माजी क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे निधन
Follow us
मुंबई : माजी क्रिकेटपटू सदाशिव रावजी पाटील यांचे १५ सप्टेंबर २०२० रोजी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. Sadashiv Patil passes away | त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
Sadashiv Patil passes away | पाटील यांनी एका कसोटी सामन्यात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातले ते पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते.
Sadashiv Patil passes away | कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी पदाधिकारी रमेश कदम यांनी पीटीआयला सांगितले, ‘‘कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीमधील निवासस्थानी पाटील यांचे १५ सप्टेंबर रोजी झोपेतच निधन झाले.’’
वेगवान गोलंदाज असलेले अष्टपैलू पाटील यांनी 1955 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर मात्र त्यांना भारतीय संघात स्थान मिळालं नाही.
1952-1964 दरम्यान ते महाराष्ट्र संघाकडून प्रथम श्रेणीचे ३६ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ८६६ धावा केल्या, तर ८३ विकेट घेतल्या. त्यांनी रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपदही भूषविले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना त्यांच्या क्रिकेट प्रवासातील आठवणींनाही उजाळा दिला.
बीसीसीआयने म्हंटले आहे, की ‘‘मध्यमगती गोलंदाज पाटील यांनी 1952-53 च्या मोसमात प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. महाराष्ट्राकडून खेळताना त्यांनी आपल्या क्रिकेट कौशल्याची छाप सोडली.’’
बीसीसीआयने सांगितले, ‘‘प्रथमश्रेणीत त्यांच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईसारख्या दिग्गज संघाचीही मात्रा चालली नव्हती. महाराष्ट्राचा डाव 167 धावांत आटोपला असताना पाटील यांच्या गोलंदाजीमुळे मुंबईचा डाव 112 धावांत गारद झाला.’’
‘दुसऱ्या डावात त्यांनी 68 धावांत तीन गडी टिपले. त्यामुळे महाराष्ट्राने मुंबईसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 69 धावांनी विजय मिळवला. 1955 मध्ये न्यूझीलंडने भारत दौरा केला, तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व पॉली उम्रीगर यांनी केलं होतं. या संघात पाटील यांनी संघात (टेस्ट कॅप 79) पदार्पण केलं.’’
नव्या चेंडूने गोलंदाजी करताना पाटील यांनी प्रत्येक डावात एक-एक विकेट घेतली होती. त्या वेळी भारताने न्यूझीलंडविरुद्ध एक डाव आणि 27 धावांनी मोठा विजय मिळवला होता. विशेष म्हणजे पाटील यांनी यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध पश्चिम विभागाच्या संघाकडून खेळताना 74 धावांत सात गडी टिपत निवड समितीचे लक्ष वेधले होते.
मात्र, त्यानंतर पाटील यांना भारताकडून खेळण्याची पुन्हा संधी मिळाली नाही. मात्र, त्यांनी महाराष्ट्राकडून खेळणे सुरूच ठेवले. ते लंकाशर लीगमध्येही खेळले आहेत. या लीगमध्ये त्यांनी दोन मोसमांत (1959 आणि 1961) मध्ये 52 सामन्यांत 111 विकेट घेतल्या.
Sadashiv Patil passes away | पाटील यांनी 1952-1964 दरम्यान महाराष्ट्राकडून 36 प्रथमश्रेणी सामन्यांत 866 धावा केल्या, तर 83 विकेट घेतल्या. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे कर्णधारपदही भूषविले आहे.