All SportsEnvironmentalsciencesports news

ड्यून- पर्यावरण चळवळीचा दीपस्तंभ

ड्यून- पर्यावरण चळवळीचा दीपस्तंभ

नवोदित पर्यावरण चळवळीसाठी ‘ड्यून’ दीपस्तंभ का ठरली, यावर प्रा. डेविन ग्रिफिथ्स यांनी प्रकाश टाकला आहे. ग्रिफिथ्स हे यूएससी डोर्नसाइफ कॉलेज ऑफ लेटर्स, आर्ट अँड सायन्सेसचे इंग्रजी आणि तुलनात्मक साहित्याचे असोसिएट प्रोफेसर आहेत.

ड्यून- पर्यावरण चळवळीचा दीपस्तंभ

‘ड्यून’ (Dune), जिला व्यापक अर्थाने सर्वकालीन सर्वोत्कृष्ट विज्ञान आधारित कादंबऱ्यांपैकी एक मानले जाते. लेखक, कलाकार आणि शोधकर्त्यांनी भविष्याची कल्पना करण्याच्या पद्धतीवर प्रभाव पाडणे सुरूच ठेवले आहे.

अर्थात, डेनिस विलेन्यूल्हचे (Denis Villeneuve) दृश्यात्मक रूपाने थक्क करणारे चित्रपट आहेत- ड्यून : भाग १ (2021) (Dune: Part One) (2021) आणि ड्यून : भाग २ (2024) (Dune: Part Two).

मात्र, फ्रँक हर्बर्टच्या (Frank Herbert) उत्कृष्ट साहित्यकृतीने आफ्रोफ्युचरिस्ट कांदंबरीकार ऑक्टेविया बटलर (Octavia Butler) यांना पर्यावरणीय आपत्तीदरम्यान संघर्षाच्या भविष्याची कल्पना करण्यास मदत झाली. त्याने इलॉन मस्कला स्पेसएक्स (SpaceX) आणि टेस्ला (Tesla) तयार करण्यासाठी आणि मानवतेला ताऱ्यांकडे आणि हिरव्या भविष्याकडे पाठवण्याची प्रेरणा दिली. जॉर्ज लुकासच्या (George Lucas) ‘स्टार वॉर्स’ फ्रँचायझीत विशेषत: वाळवंटातील ग्रह आणि विशाल कीटकांबद्दलचे त्याचे आकर्षण यात समानता न पाहणे कठीण आहे.

हर्बर्ट जेव्हा 1963 मध्ये ‘ड्यून’ लिहायला बसला तेव्हा तो पृथ्वीला मागे कसे सोडायचे, याचा विचार करीत नव्हता, तर ही पृथ्वी कशी वाचवायची, याचा विचार करीत होता.

हर्बर्ट आपल्या ग्रहावरील पर्यावरण संकटांबाबत एक गोष्ट सांगू इच्छित होता. एक असं विश्व जे पर्यावरणीय आपत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे.

फक्त 50 वर्षांपूर्वी अकल्पनीय असलेल्या तंत्रज्ञानाने जगाला आण्विक युद्ध आणि पर्यावरणीय संकुचित होण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. मोठमोठे उद्योग जमिनीतून संपत्ती शोषत होते आणि विषारी धूर आकाशात सोडत होते.

जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं, तेव्हा हा विषय वाचकांच्या अग्रस्थानी आणि केंद्रस्थानीही होता. अखेर, ते क्यूबन क्षेपणास्त्र संकट आणि ‘सायलेंट स्प्रिंग’ (Silent Spring)चे प्रकाशन, पर्यावरणवादी रॅचेल कार्सन यांचा प्रदूषण, पर्यावरण आणि मानवी आरोग्याला यातून असलेला धोका याविषयीचा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर जगत होते.

‘ड्यून’ (Dune) लवकरच नवोदित पर्यावरण आंदोलनासाठी एक दीपस्तंभ आणि पर्यावरणाच्या नव्या विज्ञानासाठी अग्रेसर बनेल.

स्वदेशी ज्ञान

अर्थात, ‘पर्यावरणशास्त्र’ हा शब्द जवळजवळ एक शतकापूर्वीच बिंबवला परिचयास आला असला तरी पर्यावरणशास्त्रावरील पहिले पाठ्यपुस्तक 1953 पर्यंत लिहिले गेले नव्हते. त्या वेळी वृत्तपत्रे किंवा मासिकांमध्ये या क्षेत्राचा उल्लेख क्वचितच केला गेला असावा. उदयोन्मुख विज्ञानाबद्दल फार कमी वाचकांनी ऐकले होते आणि आपल्या ग्रहाच्या भविष्याबद्दल ते काय सुचवते हे अगदी कमी लोकांना माहीत होते.

मी पर्यावरणशास्त्राच्या इतिहासावर लिहीत असलेल्या पुस्तकासाठी ‘ड्यून’चा अभ्यास करीत असताना, हर्बर्टने विद्यार्थी किंवा पत्रकार म्हणून पर्यावरणशास्त्राबद्दल कोणतेही शिक्षण घेतलेले नाही याचे मला आश्चर्य वाटले. त्याऐवजी, त्याला पॅसिफिक वायव्येकडील जमातींच्या संवर्धन पद्धतींद्वारे पर्यावरणाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली. विशेषत: दोन मित्रांकडून त्यांनी त्यांच्याबद्दल जाणून घेतले.

पहिला होता विल्बर टेर्निक (Wilbur Ternyik), जो चीफ कोबोवेचा (Chief Coboway) वंशज आणि क्लॅटसॉपचा नेता होता. शोधक मेरीवेदर लुईस आणि विल्यम क्लार्क यांची मोहीम 1805 मध्ये वेस्ट कोस्टला पोहोचली तेव्हा त्यांचे त्याने स्वागत केले. दुसरा, हॉवर्ड हॅन्सन (Howard Hansen), एक कलाशिक्षक आणि क्विलेउट जमातीचे (Quileute Tribe) मौखिक इतिहासकार होते.

टेर्निक, जे एक तज्ज्ञ क्षेत्रीय पर्यावरणशास्त्रज्ञही होते, त्यांनी 1958 मध्ये हर्बर्टला ओरेगॉनच्या ढिगाऱ्यांवर (Oregon’s dune) फेरफटका मारायला नेले. तेथे त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील गवत आणि इतर खोलवर रुजलेल्या वनस्पतींचा वापर करून वाळूचे मोठे ढिगारे तयार करण्याचे त्यांचे कार्य स्पष्ट केले. जवळच्या फ्लॉरेन्स शहरात – एक टेराफॉर्मिंग तंत्रज्ञान ज्याचे वर्णन ‘ड्यून’ (Dune) मध्ये केले आहे.

जसे टेर्निक यांनी अमेरिकी कृषी विभागासाठी एका पुस्तिकेत म्हटले आहे, की ओरेगॉनमधील त्यांचे कार्य युरोपियन वसाहतवादामुळे प्रभावित लँडस्केप, विशेषत: सुरुवातीच्या स्थानिकांनी तयार केलेल्या मोठ्या नदी-खोऱ्यांना चांगले करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता.

या रचनेमुळे किनारपट्टीवरील प्रवाह विस्कळीत झाले आणि वाळूचे विशाल क्षेत्रात विस्तारली. इतकी, की ती वायव्य प्रशांत महासागराच्या वाळवंटात पसरली. ही परिस्थिती ‘डून’मध्ये प्रतिध्वनित होते, जिथे कादंबरीचे स्थान, अराकिस (Arrakis) ग्रहाला पहिल्या वसाहतवाद्यांनी त्याचप्रकारे उद्ध्वस्त केले होते.

हर्बर्टच्या मुलाचे गॉडफादर बनलेले हेन्सन यांनी वॉशिंग्टनच्या किनारपट्टीतील क्विल्यूट (Quileute) लोकांच्या मातृभूमीवर लाकूडतोडीइतक्याच गंभीर परिणामांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी हर्बर्ट यांना पर्यावरणशास्त्राचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास प्रोत्साहित केले आणि त्याची पॉल बी. सीयर्स यांच्या ‘व्हेअर देअर इज लाइफ’ (Where There is Life)शी ओळख करून दिली. यातून हर्बर्टने आवडत्या वाक्यांपैकी एक वाक्य उद्धृत केले आहे- “विज्ञानाचे सर्वोच्च कार्य म्हणजे आम्हाला परिणामांची समज देणे.”

अर्राकिसच्या वाळवंटात (deserts of Arrakis) ड्यनचे फ्रीमेन (Fremen) राहतात (फ्रीमेन म्हणजे फ्रँक हर्बर्टच्या काल्पनिक ड्यून विश्वातील लोकांचा समुदाय). हे फ्रीमेन परिसंस्था आणि वन्यजीवांचे व्यवस्थापन करतात. आपलं विश्व वाचवण्यासाठी ते पर्यावरणशास्त्र आणि स्वदेशी पद्धतींचे कुशलतेने मिश्रण करतात.

वाळूत दडलेला खजाना

मात्र, ज्या कामाने ‘ड्यून’वर खोलवर परिणाम केला, तो होता लेस्ली रीड (Leslie Reid) याचा 1962 मधील ‘द सोशियोलॉजी ऑफ नेचर’ हा पर्यावरणविषयक अभ्यास. या ऐतिहासिक कार्यात रीडने पर्यावरणातील सर्व प्राण्यांचे जटिल परस्परावलंबित्व स्पष्ट करीत पर्यावरण आणि पर्यावरण तंत्रविज्ञानाची व्याख्या केली आहे.

रीड लिहितो, “पर्यावरणाचा जेवढा खोलवर अभ्यास केला जातो, तेवढा तो स्पष्ट होतो, की परस्परावलंबन हा प्रमुख सिद्धान्त आहे. प्राणी अवलंबित्वाच्या अतूट बंधनात एकमेकांशी बांधलेले आहेत.

रीडच्या पुस्तकातील पानांमध्ये हर्बर्टला पेरूच्या ग्वानो बेटाच्या आश्चर्यकारक ठिकाणावरील अर्राकिसच्या परिसंस्थेचे एक मॉडेल सापडले. रीडने स्पष्ट केल्याप्रमाणे, या बेटांवर आढळणारी संचित पक्ष्यांची विष्ठा हे एक आदर्श खत होते. नवीन ‘पांढरे सोने’ आणि पृथ्वीवरील सर्वांत मौल्यवान खतांपैकी एक म्हणून वर्णन केलेल्या ग्वानोच्या पर्वतांचे घर- ग्वानो बेटे 18 व्या शतकाच्या अखेरीस स्पेन, पेरू, बोलिव्हिया, चिली आणि इक्वेडोरसह त्याच्या अनेक पूर्वीच्या वसाहतवाद्यांच्या संसाधनयुद्धाचा केंद्रबिंदू बनले.

‘ड्यून’ कथेच्या केंद्रस्थानी ‘मसाला’ या अमूल्य संसाधनावरील नियंत्रणासाठी लढा आहे. वाळवंटातील ग्रहाच्या वाळूपासून मिळणारे हे पीक अन्नासाठी उत्कृष्ट चव आणि मतिभ्रम औषध असे दोन्ही आहे.
मात्र, या तथ्यात काही अशीही विडंबना आहे, की हर्बर्टने पक्ष्यांच्या विष्ठेपासून मसाल्याची कल्पना मांडली. अर्थात, रीडच्या वेगळ्या आणि कार्यक्षम परिसंस्थेच्या काळजीपूर्वक वर्णनाने तो मोहित झाला, ज्याने मौल्यवान (हानिकारक असली तरी) वस्तूची निर्मिती केली.

पर्यावरणशास्त्रज्ञांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, प्रशांत महासागरातील थंड प्रवाह पोषक तत्त्वांना जवळच्या पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलतात. त्यामुळे प्रकाशसंश्लेषक प्लवक (Plankton- समुद्र, सरोवरे अशा पाण्याच्या मोठ्या साठ्यांमध्ये राहणाऱ्या विविध सजीवांच्या विशिष्ट समूहाला ‘प्लवक’ (प्लँक्टन) म्हणतात.) वाढण्यास मदत होते. ते माशांच्या आश्चर्यकारक वाढीस कारणीभूत ठरतात, ज्यामुळे व्हेल, तसेच पक्ष्यांना भोजन मिळते.

‘ड्यून’च्या सुरुवातीच्या मसुद्यामध्ये, हर्बर्टने हे सर्व टप्प्यांना वाळवंटातील कीटकांच्या (जे फुटबॉलच्या मैदानाइतक्या आकारात व्यापलेले असतात) जीवनचक्राशी जोडले. हे कीटक वाळवंटात फिरतात आणि रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तू गिळतात.

हर्बर्ट कल्पना करतात, की यापैकी प्रत्येक भयंकर जीव छोट्या, प्रकाश संश्लेषक रोपांपासून सुरू होऊन मोठ्या ‘सँड ट्राउट’ (sand trout)मध्ये रूपांतरित होतात. (सँडट्रॉउट म्हणजे वाळूमधील विविध अळ्यांचे लार्वा स्वरूप. यात गोड्या पाण्यातील जळवा, आकारहीन ब्लॉब्स किंवा स्लग्ससारख्या असतात.) अखेरीस, ते वाळवंटातील वाळूचे मंथन करणारे, पृष्ठभागावर मसाला टाकणारे प्रचंड वाळूचे किडे बनतात.

ही दोन्ही पुस्तकांत (ड्यून: भाग एक आणि दोन), गुर्नी हॅलेक या सैनिकाने एक गूढ श्लोक पाठ केला आहे, जो सागरी जीवनाच्या या उलट्या आणि उत्खननाच्या रखरखीत शासनावर भाष्य करतो- “कारण ते समुद्रातील विपुलता आणि वाळूमध्ये लपलेला खजिना शोषून घेतील.”

1965 मध्ये ‘ड्यून’ प्रकाशित झाल्यानंतर, पर्यावरण चळवळीने ते उत्सुकतेने स्वीकारले. मला आशा आहे, की 1960 च्या दशकात हर्बर्टच्या दूरदृष्टीने जे पर्यावरणावरील इशारे दिले, ते वाचकांमधून सशक्तपणे ध्वनित होतील आणि ‘ड्यून ३’मध्ये अधोरेखित केले जातील.

निळावंती ग्रंथामागचे रहस्य काय?

पर्यावरणपुरुष : श्रीकांत नावरेकर

#frankherbert #Dune #ड्यून, #डून #पर्यावरणचळवळ #पर्यावरण #ecology

Visit us

[jnews_block_9 first_title=”Read More At :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”2123″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!