sports news

National sports Awards | राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार लांबणीवर?

रोना महामारीचे पडसाद प्रत्येक क्षेत्रावर उमटत आहेत. क्रीडा क्षेत्राचीही भयंकर हानी करोना महामारीमुळे झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार National sports Awards | वितरणही लांबण्याची चिन्हे आहेत.

क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की करोना विषाणूमुळे coronavirus | यंदा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा National sports Awards | एक-दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रपती भवनाकडून दिशानिर्देश मिळाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांतर्गत राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्काराचे वितरण केले जाते.

महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी हे पुरस्कार दिले जातात. यंदा मात्र प्रथमच या पुरस्काराला विलंब होणार आहे. करोना महामारीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. मात्र, पुरस्कार लांबणीवर पडणार किंवा नाही याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की ‘‘आम्हाला अद्याप राष्ट्रपती भवनाकडून कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. आम्हाला क्रीडा पुरस्कारांबाबत National sports Awards | सूचना मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या वेळी हे सांगणे कठीण आहे, की पुरस्कार वितरण केव्हा होईल?’’


हेही वाचा…

खेलरत्नप्राप्त साक्षीचा
अर्जुन पुरस्कारावर दावा


 

ते म्हणाले, ‘‘कोविड-19 Covid-19 | मुळे सध्या देशभर सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध आहेत. म्हणूनच राष्ट्रपती भवनात कोणत्याही सोहळ्याचे आयोजन केले जात नाही.’’

अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘यापूर्वीही पुरस्कार वितरण सोहळा National sports Awards | विलंबाने झाला आहे. जर २९ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नाही, तर तो एक-दोन महिने उशिरा होऊ शकतो. तूर्तास सर्वांनी आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे.’’

करोना महामारीमुळे क्रीडा मंत्रालयाला गेल्या महिन्यात जूनमध्ये ऑनलाइन अर्ज जमा करण्याची मुदत वाढवावी लागली होती. खेळाडूंनी स्वत: पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्यासही परवानगी दिली होती. स्वत: खेळाडूंनी नाव देण्यास मान्यता दिल्यानंतर पुरस्कारांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत. मात्र, क्रीडा मंत्रालयाने अद्याप यावर निर्णय घेण्यासाठी समितीही स्थापन केलेली नाही. पुरस्कार वितरण सोहळ्याला आता तर अवघा एकच महिना शिल्लक आहे.

असे समजले आहे, की क्रीडा मंत्रालयाने अद्याप अर्जांची समीक्षाही सुरू केलेली नाही. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळ्याला विलंब होणे जवळजवळ निश्चित आहे. मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले, ‘‘यंदा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याला National sports Awards |विलंब होणे निश्चितच आहे. कारण अर्जांची समीक्षा करणे कठीण काम आहे. अद्याप ते सुरूही झालेले नाही.’’

पुरस्कार वितरणास विलंब लागणार असला तरी ते रद्द होणार नाहीत. याबाबत सूत्रांनी सांगितले, ‘‘मात्र पुरस्कार निश्चितच दिले जाणार आहेत. खेळाडू आणि प्रशिक्षकांचा तो हक्क आहे आणि ते पुरस्कारापासून वंचित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’


  • ही आहेत विलंबाची कारणे

  • करोना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध

  • २९ ऑगस्टला महिना बाकी असताना खेळाडूंच्या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी अद्याप समितीची स्थापना नाही

  • अर्जांची छाननी अद्याप करण्यात आलेली नाही

  • खेळाडूंना अर्ज भरण्याची मुभा दिल्याने अर्जांची संख्या मोठी

  • पुरस्कार वितरण एकदोन महिने विलंबाने होण्याची शक्यता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!