All SportsCricketSports History

Arun Jaitley cricket Stadium | अरुण जेटली स्टेडियम

अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
Arun Jaitley cricket Stadium

नवी दिल्लीच्या बहादूरशाह जफर मार्गावर हे स्टेडियम आहे. ‘अरुण जेटली स्टेडियम’ (Arun Jaitley cricket Stadium) हे नाव अजून तरी क्रिकेटप्रेमींच्या ओठांवर रुळलेलं नाही. किंबहुना अनेकांना असं काही नामकरण झालं असेल हे माहितीही नसेल. कारण ते अगदी अलीकडचं, म्हणजे १२ सप्टेंबर २०१९ रोजी दिलं आहे. आजही हे स्टेडियम फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम (Feroz Shah Kotla stadium) या नावानेच ओळखले जाते. 

अरुण जेटली दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होतेच, शिवाय ते भारताचे दिवंगत अर्थमंत्रीही होते.

अरुण जेटली यांचं २४ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झालं आणि त्याला महिनाही उलटत नाही तोच या स्टेडियमला अरुण जेटली यांचं नाव देण्यात आलं. यामागे राजकारणही होतं हे उघड सत्य आहे. त्यामुळेच या नामकरणानंतर वादाला तोंड फुटलं.

नामकरणाने वाद

स्टेडियमच्या नामकरणाने वाद उद्भवणारं हे पहिलंच स्टेडियम म्हणावं लागेल. कारण भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी जेटलींच्या या नावाला थेट विरोध केला.

बेदी म्हणाले, की अनेक स्टेडियमची नावं ही क्रिकेटपटूंच्या योगदानाचा सन्मान म्हणून दिली जातात. क्रिकेटमध्ये प्रशासकाचं योगदान काहीही नसतं. त्यामुळे जेटलींचं नाव देणार असाल तर या स्टेडिमयच्या एका गॅलरीला जे माझं नाव दिलं आहे ते काढून टाका. इतरही क्रिकेटपटूंना जेटलींचं नाव रुचलं नाही, पण त्यांनी उघडउघड विरोध करणं टाळलं.

जेटली दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचेही ते उपाध्यक्ष होते. त्यामुळे या स्टेडियमला जेटलींचंच नाव असायला हवं, असा भाजपमधून सूर होता. बीसीसीआयच्या सचिवपदी भाजपचेच प्रमुख नेते अमित शहा यांचा मुलगा

स्टेडियमचा इतिहास

नवी दिल्लीतलं हे स्टेडियम फिरोजशाह कोटला (Feroz Shah Kotla stadium) या नावाने क्रिकेटप्रेमींना परिचित आहे. हे नावही देण्यामागे एक इतिहास आहे. फिरोजशाह कोटला किंवा कोटला या नावाने सुलतान फिरोजशाह तुघलक याने किल्ला बांधला होता. त्याला फिरोजाबाद असंही म्हंटलं जातं.

हा सगळा इतिहास असताना अरुण जेटली यांचं नाव स्टेडियमला (Arun Jaitley cricket Stadium) दिल्याने बेदींनी त्याला जोरदार विरोध केला. तसेही दिल्ली क्रिकेट संघटनेत बिशनसिंग बेदी हे जेटलींचे कडवे विरोधक होतेच. मात्र विरोध मुद्द्याला होता, व्यक्तीला नाही, असंही ते म्हणाले होते.

या वादानंतर दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं, की स्टेडियमला जरी अरुण जेटली यांचं नाव दिलं असलं तरी मैदानाचं नाव फिरोजशाह कोटला ग्राऊंड असंच राहील.

arun-jaitley-cricket-stadium
Kotla Fort in New Delhi

या स्टेडियमचा इतिहास जुना आहे. १८८३ मध्ये कोटला किल्ल्याजवळ हे स्टेडियम बांधण्यात आलं. या स्टेडियममध्ये वेगवेगळ्या गॅलरींना भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी, माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ, माजी सलामीवीर व दिल्ली रणजी संघाचा कर्णधार गौतम गंभीर, सध्याचा कर्णधार विराट कोहली यांची नावं देण्यात आली आहेत.

भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमला रमण लांबा व त्याच्यासमोरील ड्रेसिंग रूमला प्रकाश भंडारी यांचं नाव देण्यात आलं आहे.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”cricket”]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!