All SportsHockeyTokyo Olympic 2020

ध्वजवाहक मनप्रीतचा प्रवास.. मिठापूर ते टोकियो!

ई मुश्किलीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. आईचे कष्ट बालपणी तो पाहत होता. त्याच वेळी त्याने ठरवलं, काही तरी विशेष करायचं. काय करायचं माहीत नाही; पण त्याला काही तरी विशेष करायचं होतं. तेच त्याचं स्वप्न. हे स्वप्न त्याने सत्यात उतरवलंही. हा मुलगा म्हणजे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग. पंजाबच्या मिठापूर गावापासून टोकियोपर्यंत तिरंगा ध्वज उंचावणारा मनप्रीत याने संघर्षाची ही कहाणी यशाच्या शाईने लिहिली. काही तरी विशेष करणं काय असतं तर ते हे.

ध्वजवाहकाचा मान मिळविणारा सहावा खेळाडू


टोकियोमध्ये 23 जुलै 2021 रोजी ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग आणि प्रसिद्ध मुष्टियोद्धा एम. सी. मेरी कोमसोबत भारतीय पथकाचा ध्वजवाहक असेल. हा सन्मान मिळविणारा मनप्रीत सहावा, तर परगटसिंग (अटलांटा ऑलिम्पिक 1996) यांच्यानंतर पहिलाच भारतीय हॉकीपटू आहे. मनप्रीत म्हणतो, ‘‘मी कधीच विचार केला नव्हता, की मला अशी संधी मिळेल. मला जेव्हा कळलं तेव्हा मी स्तब्धच झालो. माझ्याकडे शब्दच नव्हते. माझ्यासाठी आणि भारतीय हॉकीसाठी हा मोठा क्षण आहे. मिठापूरमधून परगट सरांनंतर मी दुसराच खेळाडू आहे, जो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा ध्वजवाहक बनणार आहे.’’

भारतीय संघात 2011 मध्ये पदार्पण करणाऱ्या मनप्रीतसाठी मिठापूर ते टोकियोपर्यंतच्या प्रवासात बरंच काही बदललं आहे. तो म्हणाला, ‘‘मी चांगल्या खेळाडूंकडून खूप काही शिकलो आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. आता मागे वळून पाहताना मला गर्व होतो, की मी माझ्या कुटुंबाचा, गावाचा आणि देशाचा गौरव वाढवू शकलो. ’’

मनप्रीतचे वडील दुबईत सुतारकाम करायचे. मनप्रीत अवघ्या दहा वर्षांचा होता. त्या वेळी वडील मानसिक तणावातच भारतात परतले. नंतर ते काहीही काम करू शकले नाहीत. मनप्रीतला दोन भाऊ. मात्र, कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल असा कोणीच नव्हता. अखेर मनप्रीतच्या आईनेच कुटुंबाचा डोलारा आपल्या शिरावर घेतला. त्यांनी शिवणकाम करीत कुटुंबाला सावरलं. आईचा संघर्ष पाहून मनप्रीत अस्वस्थ व्हायचा. या परिस्थितीसमोर तोही हतबल होता. कारण तो खूपच लहान होता. मात्र, त्याने निश्चय केला, की आईला माझ्यावर गर्व वाटेल, असं काही तरी करायचं.

मनप्रीतचा आदर्श होते मिठापूरमध्येच जन्मलेले परगटसिंग. मनप्रीत म्हणाला, ‘‘मी पाहत होतो, की त्यांना गावात किती सन्मान होता! त्या वेळी ते डीएसपी होते. मी लहानपणी त्यांना भेटल्यावर म्हणालो, मीपण एक दिवस तुमच्यासारखा डीएसपी बनेन. आज मी त्याच पदावर आहे.’’

‘‘मी चांगल्या खेळाडूंकडून खूप काही शिकलो आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. आता मागे वळून पाहताना मला गर्व होतो, की मी माझ्या कुटुंबाचा, गावाचा आणि देशाचा गौरव वाढवू शकलो. ’’

वडील आज हवे होते…


कधीच हार मानायची नाही हे मनप्रीत लहानपणापासूनच शिकला होता. त्याला जेव्हा वडिलांची तीव्रतेने उणीव भासली तेव्हा ते या जगातच नव्हते. मनप्रीत म्हणतो, ‘‘आईला जेव्हा समजलं, की मला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे, तेव्हा ती भावूक झाली. मी माझ्या वडिलांचा लाडका होतो. मात्र, माझ्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा क्षण पाहण्यासाठी ते आज हयात नाहीत. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार होतानाही ते मला पाहू शकले नाहीत. त्यांचं स्वप्न होतं, की मी भारतासाठी खेळावं. मला विश्वास आहे, की टोकियोत जेव्हा मी तिरंगा हाती घेईन तेव्हा ते ढगातून मला आशीर्वाद देत असतील!’’

ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक बनण्याचा सन्मान हॉकीमध्ये लालसिंग बुखारी(1932 लॉस एंजिल्स), मेजर ध्यानचंद (1936 म्युनिक ऑलिम्पिक), बलबीरसिंग सीनिअर (1952 हेलसिंकी ऑलिम्पिक), जफर इकबाल (1984 लॉस एंजिल्स) आणि परगटसिंग (1996 अटलांटा ऑलिम्पिक) यांना मिळाला आहे.

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग म्हणतो…


मनप्रीत म्हणाला, ‘‘मी नशीबवान आहे, की अशा महान खेळाडूंसोबत माझं नाव जोडलं जाणार आहे. माझी सगळी स्वप्ने पूर्ण होत आहेत. आता एकच स्वप्न राहिलं आहे, ते म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं.’’

अपेक्षांचं ओझं असलं तरी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंगला कोणताही तणाव नाही. याबाबत तो म्हणतो, ‘‘अपेक्षांचं ओझं अजिबात नाही. मी हे सकारात्मकपणे घेतो. देश चाळीस वर्षांपासून हॉकीत ऑलिम्पिक पदक जिंकण्याची वाट पाहत आहे. चांगलं वाटतं, की संपूर्ण देशवासीयांची प्रार्थना आमच्यासोबत आहे. आम्हाला पदक जिंकताना सर्वांनाच पाहायचं आहे.’’

मनप्रीतला संघाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि आघाडीच्या संघांना पराभूत करण्याचा आत्मविश्वासही. गेल्या चार वर्षांपासून भारतीय हॉकी संघाचा कर्णधार असलेला मनप्रीतसिंग याने सांगितले, ‘‘हा संघ झुंजार आहे. प्रतिस्पर्धी संघाची भीती कधीच बाळगत नाही. आमच्या 19 खेळाडूंनी यो यो चाचणी पास केली आहे. तंदुरुस्तीत आम्ही कुणापेक्षाही कमी नाही. नेदरलँड, बेल्जियम, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांविरुद्ध तोडीस तोड खेळण्याची संघात क्षमता आहे.’’

मनप्रीत तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. लॉकडाउनमध्ये संघासोबत परस्पर ताळमेळ उत्तम झाला आहे. त्याचे प्रतिबिंब कामगिरीत दिसून येईल, असा विश्वासही मनप्रीतने व्यक्त केला.

हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग

[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”94″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!