• Latest
  • Trending

नाशिककरांचे ‘पाणी’दार यश

November 18, 2020
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Friday, March 24, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

नाशिककरांचे ‘पाणी’दार यश

हिमाचल प्रदेश व पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठाने रोइंग आणि कयाकिंग या दोन्ही क्रीडाप्रकारांत सुवर्ण पदक मिळवले.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
November 18, 2020
in Sports Review
0
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

 

नाशिककरांचे ‘पाणी’दार यश

हिमाचल प्रदेश व पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठाने रोइंग आणि कयाकिंग या दोन्ही क्रीडाप्रकारांत सुवर्ण पदक मिळवले. नाशिकच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. कारण या ‘पाणी’दार यशाचे शिलेदार नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत.

पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या संघात वर्णी लागणे हीच नाशिकच्या दृष्टीने गौरवास्पद कामगिरी मानली जात होती. खो-खो, कबड्डी, कुस्ती हे नाशिकचे हुकमी खेळ मानले जात असले तरी यात पश्चिम महाराष्ट्राचेच वर्चस्व राहिले आहे.
मात्र, आता ही परिस्थिती बदलत आहे. काही खेळांमध्ये नाशिकने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यात वॉटर स्पोर्टचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. रोइंग आणि कयाकिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवणारे नाशिकचे खेळाडू पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करीत होते. अमृतसरमधील गुरू नानक विद्यापीठाच्या यजमानपदाखाली २३ ते २६ मार्च रोजी झालेल्या रोइंग स्पर्धेत ‘कॉक्सलेस ४’ प्रकारात पुणे विद्यापीठाने सुवर्ण पदक जिंकले. पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणारी ही टीम नाशिकच्या पंचवटी कॉलेजची होती. यात संतोष कडाळे, प्रसाद जाधव, राजेंद्र सोनार, अनिकेत हळदे यांचा समावेश आहे. रोइंगमध्येच सिंगल स्कलमध्ये संतोष कडाळे याने रौप्य पदक जिंकले. विशेष म्हणजे, पुणे विद्यापीठाचा मुले व मुलींचा संघ द्वितीय स्थानावर राहिला असला, तरी एकत्रित गुणांच्या जोरावर सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पुणे विद्यापीठालाच मिळाला.
नाशिकमधील बोट क्लबमागे चिकाटी, संघर्ष आहे. गोदेच्या काठावर वसलेल्या केटीएचएम कॉलेजमध्ये (कै.) डॉ. वसंतराव पवार यांच्या दूरदृष्टीमुळे वॉटर स्पोर्ट बहरला. खरं तर नाशिकच्या वॉटर स्पोर्टची मुहूर्तमेढच डॉ. पवार यांनी रोवली. या बोट क्लबची कमान जितेंद्र कर्डिले यांनी सांभाळली. त्यानंतर घारपुरे घाटावर बोट क्लब सुरू झाला. नाशिकमधील काही तरुण पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी सुरू केलेला नाशकातला हा दुसरा बोट क्लब. या धडपडणाऱ्या तरुणाईतले एक नाव म्हणजे माजी उपमहापौर अजय बोरस्ते. त्यांच्या प्रयत्नामुळेही नाशिकमधल्या वॉटर स्पोर्टला चालना मिळाली. मात्र, सातत्य राहिले नाही, हेही तितकेच खरे. सावरकरनगरातील वॉटर्सएज क्लबचा बोट क्लब म्हणजे गोदेचा पाईकच. ज्या वेळी १९ सप्टेंबर २००८ रोजी पुराचा फटका बसला, त्या वेळी क्लबच्या सर्व बोटी वाहून गेल्या. एकही बोट शिल्लक राहिली नाही. रोइंग संघटनेचे सचिव अंबादास तांबे गाळात रुतलेल्या बोटी पाहिल्यानंतर खिन्न झाले. मात्र, माजी उपमहापौर प्रकाश मते, तसेच विक्रांत मते यांच्या आधाराने या बोट क्लबने पुन्हा उभारी घेतली. गोदेला जेव्हा जेव्हा पूर येतो त्या वेळी जीवरक्षक म्हणूनही हा बोट क्लब मदतीसाठी सदैव सज्ज असतो. त्यानंतर चौथा बोट क्लब पिंपळगाव बसवंत येथील के. के. वाघ कॉलेजने चिंचखेड येथे सुरू केला. मविप्र संस्थेचे क्रीडाधिकारी हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या या बोट क्लबला माजी आमदार दिलीप बनकर यांची मदत मोलाची ठरली. कादवेच्या बॅकवॉटरवर सुरू झालेल्या या बोट क्लबला कष्टकऱ्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदके मिळवून दिली.

रोइंगमध्ये नाशिकचा दबदबा

नाशिकमध्ये रोइंगची सुरुवात १९९५-९६ पासून झाली. तत्पूर्वी केटीएचएम कॉलेजचा एकमेव बोट क्लब होता. रोइंगमध्ये १९९५मध्ये केटीएचएमच्या १४ खेळाडूंनी पुणे विद्यापीठाच्या संघात प्रथमच स्थान मिळविले. त्या वेळी ही कामगिरी नाशिकच्या इतिहासातली सर्वोच्च मानली जात होती. यात ८ मुले आणि ६ मुलींचा समावेश होता. रोइंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळणारा पहिला खेळाडू अंबादास तांबे होता. मात्र, रोइंगमध्ये खऱ्या अर्थाने पदकांचा सिलसिला सुरू झाला, तो २००७पासूनच. राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकने दरवर्षी पदक घेतले असून, सध्या १००पेक्षा अधिक राष्ट्रीय खेळाडू नाशिकमध्ये आहेत, अशी माहिती जिल्हा रोइंग संघटनेचे सचिव तांबे यांनी दिली. गेल्या वर्षी नाशिकच्या वैशाली तांबे हिने शिवछत्रपती पुरस्कार स्वीकारला. रोइंगमधील नाशिकची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. याच वर्षी मार्चमध्ये नाशिकने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकने १३ सुवर्ण, ९ रौप्य, तर सात ब्राँझ पदके मिळवली होती. दरवर्षी विविध वयोगटांतील १० ते १५ मुले राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत असून, महाराष्ट्राच्या रोइंगमध्ये नाशिकचा दबदबा वाढत आहे.

आशियाई स्पर्धेचे लक्ष्य

कनोइंग कयाकिंगमध्येही नाशिकचे वर्चस्व वादातीत आहे. पुणे विद्यापीठाची कनोइंग-कयाकिंगची पहिली महाविद्यालयीन स्पर्धा २०११मध्ये कोकणगावच्या कादवा नदीत झाली. विशेष म्हणजे जेथे महाविद्यालयीन स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली त्याच कादवा नदीच्या बॅक वॉटरवर सराव करणाऱ्या पिंपळगाव कॉलेजने पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करताना अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत दोन ब्राँझ पदक मिळवले. यात सी १ प्रकारात सागर गाढवे, तर सी ४ प्रकारात सागर गाढवेसह गोकुळ निकम, सागर नागरे, किरण उघडे यांचा समावेश होता. केटीएचएम कॉलेजच्या लखन रहाडे याने नाशिकच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी करताना पुणे विद्यापीठाला कयाकिंगमध्ये एक सुवर्ण पदकासह दोन ब्राँझ पदके मिळवून दिली. ही सुवर्णकामगिरी हिमाचल प्रदेशात नोंदवली आणि नाशिकच्या गोदाकाठाला आनंदाचे भरते आले. कारण रोइंग आणि कयाकिंगमध्ये दुहेरी सुवर्ण पदकाची कामगिरी नाशिककरांनी प्रथमच नोंदवली होती. जिल्हा कनोइंग कयाकिंग संघटनेचे सचिव जितेंद्र कर्डिले व मराठा विद्याप्रसारक संस्थेचे क्रीडाप्रमुख व प्रशिक्षक हेमंत पाटील यांनी आशियाई स्पर्धेत खेळाडूंकडून पदक मिळविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्या दृष्टीने सुरू असलेली तयारी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रात वर्चस्व वाढणार

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी वॉटर स्पोर्ट्‍सला खऱ्या अर्थाने चालना दिली आहे. केटीएचएम कॉलेजचा बोट क्लब जिल्ह्यातील सर्वांत पहिला. त्यानंतर घारपुरे घाटावर बोट क्लब सुरू झाला. नाशिक शहरात दोन बोट क्लब असूनही शहरातली मुले या खेळाकडे फारसे वळत नसल्याची खंत प्रशिक्षक जितेंद्र कर्डिले यांनी व्यक्त केली. सध्या ९० टक्के मुले ग्रामीण भागातीलच आहेत. त्यामुळेच आम्ही विल्होळीत, तसेच सायखेडा कॉलेजचा बोट क्लब सुरू करणार आहोत. सध्या जिल्ह्यात चार बोट क्लब असून, लवकरच ही संख्या सहापर्यंत जाणार आहे. मद्रास स्पोर्ट क्लब तमिळनाडूचे प्रतिनिधीत्व करतो, तर कृष्णा हा एकमेव बोट क्लब कर्नाटकचे प्रतिनिधीत्व करताना दिसतो. त्या तुलनेने नाशिकमध्ये चारही बोट क्लबच्या खेळाडूंमध्ये प्रचंड चुरस आहे, जी महाराष्ट्राचे सातत्याने प्रतिनिधीत्व करीत राहील, अशी आशा आहे. गंगापूर धरणावर ४५ कोटींचे बजेट असलेल्या बोट क्लबचे मोठ्या थाटात उद्‍घाटन झाले. सलमान खान, सुनील शेट्टीसारख्या कलाकारांना त्या वेळी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बोट क्लबचे काम अनेक महिन्यांपासून थांबलेले आहे. हा बोट क्लब सुरू झाल्यास भारतातले आगळेवेगळे नौकानयन नाशिककरांना पाहायला मिळेल.

कनोइंग कयाकिंगचा इतिहास

कनो आणि कयाक हे दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागले आहेत. कयाक म्हणजे एस्किमोमध्ये मानवी बोट म्हटले जाते. हा खेळ मूळचा सैबेरिया आणि ग्रीनलँडमधून उदयास आला. एस्किमो लोक शिकार आणि मासेमारीसाठी त्याचा उपयोग करीत. कनो बोटीचा उपयोग वाहतूक आणि युद्धासाठी केला जात. क्रीडा प्रकारात कनोइंग कयाकिंगचा समावेश १९व्या शतकात करण्यात आला. १८६६मध्ये क्रीडा विकासाच्या दृष्टीने लंडनमध्ये रॉल कनो क्लब, तर १८७१ मध्ये न्यूयॉर्क कनो क्लबची स्थापना झाली. १९२४ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कनोइंग खेळाची प्रात्यक्षिके झाली. त्यानंतर १९३६मध्ये बर्लिनमध्ये या खेळाला ऑलिम्पिकची मान्यता मिळाली. पुणे विद्यापीठाची पहिली महाविद्यालयीन कनोइंग कयाकिंग स्पर्धा २०११मध्ये कोकणगावातील कादवा नदीवर झाली. त्याचे यजमानपद होते पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजकडे.

रोइंगचा इतिहास

इंग्लंडमध्ये १७व्या शतकात रोइंगचा उदय झाला. रोइंगचा प्रसार प्रामुख्याने फ्रान्स, रशिया, जर्मनी, अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर झाला. लंडनमध्ये जमिनीवरील वाहतुकीपेक्षा थेम्स नदीत नावेद्वारे जलवाहतूक अधिक सोयीची समजली जात होती. इंग्लंडमधील इटन कॉलेजमध्ये १७१५मध्ये रोइंगची पहिली व्यावसायिक स्पर्धा झाली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा पहिला अंतिम सामना १८२९मध्ये ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठादरम्यान झाला. हा सामना पाहण्यासाठी २० हजार प्रेक्षक होते. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोइंग असोसिएशन (फिसा)ची स्थापना १८९२मध्ये झाली. नाशिकमधील रोइंगच्या १४ खेळाडूंनी १९९५मध्ये पुणे विद्यापीठाच्या संघात प्रथमच स्थान मिळवले होते.
सायखेड्यात गोदावरीत, तर विल्होळीमध्ये वालदेवी धरणावर बोट क्लब सुरू करणार आहे. कारण ग्रामीण भागातील मुले या खेळात चांगली प्रगती करीत आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही खेळाडूंची तयारी करून घेत आहे. अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर मिळविलेल्या यशाने आमचा आत्मविश्वास वाढला आहे.
– जितेंद्र कर्डिले, सचिव, जिल्हा कनोइंग कयाकिंग संघटना
नाशिकच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या पुणे विद्यापीठाच्या संघाला रोइंगमध्ये प्रथमच सुवर्ण पदक मिळाले आहे. १९९५पासून रोइंगला सुरुवात झाल्यापासून सुवर्ण पदक नव्हते. हे मोठे यश असून, आमच्याच मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी चांगला सराव केला होता. लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरीही करून दाखवू.
– अंबादास तांबे, राष्ट्रीय पंच, सचिव, जिल्हा रोइंग असोसिएशन
आशियाई स्पर्धेचे लक्ष्य बाळगूनच पिंपळगाव बसवंतच्या खेळाडूंचा सराव घेतला जात आहे. पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करताना खेळाडूंनी मिळविलेले यश ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी आणि गौरवास्पद आहे. नाशिक जिल्ह्याची वॉटर स्पोर्टवरील पकड आता घट्ट होत असल्याची ही आशादायी बाब आहे.
– हेमंत पाटील, प्रशिक्षक, क्रीडाधिकारी, मविप्र, नाशिक
(Maharashtra Times, Nashik, Jalgaon : 27 April 2015)  ]

Read more at :

रजनी नागेश लिमये
All Sports

समर्पिता- रजनी नागेश लिमये

by Mahesh Pathade
March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump
All Sports

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

by Mahesh Pathade
March 3, 2023
All Sports

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

by Mahesh Pathade
February 24, 2023
Virat Kohli 25 हजार
All Sports

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

by Mahesh Pathade
February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक
All Sports

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

by Mahesh Pathade
March 3, 2023
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

खो-खोसमोर ‘मॉडर्न’ होण्याचे आव्हान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!