भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी20 स्पर्धेसाठी 12 फेब्रुवारी 2022 रोजी सर्वांत मोठा लिलाव पार पडला. यात 23 वर्षीय ईशान किशन याच्यासाठी सर्वाधिक 15 कोटी 25 लाखांची बोली लागली. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज असलेला ईशान किशन याला 2022 च्या आयपीएल लिलावात मुंबई संघाने खरेदी केले. आयपीएल लिलावाच्या इतिहासातली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बोली ठरली आहे. यापूर्वी दिल्ली संघाने भारताचा माजी अष्टपैलू युवराजसिंग याला 2015 च्या आयपीएलमध्ये 16 कोटींची बोली लावून आपल्या गोटात घेतले होते. ईशान किशन याला आपल्याकडे खेचण्यासाठी मुंबई आणि हैदराबादमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. अखेरीस मुंबईने बाजी मारली. याशिवाय वेगवान गोलंदाजांवर लागलेल्या बोलींनी डोळे विस्फारले.
वेगवान गोलंदाज दीपक चाहरला त्याच्याच चेन्नई संघाने आपल्या गोटात राखले. त्यासाठी त्यांनी तब्बल 14 कोटी मोजले. दीपकव्यतिरिक्त श्रेयस अय्यर (कोलकाता 12 कोटी 25 लाख), शार्दूल ठाकूर (दिल्ली 10.75 कोटी), गेल्या मोसमात सर्वाधिक मोहरे टिपणारा हर्षल पटेल (बेंगळुरू 10.75 कोटी), प्रसिद्ध कृष्णा (राजस्थान 10 कोटी), लॉकी फर्ग्युसन (गुजरात 10 कोटी), आंतरराष्ट्रीय पदार्पण न झालेला आवेश खान (लखनौ 10 कोटी) या खेळाडूंच्या बड्या बोलींनी लक्ष वेधून घेतले. ईशान किशनची आधारभूत रक्कम दोन कोटी होती. मुळातच ईशानसाठी मोठी बोली लागणार असा अंदाज आदल्या दिवशीच आयपीएल तज्ज्ञांनी नोंदविला असल्याने मुंबई संघाने सुरुवातीपासूनच पैसे राखून ठेवत फार बोली लावल्या नाहीत.
यापूर्वी 2015 च्या आयपीएल मोसमात दिल्ली संघाने युवराजसिंगसाठी 16 कोटींची बोली लावली होती. या भारतीय खेळाडूनंतर ईशान किशन यंदाच्या आयपीएलचा महागडा खेळाडू ठरला आहे. मात्र, आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस आहे. 2021 च्या आयपीएल लिलावात राजस्थानने मॉरिससाठी 16.25 कोटी मोजले होते. ही विक्रमी बोली अद्याप तरी कोणत्याही खेळाडूवर आतापर्यंत लागलेली नाही.
कोट्यधीश
- हर्षल पटेल-बेंगळुरू 10.75 कोटी
- शार्दूल ठाकूर-दिल्ली 10.75 कोटी
- वानिंदू हसरंगा- बेंगळुरू 10.75 कोटी
- प्रसिद्ध कृष्णा- राजस्थान 10 कोटी
- लॉकी फर्ग्युसन-गुजरात 10 कोटी
- आवेश खान- लखनौ 10 कोटी
- कागिसो रबाडा-पंजाब 9.25 कोटी
- शाहरूख खान-पंजाब 9 कोटी
- ट्रेंट बोल्ड- राजस्थान 8 कोटी
- शेमरॉन हेटमायर- राजस्थान 8.50 कोटी
- जेसन होल्डर- लखनौ 8.75 कोटी
- राहुल त्रिपाठी- हैदराबाद 8.5 कोटी
- नितीश राणा- कोलकाता 8 कोटी
- वॉशिंग्टन सुंदर- हैदराबाद 8.75 कोटी
- कृणाल पंड्या- लखनौ 8.25 कोटी
- देवदत्त पडीक्कल- राजस्थान 7.75 कोटी
- जोश हेझलवूड- बेंगळुरू 7.75 कोटी
- मार्क वूड- लखनौ 7.75 कोटी
- पॅट कमिन्स-कोलकाता 7.25 कोटी
- शिवम मवी- कोलकाता 7.25 कोटी
- फाफ डुप्लेसिस- बेंगळुरू 7 कोटी
- क्विंटन डीकॉक- लखनौ 6.75 कोटी
- जॉनी बेअरस्टो- पंजाब 6.75 कोटी
- मिचेल मार्श- दिल्ली 6.50 कोटी
- अभिषेक शर्मा- हैदराबाद 6.5 कोटी
- डेव्हिड वॉर्नर- दिल्ली 6.25 कोटी
- मोहम्मद शमी- गुजरात 6.25 कोटी
- अंबाती रायुडू- चेन्नई 6.75 कोटी
- दीपक हुडा- लखनौ 5.75 कोटी
- दिनेश कार्तिक- बेंगळुरू 5.50 कोटी
- राहुल चहर- पंजाब 5.25 कोटी
- मनीष पांडे- लखनौ 4.60 कोटी
- ड्वेन ब्राव्हो- चेन्नई 4.40 कोटी
- भुवनेश्वर कुमार- हैदराबाद 4.2 कोटी
- नटराजन- हैदराबाद 4 कोटी
- जेसन रॉय- गुजरात 2 कोटी
- मुस्तफिझूर रहमान- दिल्ली 2 कोटी
- कुलदीप यादव- दिल्ली 2 कोटी
आंतरराष्ट्रीय पदार्पण न करताच कोट्यधीश
हे माहीत आहे काय?
आयपीएल लिलावासाठी किती खेळाडू उपलब्ध होते?
Follow on Facebook page kheliyad