All Sportschesssports news

बुद्धिबळ शिकण्याचं वय किती असावं?

बुद्धिबळ शिकण्याचं वय किती असावं?

बुद्धिबळ शिकण्याचं वय नेमकं किती असावं, हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असू शकतं. दिग्गज खेळाडू कोणत्या वयात बुद्धिबळ शिकले यावरून बुद्धिबळ शिकण्याचं वय निश्चित करणं धाडसाचं ठरेल.

बुद्धिबळ शिकण्याचं वय किती असावं, हा प्रश्न अनेक पालक विचारतात. काही पालक तर मूल दोन-तीन वर्षाचं होत नाही, तोच त्याला बुद्धिबळाचे धडे देण्याचा आग्रह धरतात. त्यांना वाटतं, जेवढं लवकर मूल बुद्धिबळ शिकेल तेवढ्या लवकर तो ग्रँडमास्टर होईल. जीनिअस होईल. तो आनंद होईल, कार्लसन होईल. हे काही खरं नाही. शिकण्याचंही वय असतं. मुळात कोणताही खेळ मुलांवर अजिबात लादू नये. त्याला त्या खेळाची गोडी लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न जरूर करा, पण गोडीगुलाबीनेही तो किंवा ती जर त्या खेळात रमत नसेल तर अजिबात त्या खेळाचा आग्रह धरू नये. जगातील दिग्गज खेळाडू वयाच्या 15 व्या, 19 व्या वर्षी बुद्धिबळ शिकले आहेत. असं असलं तरी शिकण्याचं आदर्श वय कोणतं हे समजून घेणं जास्त योग्य राहील.

आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे, 18 वर्षांखालील कोणतीही व्यक्ती बालक मानली गेली आहे. युनायटेड नेशन्स कन्व्हेक्शन ऑन दि राइट्स ऑफ दि चाइल्ड (यूएनसीआरसी) तसेच बऱ्याच देशांनीही ही व्याख्या मान्य केली आहे. मात्र, शिकण्याचं वय हे पाच वर्षांपुढील असते. शिक्षणही वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरू होते. आता अलीकडे वयाच्या दुसऱ्या वर्षातच मुलाला शाळेत पाठवतात. मात्र, ते कितपत योग्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. मात्र बुद्धिबळ शिकायचं असेल तर मुलाची आवड, समज या गोष्टीही विचारात घ्याव्या लागतील. विश्वनाथन आनंद, गॅरी कास्पारोव, अनातोली कारपोवपासून अलीकडचा मॅग्नस कार्लसन या जगज्जेत्या खेळाडूंची यादी पाहिली तर हे खेळाडू ठरवून बुद्धिबळपटू अजिबात झालेले नाहीत. आजूबाजूचं वातावरण, म्हणजे खेळासाठी असलेल्या पूरक गोष्टी यातून मुलाच्या मनात निर्माण झालेलं कुतूहल ही सगळी कारणं या खेळाडूंच्या बुद्धिबळ विकासाला कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे बुद्धिबळ शिकण्याचं वय नेमकं किती असावं, हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असू शकतं. दिग्गज खेळाडू कोणत्या वयात बुद्धिबळ शिकले यावरून बुद्धिबळ शिकण्याचं वय निश्चित करणं धाडसाचं ठरेल.

कोणत्या वयात शिकले हे दिग्गज खेळाडू

अलेक्झांडर अलेखाइन (Alexander Alekhine)  वयाच्या 7 व्या वर्षी
विश्वनाथन आनंद (Vishy Anand ) वयाच्या 6 व्या वर्षी
अॅडॉल्फ अँडरसन (Adolf Anderssen) वयाच्या 9 व्या वर्षी
ब्लॅकबर्न (Blackburne) वयाच्या 19 व्या वर्षी
हम्फ्रे बोगार्ट (Humphrey Bogart)  वयाच्या 13 व्या वर्षी
इसाक बोलेस्लावस्की (Isaac Boleslavsky)  वयाच्या 9 व्या वर्षी
मिखाइल बोटविनिक (Mikhail Botvinnik ) वयाच्या 12 व्या वर्षी
डी ला बोर्डोनाइस (de la Bourdonnais)  वयाच्या 19 व्या वर्षी
वाल्टर ब्रोन (Walter Browne)  वयाच्या 8 व्या वर्षी
कॅपाब्लांका (Capablanca)  वयाच्या 4 थ्या वर्षी
रे चार्लस (Ray Charles)  वयाच्या 35 व्या वर्षी
अर्विंग चेर्नेव (Irving Chernev)  वयाच्या 12 व्या वर्षी
मिखाइल चिगोरिन (Mikhail Chigorin)  वयाच्या 16 व्या वर्षी
अरनॉल्ड डेंकर (Arnold Denker) वयाच्या 12 व्या वर्षी
जान डोन्नर (Jan Donner)  वयाच्या 14 व्या वर्षी
मॅक्स इयुव (Max Euwe)  वयाच्या 9 व्या वर्षी
लॅरी इवान्स (Larry Evans)  वयाच्या 12 व्या वर्षी
रुबेन फाइन (Reuben Fine)  वयाच्या 8 व्या वर्षी
बॉबी फिशर (Bobby Fischer)  वयाच्या 8 व्या वर्षी
नोना गाप्रिंडाश्विली (Nona Gaprindashvili)  वयाच्या 5 व्या वर्षी
स्वेटोझार ग्लिगोरिक (Svetozar Gligoric)  वयाच्या 12 व्या वर्षी
रॉबर्ट हुबनर (Robert Heubner)  वयाच्या 5 व्या वर्षी
इगोर इवानोव (Igor Ivanov)  वयाच्या 5 व्या वर्षी
जॉन जारेकी (John Jarecki)  वयाच्या 6 व्या वर्षी
मोना कार्फ (Mona Karff )  वयाच्या 9 व्या वर्षी
अनातोली कारपोव (Anatoly Karpov)  वयाच्या 4 थ्या वर्षी
गॅरी कास्पारोव (Garry Kasparov)  वयाच्या 5 व्या वर्षी
पॉल केरेस (Paul Keres)  वयाच्या 4 थ्या वर्षी
जॉर्ज कोल्तानोस्की (George Koltanoski)  वयाच्या 14 व्या वर्षी
बेंट लार्सन (Bent Larsen) वयाच्या 6 व्या वर्षी
एडवर्ड लास्कर (Edward Lasker) वयाच्या 6 व्या वर्षी
इमॅन्युएल लास्कर (Emanuel Lasker) वयाच्या 11 व्या वर्षी
बिल लोम्बार्डी (Bill Lombardy) वयाच्या 9 व्या वर्षी
फ्रँक मार्शल (Frank Marshall) वयाच्या 10 व्या वर्षी
मीकिंग (Mecking) वयाच्या 6 व्या वर्षी
वेरा मेंचिक (Vera Menchik)  वयाच्या 9 व्या वर्षी
पॉल मॉर्फी (Paul Morphy) वयाच्या 8 व्या वर्षी
हिकारू नाकामुरा (Hikaru Nakamura)  वयाच्या 7 व्या वर्षी
एरॉन निम्झोविच (Aaron Nimzovich)  वयाच्या 8 व्या वर्षी
व्हिक्टर पाल्सिअसकास (Victor Palciuskas)  वयाच्या 5 व्या वर्षी
लुइस पॉलसन (Louis Paulsen)  वयाच्या 5 व्या वर्षी
टायग्रन पेट्रोसियन (Tigran Petrosian) वयाच्या 8 व्या वर्षी
फिलिडोर (Philidor) वयाच्या 10 व्या वर्षी
पिल्सबरी (Pillsbury) वयाच्या 15 व्या वर्षी
सुसान पोल्गार (Susan Polgar) वयाच्या 4 थ्या वर्षी
स्टुअर्ट राचेल्स (Stuart Rachels) वयाच्या 8 व्या वर्षी
सॅम्युएल रेशेवस्की (Samuel Reshevesky) वयाच्या 4 थ्या वर्षी
रोसोलिमो (Rossolimo) वयाच्या 7 व्या वर्षी
डायने सावेरिड (Diane Savereide) वयाच्या 17 व्या वर्षी
गॅब्रिएल श्वार्टझमन (Gabriel Schwartzman) वयाच्या 2 ऱ्या वर्षी
यासेर सिरावन (Yasser Seirawan) वयाच्या 12 व्या वर्षी
व्हॅसिली स्मायस्लोव (Vasily Smyslov) वयाच्या 6 व्या वर्षी
अँड्र्यू सोल्टिस (Andrew Soltis) वयाच्या 9 व्या वर्षी
बोरिस स्पास्की (Boris Spassky) वयाच्या 5 व्या वर्षी
विल्हेल्म स्टिनिट्झ (Wilhelm Steinitz) वयाच्या 12 व्या वर्षी
सुलतान खान (Sultan Khan)  वयाच्या 21 व्या वर्षी
मिखाइल ताल (Mikhail Tal)  वयाच्या 8 व्या वर्षी
ताराश (Tarrasch) वयाच्या 15 व्या वर्षी
जॉर्ज थॉमस (George Thomas) वयाच्या 13 व्या वर्षी
वेसेलिन टोपोलोव (Veselin Topalov) वयाच्या 9 व्या वर्षी
नॉर्मन व्हिटाकर (Norman Whitaker) वयाच्या 14 व्या वर्षी
मायकेल विल्डेर (Michael Wilder)  वयाच्या 6 व्या वर्षी
बुद्धिबळ शिकण्याचं वय
ADVT

अखेर आनंदची घरवापसी

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”75,82,83″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!