All SportsFootball

युरोच्या जेतेपदासाठी सलग चौथ्यांदा इटली-स्पेन आमनेसामने

युरोच्या जेतेपदासाठी सलग चौथ्यांदा इटली-स्पेन आमनेसामने

एक संघ गेल्या ३२ सामन्यांत अजिंक्य, तर दुसरा १२ सामन्यांत अपराजित. एकाने जगातील अव्वल नंबरच्या संघाला सहज पराभूत केले, तर दुसऱ्याला जिंकण्यासाठी पेनल्टी शूटआउटपर्यंत झुंजावं लागलं. युरो Euro | स्पर्धेच्या जेतेपदासाठी इटली Italy | आणि स्पेन Spain | हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र, त्यांच्यापैकी आता एकालाच अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. कारण हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले आहेत.

यूरोपीय चॅम्पियनशिपमध्ये सलग चौथ्यांदा हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना मंगळवारी, 6 जुलै 2021 रोजी लंडनच्या वेम्बले स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. म्युनिखमध्ये इटलीने अव्वल स्थानावरील बेल्जियमचा 2 -1 असा पराभव केला. स्पेनने सेंट पीटर्सबर्गमध्ये स्वित्थर्लंडला पेनल्टी शूटआउटवर पराभूत केले. इटलीचा संघ मागील 32 सामन्यांत अजिंक्य आहे, तर स्पेनने 12 सामन्यांत एकही पराभव स्वीकारलेला नाही.

euro rivalry italy spain | स्पर्धेत स्पेनने सर्वाधिक 12 गोल डागले आहेत, तर इटलीने 11 गोल केले आहेत. या दोन्ही संघ यापूर्वी 2018 च्या विश्वकरंडक पात्रता फेरीत आमनेसामने आले होते. इटलीला एका सामन्यात पराभव आणि स्पेनविरुद्धच्या सामन्यात बरोबरी स्वीकारावी लागल्यानंतर इतिहासात दुसऱ्यांदा ते विश्वकरंडकसाठी पात्रता गाठू शकलेले नाही.

euro rivalry italy spain | या दोन्हीं संघांपैकी एक संघ 2012 मध्ये अंतिम फेरीत दाखल झाला होता. त्या वेळी स्पेनने इटलीला 4-0 असे  पराभूत करीत युरो किताब जिंकला होता. या सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंपैकी स्पेनच्या संघात मिडफील्डर सर्जियो बस्केट्स आहे, तर इटलीच्या संघात डिफेंडर लियोनार्डो बोनुची आणि जियोर्जियो चियेलिनी आहे.

इटलीने स्पेनला यूरो 2016 च्या अंतिम 16 तील सामन्यात पराभूत करीत सलग तिसऱ्यांदा युरोचा किताब जिंकण्यापासून रोखले होते. स्पेनने इटलीला यूरो 2008 च्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते.

euro rivalry italy spain | स्पेनचे प्रशिक्षक लुई एनरिक 1994 च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळले आहेत, तर उपांत्यपूर्व फेरीत इटलीटा डिफेंडर माउरो तासोत्ती याने त्यांचे नाक फोडले होते. इटली त्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, ब्राझीलने त्यांना पराभूत केले होते.

इटलीचे प्रशिक्षक राबर्टो मंचिनी 1994 मध्ये विश्वकरंडक स्पर्धेत खेळलेले नाहीत. ते 2018 मध्ये प्रशिक्षक म्हणूनच राष्ट्रीय संघात परतले आहेत.

12 मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची इटलीची ही बारावी वेळ आहे.
15 पात्रता फेरीच्या लढतीसह इटलीचा हा युरो कपमधील सलग पंधरावा विजय ठरला. इटलीने युरो कपमधील सलग १४ विजयांचा बेल्जियम आणि जर्मनीचा विक्रम मोडला.
06 निकोलो बॅरेलाचा हा सहावा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. या सहाही लढती इटलीने जिंकल्या आहेत.
03 बेल्जियमला युरो कपमधील मागील पाचपैकी तीन पराभव हे इटलीकडून पत्करावे लागले आहेत.
05 यंदाच्या युरोमध्ये इटलीने सलग पाच विजय मिळविले आहेत. यात त्यांनी अकरा गोल नोंदविले आहेत. पहिल्यांदाच त्यांनी युरोमध्ये गोलचा दुहेरी आकडा गाठला.
35 इटलीने मागील ३५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकापेक्षा जास्त गोल स्वीकारलेला नाही.
[jnews_block_2 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!