जगातील सर्वात मोठे जंगल कोणते, असा प्रश्न विचारला तर ते अमेझॉन वर्षावन (Amazon rainforest) आहे. यालाच इंग्रजीत अमेझॉनिया (Amazonia) किंवा अमेझॉन जंगल (Amazon Jungle) असं म्हणतात. अमेझॉन हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे. या जंगलात काही आदिवासी जमाती राहत असून, त्यांचा मानवाशी अद्याप संपर्क आलेला नाही. या जंगलात अनेक दुर्मिळ कीटक, वनस्पती, वृक्ष आहेत, ज्याची माहिती घेण्यासाठी या जंगलात जाणे अशक्य आहे.
जंगलातील जैवविविधता |
16 हजार प्रजातींचे तब्बल 39 हजार कोटी वृक्ष आहेत. |
25 लाख कीटकांच्या प्रजाती |
2,000 पेक्षा अधिक पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. जगातील एकूण पक्ष्यांच्या प्रजातीतील बहुतांश पक्षी या जंगलात आढळतात. |
2,200 प्रकारचे मासे अमॅझॉन नदीत आढळतात. |
40 हजार रोपांच्या प्रजाती |
1,294 पक्ष्यांच्या प्रजाती |
427 प्रकारचे सस्तन प्राणी |
428 उभयचर प्राण्यांच्या प्रजाती |
378 प्रकारचे सरपटणारे प्राणी |
काँगो वर्षावन : पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल
पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल… हे जंगल रहस्यमयी आहे. या जंगलात गेलं बाहेर येता येत नाही. हे जंगल काँगो देशात आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे घनदाट जंगल काँगो वर्षावन म्हणून ओळखलं जातं. या जंगलात नेहमी पाऊस पडतो. त्यामुळे या जंगलाला काँगो वर्षावन (congo rainforest) असं म्हणतात. जगातील सर्वात मोठे जंगल अमेझॉन असले तरी काँगो जंगलही तितकेच रहस्यमय आणि भीतिदायक आहे. कारण या जंगलात हिंस्र प्राणी आणि विषारी कीटक जागोजागी आढळतात.
हे जंगल प्रचंड रहस्यमयी आहे. अतिशय भीतिदायक जंगल म्हणूनही याची ख्याती आहे. जो या जंगलात गेला, त्याचे परतणे जवळजवळ अशक्य असल्याचे म्हंटले जाते. काँगो वर्षावन मध्य आफ्रिकेत आहे. या जंगलाचं क्षेत्रफळ सुमारे 23 लाख 45 हजार वर्ग किलोमीटरपेक्षा अधिक आहे. म्हणजे इंग्लंडसारखे नऊ देश या जंगलात सामावले जातील इतके मोठे हे जंगल आहे. या जंगलात प्रचंड पाऊस होतो. सरासरी 58 इंच पाऊस या जंगलात दरवर्षी होतो. काँगो वर्षावनाचा सर्वाधिक क्षेत्र काँगो देशातच येते. उर्वरित भाग सहा देशांमध्ये विभागला आहे. काँगोला डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो असंही म्हणतात. अगदीच संक्षिप्त नाव घ्यायचे झाले तर डीआरसी असंही म्हणतात.
या जंगलातील बऱ्याचशा भागात मानवाने पाय ठेवलेला नाही. या जंगलात राहणारे आदिवासीही अनेक भागात जाऊ शकलेले नाहीत. हे जंगल इतके घनदाट आहे, की सूर्याची किरणे जमिनीवर पोहोचत नाहीत. या जंगलात पाच नॅशनल पार्क आहेत. या जंगलातून वाहणाऱ्या नदीला काँगो नदी म्हंटले जाते, जी तब्बल 4700 किलोमीटर लांब आहे. केवळ काँगो देशातूनच नव्हे, तर अनेक देशांतून ती वाहते.
हे एकमेव असे जंगल आहे, जेथे तीन प्रकारचे गुरिल्ला राहतात. येथे बोनोबो प्रजातीतला चिपांझीही आहे. त्याला पिग्मी चिपांझी असंही म्हणतात. हा चिपांझी बराचसा मानवासारखा दिसतो. या जंगलात राहणाऱ्या आदिवासींना पिग्मी असं म्हणतात. त्यांची उंची सरासरी साडेचार फूट आहे. पुरुषांची उंची 4 फूट 10 इंच तर महिलांची उंची 4 फूट 1 इंच असते.
काँगो वर्षावनात दोन हजारपेक्षा अधिक जीव राहतात. त्यापैकी 450 असे जीव आहेत, जे स्तन्यपान करणारे आहेत. 300 पेक्षा अधिक जीव सरपटणारे आहेत. म्हणजे विषारी सापांच्या अनेक प्रजाती, तसेच किडे या जंगलात पाहायला मिळतात. 200 पेक्षा अधिक जीव असेही आहेत, जे पाण्यात आणि पाण्याबाहेर अशा दोन्ही ठिकाणी राहतात. विविध दुर्मिळ पक्ष्यांसह अनेक प्रजाती इथे पाहायला मिळतात. या जंगलात हजारो प्रजातींचे वृक्ष आहेत.
शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट
Follow on Facebook Page