LiterateurSocial Connect

स. ग. पाचपोळ यांची कविता

हंबरून वासराले… या कवितेचा मूळ कवी स. ग. पाचपोळ आहेत हे अनेकांना माहितीच नाही. अनेक जण तर नारायण सुर्वेंचंच नाव घेत आहेत. ही चूक आधी कोणी तरी केली असेल, पण त्याला बळ दिलं अभिनेता जितेंद्र जोशी याने.

व्हॉट्सअ‍ॅप असो वा फेसबुक… सोशल मीडियावर काही पोस्ट फिरवताना सुरुवातीला एक वाक्य असतं.. ते म्हणजे- कोणी लिहिलंय माहिती नाही, पण जे लिहिलंय ते खूप सुंदर आहे…

सोशल मीडियावर अशा अनामिकांच्या अनेक लेख, कवितांचा मारा होत असतो… हे असं कशामुळे होतं? कोण या अनामिकांची नावं पुसून टाकत आहेत? अनेक जण इतरांच्या पोस्ट स्वतःच्या नावाने खपवतात… तसा अनुभवही अनेकांना आला आहे. आपल्याच पोस्ट आपल्याला दुसऱ्याच्या नावाने पाहायला मिळतात. काही महाभाग तर वपुर्झातील विचार पुलंच्या नावावर, तर पुलंचे विचार आणखी भलत्याच्याच नावाने फॉरवर्ड करतात… हे सातत्याने होत राहिलं तर इंद्राणीच्या नात्यागोत्यासारखं कोणी काय लिहिलंय याचा घोळ होत राहील.

आता हेच पाहा ना

हंबरून वासराले चाटती जवा गाय

तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
ही कविता अनेकांनी वाचली, ऐकली असेल. पण या कवितेचा मूळ कवी स. ग. पाचपोळ आहेत हे अनेकांना माहितीच नाही. अनेक जण तर नारायण सुर्वेंचंच नाव घेत आहेत. ही चूक आधी कोणी तरी केली असेल, पण त्याला बळ दिलं अभिनेता जितेंद्र जोशी याने. मुंबईतील एका पोलिस कार्यक्रमात त्याने नारायण सुर्वे यांचं नाव घेतलं आणि ती व्हिडीओ क्लीप व्हॉट्सअ‍ॅपवर इतक्या वेगाने पसरली, की मूळ लेखक दृष्टीआड गेला.
वेबसाइट, ब्लॉगसह सोशल मीडियावरील टिचक्या मारणाऱ्यांनीही नारायण सुर्वे यांचंच नाव माझी माय कवितेला दिलंय. स. ग. पाचपोळ कोणाला माहीतच नाहीत. हे किती दुर्दैव!!! स. ग. पाचपोळ टाकळी पारसकार (जि. बुलडाणा, ता. जळगाव जामोद) येथील मूळचे. आज त्यांची कविता इतकी लोकप्रिय असताना पाचपोळ दुर्लक्षितच राहिले. आंधळेपणाने फॉरवर्ड केलेल्या पोस्टमुळे मूळ लेखकाला किती यातना होत असतील.. आता ते हयात नाहीत, मात्र या कवितेचा मूळ कवी स्मृतीच्या पटलाआड जाऊ नये, एवढाच प्रामाणिक हेतू.

स. ग. पाचपोळ यांची ही संपूर्ण कविता

हंबरून वासराले

हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामधी दिसते माही माय

आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय

बाप माह्या मायच्यामांगं रोज लावी टुमनं
बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुम्नं
शिकूनशान आता कोणता मास्तर होणार हायं?
तवा मले मास्तरमधी दिसते माही माय

काट्याकुट्या येचायाले जाये माय रानी
पायात नसे वाह्यना तिच्या फ़िरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचे मानत नसे पायं
तवा मले काट्यामधी दिसते माही माय

माय म्हणूनी आनंदानं भरावी तुझी ओटी
पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावे तुझे पाय
तवा मले पायामधी दिसते माही माय

– (कै.) प्रा. स. ग. पाचपोळ

या कवीने अर्जुनाला का म्हंटले अहंकारी धनुर्धारी?

Follow on Twitter @kheliyad
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”111″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!