अन् मग सामन्यात पुनरागमन करणे त्यांना अशक्य झाले.

2022 मधील सर्वोत्तम कामगिरी

सानिया मिर्झा मिश्र दुहेरीत पराभूत झाली असली तरी विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत मजल मारण्याइतपत सानियाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी 2011, 2013 आणि 2015 या विम्बल्डन मोसमात सानिया मिर्झा हिने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. 2015 मध्ये सानियाने मार्टिना हिंगिससह विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे जेतेपदही पटकावले होते. यंदाचा टेनिस मोसम संपला की सानिया आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त होणार आहे.

सानियाची कामगिरी

मिश्र दुहेरीचे जेतेपद

  • ऑस्ट्रेलियन ओपन
  • फ्रेंच ओपन
  • अमेरिकन ओपन

सानिया मिर्झा का घेणार निवृत्ती?

Sania Mirza

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!