निर्बंध झुगारून इंग्लंड जाणार श्रीलंकेच्या दौऱ्यावर
लंडन, 24 डिसेंबर |
श्रीलंकेचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत असून, करोना महामारीमुळे प्रवास यात्रा करण्यास तेथे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असले तरी इंग्लंडचा England team श्रीलंका दौरा Sri Lanka tour | नियोजित कार्यक्रमानुसारच होईल, असा विश्वास इंग्लंडच्या क्रिकेट अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून जे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी क्वारंटाइनवर जावे. कारण तेथे विषाणूचे नवीन स्ट्रेन सापडले आहेत, असे आदेश ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक (Matt Hancock) यांनी बुधवारी दिले.
मात्र, यावर मार्ग काढताना इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (England and Wales Cricket Board) असे आश्वासन मिळाले आहे, की दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावरून दहा डिसेंबर रोजीच खेळाडूंनी मायदेशी परत यावे. तसे झाले तर त्यांचे खेळाडू व कर्मचार्यांना आदेशातून सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात कोणालाही क्वारंटाइन व्हावे लागणार नाही.
ब्रिटिश सरकारने घेतलेल्या ताज्या निर्णयामुळे पुढील महिन्यात इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्यात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. कारण श्रीलंका संघ सध्या दक्षिण आफ्रिकेतच आहे.
तथापि, ईसीबीने म्हंटले आहे, की “आम्ही श्रीलंका कसोटी दौर्याची तयारी करीत आहोत. आम्ही येथून दोन जानेवारी रोजी श्रीलंकेला रवाना होणार आहोत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, श्रीलंकेच्या बोर्डाशी सातत्याने संपर्कात आहोत.”
श्रीलंकेच्या सरकारने ब्रिटनला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत; परंतु इंग्लंडचा संघ विशेष विमानाने श्रीलंकेत दाखल होईल.