All Sportscyclingsports news

सायकलवीरांचे थक्क करणारे पाच व्हिडीओ

सायकलवीरांचे थक्क करणारे पाच व्हिडीओ

माउंटेन बाइकर म्हणजे काय, हे पाहायचं असेल तर तुम्ही जगभरातील वेगवेगळ्या सायकलवीरांचे थक्क करणारे हे पाच व्हिडीओ अवश्य पाहिले पाहिजे. वेग आणि समतोल यावर कमालीचं प्रभुत्व असलेले हे सायकलवीर तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. नागमोडीचे उंच-सखल रस्ते, छाती दडपणाऱ्या दऱ्याखोऱ्यांतील सायकलउड्या जबरदस्तच. अर्थात, त्यामागे त्यांची अनेक वर्षांची मेहनत आहे. स्टंट करताना ते अनेकदा पडलेधडले आहेत. तेव्हा कुठे त्यांना हे कौशल्य प्राप्त झालं आहे. तुम्ही सरावाविना तसा प्रयत्न करू नका. मात्र, या सायकलवीरांचे थक्क करणारे हे पाच व्हिडीओ जरूर पाहा….

5. श्वास रोखून धरणारं MTB कौशल्य | क्रिस काइल याची थरारक सायकलिंग

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=9sha8AVzJtY” column_width=”4″]

क्रिस काइलचा हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. काय अप्रतिम कौशल्य आहे त्याचं सायकलीवर! क्रिस काइल (Kriss Kyle) स्कॉटलंडमधील प्रसिद्ध BMX रायडर आहे. त्याने Red Bull, BSD Forever, Nike, endura official, Light on Vans, specialized_uk, nevontaii, renthal_cycling, hippieturtleherbalco आणि इतर अनेक ब्रँड्ससोबत काम केले आहे. सायकलीवरील त्याची अद्भुत प्रतिभा आणि कौशल्य कमालच. क्रिस काइलने 2008 मध्ये दि ट्रान्सग्रेशन स्केटपार्क जॅम ही सर्वांत प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली. कारकिर्दीतलं हे त्याचं पहिलंच यश. काही तरी नवीन आणि काही तरी चांगलं करण्याचा त्याचा ध्यास त्याला सायकलिंगवर हुकूमत गाजविण्यास चालना देत आहे. हीच त्याच्या यशाची आणि चिकाटीची गुरुकिल्ली आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या जीवनशैलीची आणि आवडीची झलक तो नेहमी शेअर करतो. त्याचा डॅशिंग लूक, युनिक आउटफिट्स आणि डेबोनेअर व्यक्तिमत्त्व यामुळे तो नेहमी चर्चेत असतो.

4. विबमरचा नियम- फॅबियो विबमर

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=ZDbNe3mS0aw” column_width=”4″]

ऑस्ट्रियाचा फॅबियो विबमर याचं कौशल्य या व्हिडीओमध्ये अप्रतिम आहे. व्हिपमर (Whipmer), फ्लिपमर (Flipmer) ही त्याची टोपणनावे म्हणजे त्याच्या कौशल्याची ओळख. सायकलीवर व्हिप, फ्लिप प्रकारातल्या जम्पवरून त्याची ही टोपणनावे पडली आहेत. रस्त्यावरील, डोंगरदऱ्यांतील त्याचे व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय आहेत. रेड बुल कंपनीच्या एनर्जी ड्रिंकचा तो प्रायोजक आहे. 2016 मध्ये त्याने डाउनहिल माउंटेन बायकिंग चॅम्पियनशिप जिंकली आहे. यूट्यूबवरील व्हिडीओ सर्वाधिक लोकप्रिय आहेत. 2008 मध्ये सुरू केलेल्या त्याच्या यूट्यूब चॅनलवर 7.5 मिलियनपेक्षा अधिक सबस्क्राइबर आहे, तर त्याच्या व्हिडीओंना 12 बिलयनपेक्षा अधिक दर्शक लाभले आहेत.

3. सर्वांत मोठी रेड बुल रॅम्पेज 2022 स्पर्धा

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=EZVy-Wrncyg” column_width=”4″]

कॅनडाचा ब्रेट ऱ्हीडर (Brett Rheeder) याचा हा व्हिडीओ जरूर पाहायला हवा. श्वास रोखून धरायला लावणारे त्याचे रॅम्पेज रेसमधील कौशल्य अप्रतिम. 2022 मध्ये ही रेड बुल रॅम्पेज रेस झाली. त्यात ब्रेटचे हे स्टंट कमालच म्हणावे. या स्पर्धा नेहमीच देखण्या ठरल्या आहेत. या रेसनेही दर्शकांना निराश केले नाही. नागमोडी खडतर रस्त्यांवरून सायकल वेगाने चालविणे सोपे मुळीच नाही.

2. माउंटेन ऑफ हेल 2023- विजेती धाव

किलियन ब्रॉन (Kilian Bron)… फ्रेंच माउंटेन बाइकर किलियन ब्रॉन नशिबाला भुरळ घालतो असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. तो एक प्रोफेशनल एंडुरो/फ्री राइड माउंटन बाइकर आहे आणि तो त्याच्या स्वतःच्या टीमसाठी आणि काही भागीदारांसाठी मीडिया मॅनेजर म्हणूनही काम करतो. हा व्हिडीओ 2023 मधील हेल माउंटेन रेसचा आहे. ताशी 100 किलोमीटर वेगाने त्याने सायकल चालवली आहे. तब्बल 800 स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही कधी वेगावर स्वार होता हे कळत नाही.

1. निकोली रोगत्किन याची 1440 डिग्रीतली राइड

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=J3pYoolbMMo” column_width=”4″]

निकोली रोगत्किन (Nicholi Rogatkin)… निकोली हा अमेरिकेचा व्यावसायिक बाइकर. त्या जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचं रँकिंग आहे. 2016 मधील जागतिक विजेता ठरलेला निकोली याने 2017 मध्ये रेड बुल डिस्ट्रिक्ट राइड स्पर्धेत 1440 अंशात फिरत विक्रमी जम्प घेतली. आपल्याला 360 अंशापर्यंतच माहिती आहे. त्याने तर 1440 अंशात ही रेस पूर्ण केली. हा व्हिडीओ पाहताना त्याच्या कौशल्याची चुणूक थक्क करते.

रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका अर्थात राम म्हणजे काय?

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″]

Related Articles

2 Comments

  1. Professionally. We will build a turnkey wooden house . We will carry out the construction of any room, from any tree according to the wishes of the customer. We will carry out all the necessary drawings, select high-quality materials, perform interior decoration, carry out all the necessary installation work, and also make an estimate on the result of the work so that the customer knows exactly what his funds went to.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!