All SportsCricketSports History

एम. ए. चिदंबरम स्टेडियम | M. A. Chidambaram cricket Stadium

एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
M. A. Chidambaram cricket Stadium

‘एम. ए. चिदंबरम स्टेडियम’ (M. A. Chidambaram cricket Stadium) हे नाव क्रिकेट स्टेडियमला का दिलं, याची माहिती घेऊया. तामिळनाडूतील चेन्नईत असलेल्या ‘एम. ए. चिदंबरम स्टेडियम’चं (M. A. Chidambaram cricket Stadium) नाव पटकन ओठांवर रुळत नाही. रुळतं ते ‘चेपॉक स्टेडियम’ (Chepauk Stadium). कारण चेन्नईत १७६८ ते १८५५ पर्यंत नवाबाचा एक ‘चेपॉक राजवाडा’ होता.

या राजवाड्याचा १८५९ मध्ये लिलाव झाला. हा लिलाव झाला ५,८९,००० रुपयांना! या राजवाड्याच्याच जागेवर हे स्टेडियम उभारण्यात आलं. त्यामुळे या स्टेडियमचं टोपणनाव ‘चेपॉक स्टेडियम’ असं पडलं आणि तेच क्रिकेटप्रेमींच्या ओठांवर अधिक रुळलं आहे.

पण मग ‘एम. ए. चिदंबरम स्टेडियम’ (M. A. Chidambaram Stadium) हे नाव कसं पडलं? तर भारतीय उद्योजक आणि क्रिकेट प्रशासक एम. ए. चिदंबरम अर्थात मुथय्या अन्नामलाई चिदंबरम यांचं नाव या स्टेडियमला दिलं आहे.

कोण हे एम. ए. चिदंबरम?

एम. ए. चिदंबरम (M. A. Chidambaram) उद्योजक होते, शिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते अध्यक्षही होते. तत्पूर्वी १९५६ मध्ये ते उपाध्यक्ष होते. त्यानंतर १९६०-६१ ते १९६२-६३ दरम्यान त्यांनी अध्यक्षपदाची धुराही सांभाळली.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते सुमारे २० वर्षे बीसीसीआयचे कोशाध्यक्षही राहिले आहेत. एवढंच नाही, तर तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे ते ३२ वर्षे अध्यक्षही होते. क्रिकेटशीच संबंध होता असे नाही, तर ते क्रिकेट प्रशासनाबरोबरच १९६३ ते १९६६ दरम्यान अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेचेही अध्यक्ष होते.

अर्थात, क्रिकेटमधील प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द अधिक काळ होती. स्टेडियमची उभारणी १९१६ मध्ये झाली. हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं स्टेडियम, जे ईडन गार्डन्सनंतर भारतात उभं राहिलं. त्या वेळी या स्टेडियमचं नाव होतं ‘मद्रास क्रिकेट क्लब ग्राऊंड (Madras Cricket Club Ground).

नंतर मद्रासचं नाव तामिळनाडू झालं आणि स्टेडिमयचंही नाव ‘एम. ए. चिदंबरम स्टेडियम’ असं झालं. प्रदीर्घ काळ क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द पाहता, चिदंबरम यांचं नाव या स्टेडियमला देणं त्या काळात समर्पक वाटलं असेल.

एम. ए. चिदंबरम (M. A. Chidambaram) हे नाव तुम्हाला अनोळखी वाटत असेल तर जवळची ओळख सांगतो. काँग्रेसचे नेते व भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम तुम्हाला माहीत असतीलच. हे पी. चिदंबरम एम.ए. चिदंबरम यांचे भाचे बरं का…!

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!