• Latest
  • Trending
महिला कुस्ती

महिला कुस्ती क्षेत्रातल्या संघर्षकन्या

November 27, 2021
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Wednesday, March 22, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

महिला कुस्ती क्षेत्रातल्या संघर्षकन्या

समाजातून उमटणाऱ्या खोचक प्रतिक्रियाही तिच्या निश्चयापुढं थिट्या ठरल्या. महिला कुस्ती क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या वीरांगणांची ही गाथा...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
November 27, 2021
in All Sports, Inspirational Sport story, wrestling
1
महिला कुस्ती
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email
एकीकडे जगण्याची, तर दुसरीकडे अस्तित्वाची लढाई. जगण्याच्या लढाईला पराभव मान्य नसतो, तर अस्तित्वाच्या लढाईसमोर झुकायचं नसतं. त्या या दोन्ही लढाया त्वेषाने लढताहेत; पण कुस्तीच्या बाऊटमध्ये. या कुस्तीतल्या संघर्षकन्या जिद्दीने लढताहेत. महिला कुस्ती क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या वीरांगणांची ही गाथा…

‘‘बाई, कुस्ती काय पोरीचा खेळ हाय का? कान चपटं झालं तर कोण लग्न करील?’’ समाजातून उमटणाऱ्या या खोचक प्रतिक्रियाही तिच्या निश्चयापुढं थिट्या ठरल्या. कारण चेपटावलेले कान ही मल्लाची पहिली ओळख. पण तिने त्याची तमा बाळगली नाही. कारण तिच्या जगण्यात स्त्रीमुक्ती आहे, तिच्या लढण्यात स्त्रीशक्ती आहे. तिला लढायचंय स्त्रीला दुर्बल, दुर्लक्षित समजणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध; स्त्रीचं अस्तित्व नाकारणाऱ्या पुरुषी अहंकाराविरुद्ध. पुरुषी वर्चस्व असलेल्या कुस्तीत आपला ठसा उमटवणाऱ्या या लढावू वीरांगणा आहेत सांगली जिल्ह्यातली संजना बागडी, राजगुरूनगरातली अश्विनी बोऱ्हाडे, मुंबईची कौशल्या वाघ, कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील वडणगेची रेश्मा माने, मुरगूडच्या स्वाती शिंदे आणि नंदिनी साळोखे… महिला कुस्ती खेळातली ही प्रातिनिधिक नावं आहेत. अशा किती तरी कुस्तीतल्या संघर्षकन्या आज आखाड्यात आपलं अस्तित्व सिद्ध करीत आहेत.

लढाऊ संजना बागडी


विट्यातल्या सिद्धनाथ देवाची जत्रा म्हंटली, की पंचक्रोशीतली ग्रामस्थ या जत्रंला हजेरी लावतात. संजनाही वडील, आजोबांसोबत आली; पण जत्रेतली ती खेळणी, मिठाई तिला नको होती. ती आली होती कुस्ती खेळायला. कुस्त्यांच्या दंगलीत संजनाची जोड लावण्यासाठी तिला फिरवलं. सर्वांचं लक्ष संजनाकडे होतं. एका मुलाने तिचं आव्हान स्वीकारलं. तब्बल पाच मिनिटं ही कुस्ती चालली. आणि काय आश्चर्य! संजनाने त्याचा पट काढत चीतपट कुस्ती मारली. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. सांगली जिल्ह्यातील तुंग गावातली इयत्ता आठवीतल्या संजना बागडीची ही पहिलीच कुस्ती अशी दमदार झाली; पण संजनाच्या या कुस्तीमागे प्रचंड संघर्षाची एक किनार आहे. गेल्या तीन पिढ्या भाकरीच्या चंद्रासाठी भटकणारं बागडी कुटुंब आता कुठं तुंगमध्ये स्थिरावलं. मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. आजोबा नाथा बागडी, वडील खंडू बागडी यांची पैलवानकी याच गरिबीमुळे खुंटली; पण आपल्या नातवंडांनी हा वारसा पुढं चालवावा म्हणून संजनाला आखाड्यात उतरवलं. कुस्ती मॅटवर आलीय. मग ही मॅट आणायची कुठून? संजनाला तालमीला पाठवायलाही पैसे नाहीत. शेवटी आजोबांनी त्यावर उपाय शोधला. त्यांनी बाजारातून थर्माकोल विकत आणला. ते मॅटसारखे चौकोनी कापून त्यावर घरातल्या जुन्या साड्यांचे कव्हर शिवले आणि घरगुती मॅट तयार केली. आता मॅटवर संजनाशी लढणार कोण? शेवटी तिचे आजोबाच नातीशी लढायला तयार झाले आणि संजनाचा कुस्तीचा हा प्रवास असा सुरू झाला. पैन् पै जमवून संजनाचा खुराक सुरू केला. संजनाही आजोबा, वडलांचे स्वप्न साकारण्यासाठी लढतेय. तिची ही लढाई कुस्तीच्या बाऊटमधलीच नाही, तर जगण्याचीही आहे.

डॅशिंग अश्विनी!


तिला रात्र रात्र झोप येत नव्हती. प्रचंड अस्वस्थ होती. तिचं रडणंही थांबत नव्हतं. कारण एकच, तिच्या वजनगटात तिला दमवणाऱ्या मुलीच कुस्तीत नव्हत्या! कुस्तीवर प्रचंड निष्ठा असलेली ही मुलगी आहे राजगुरूनगरची अश्विनी बोऱ्हाडे. प्रचंड आत्मविश्वासू आणि डॅशिंग असं हे व्यक्तिमत्त्व. घरात पैलवानकीचा वारसा नसतानाही तिचं कुस्तीत येणं म्हणजे समाजाशी दोन हात करणेच. मामा नितीन पानसरे अश्विनीच्या पाठीशी राहिले आणि त्यांनीच तिला कुस्ती खेळण्याचा सल्ला दिला. पाच फूट आठ इंच उंची आणि वजन ७२ किलो, अशी मजबूत शरीरयष्टीची अश्विनी कुस्तीकडे दहावीनंतर वळली. कुस्तीचा ‘क’ माहीत नसताना तिने शालेय कुस्तीत थेट नाव दिलं. तोपर्यंत कुस्तीत उभं राहायचं कसं हेही तिला कळलेलं नव्हतं. तालुकास्तरीय स्पर्धेत तिच्या वजनगटात कोणीच नव्हतं. तिची जिल्हास्तरावर निवड झाली. आता जिल्ह्याला जायचं म्हणजे कुस्ती काही तरी शिकायला हवी. म्हणून तिने आळंदीतलं कुस्ती केंद्र जॉइन केलं. आता हा निर्णय धाडसीच होता. राज्यस्तरावर ती पहिली कुस्ती जिंकली, पण एका कसलेल्या महिला मल्लासोबत हरली. जिच्याकडून हरली तिला हरवायचंच म्हणून तिने पुन्हा तयारी सुरू केली. अखेर महिला अधिवेशनात सिंगल पट आणि कलाजंग डावावर तिला चीतपट करीत पराभवाचा वचपा काढलाच. अश्विनीची एक खंत आहे, तिला दमवणारी प्रतिस्पर्धी नव्हती. महिला प्रशिक्षकही फारशा नाहीत. म्हणूनच मी ठरवलंय. एनआयएस कोच व्हायचं आणि स्वतःचं महिला कुस्ती केंद्र सुरू करायचंय. मी एनआयएसच्या मुलाखतीत तिला प्रश्न विचारला होता, तुला कुस्ती कोच का बनायचंय? तेव्हा तिने उत्तर दिलं होतं, मला जॉबसाठी कोच नाही बनायचं. मला खेळाडू घडविण्यासाठी कोच बनायचंय. याच बाणेदार उत्तरावर अश्विनीची एनआयएस डिप्लोमासाठी निवड झालीय. महिला कुस्तीला समृद्ध करण्याचं अश्विनीचं स्वप्न आहे.

‘चार ऑपरेशननंतरही कुस्तीच्या आखाड्यात!’


कुस्ती खेळताना दुखापत होणार नाही, असं अजिबात नाही; पण म्हणून कुस्ती कधी थांबत नाही. लिगामेंट, शोल्डर अशा अनेक दुखापतींवर तिच्यावर चार वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, अजूनही ती कुस्तीच्या आखाड्यात पाय रोवून उभी आहे. तिला आता पाचवी शस्त्रक्रिया सांगितली आहे. मात्र, त्यावर ती शस्त्रक्रियेशिवाय उपचार घेत आहे. ही लढावू मल्ल आहे मुंबईची कौशल्या वाघ. कौशल्याला पैलवानकीचा समृद्ध वारसा आहे. एकदा वडिलांनी सहज विचारले, कुस्ती खेळते का? कौशल्याही हो म्हणाली. कौशल्याच्या कुस्तीला आकार मिळाला तो घरातूनच. पुढे पुढे तर गावच्या जत्रेतही कौशल्याने कुस्तीतलं कौशल्य सिद्ध केलं. ‘‘मी खेळायचे तेव्हा मुली फारशा कुस्ती खेळतच नव्हत्या. आता माझ्याकडे पाहून अनेक मुली कुस्तीत येऊ पाहत आहेत,’’ असं कौशल्या अभिमानाने सांगितलं. कौशल्याच्या कुस्तीतला यशाचा आलेख इतका समृद्ध आहे, की पुढच्या ५० वर्षांत तो कोणी मोडेल असं वाटत नाही. आशियाई स्पर्धेत सिल्व्हर, सबज्युनिअर, ज्युनिअर गटातील १५ राष्ट्रीय स्पर्धांत सात गोल्ड, वरिष्ठ गटात सिल्व्हर असा तिचा यशाचा चढता आलेख आहे. आता ती एम.एड. करतेय. एनआयएस कोच होऊन कुस्तीचं केंद्र सुरू करण्याची तिची इच्छा आहे.

धोकादायक कुस्तीगीर : नंदिनी साळोखे


केरळमधील २०१४ च्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतला ती पहिली फेरी कोणीही विसरणार नाही. समोर पंजाबची आंतरराष्ट्रीय मल्ल होती. तीन मिनिटांच्या कुस्तीत पहिल्याच दोन फेऱ्यांत तिने ८-० ची आघाडी घेतली. एवढा भलामोठा लीड एका मिनिटात कसा तोडायचा. शेवटचे ४० सेकंद उरले होते आणि अचानक गदालोट डावावर पंजाबची महिला चीतपट. नंदिनी साळोखेने या स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले. नंदिनीची ही कुस्ती पाहिल्यानंतर प्रचीती येते, की ही धोकादायक मल्ल आहे. प्रतिस्पर्ध्याला तिचा कधीच अंदाज येत नाही, की ही नेमकं काय करेल. इयत्ता तिसरीपासून कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या नंदिनीचं हेच वैशिष्ट्य आहे. ती म्हणतेही, की मी हे ठरवून काहीच करीत नाही; पण मी शेवटच्या क्षणीच कुस्ती जिंकते. नंदिनीची आई धुणीभांडी करते. कधी शेतातही कामं करावी लागतात. परिस्थिती बिकट असूनही नंदिनी कुस्त्यांचे आखाडे गाजवत आहे. नंदिनीच्या जगण्यातच संघर्ष आहे. या संघर्षाचं प्रतिबिंब तिला कुस्तीत दिसतं. प्रतिस्पर्ध्याने कितीही लीड घेतला तरी हुकमी विजय नंदिनीचाच असतो. 

आक्रमक मल्ल : स्वाती शिंदे


मुरगूडच्या तालमीतलं नंदिनीनंतरचं दुसरं नाव म्हणजे स्वाती शिंदे. सकाळ-सायंकाळ सत्रात रोज ४००-५०० डिप्स, १५-२० स्प्रिंट मारणे, १० किलोमीटर धावणे असा तिचा व्यायाम. स्वातीच्या कुस्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला बचाव अजिबात माहीत नाही. अतिशय आक्रमक कुस्ती खेळण्यात वाकबगार. दुहेरीपट काढण्यात तिची हुकूमत. कलाजंग, मोळी डाव, भारंदाजवर तिचं प्रभुत्व. काका पहिलवान होते. सुरुवातीला तालमीत फारशा मुली नव्हत्या म्हणून सख्ख्या भावासोबत सराव सुरू केला. चंद्रपूरच्या महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत स्वातीला थेट वरच्या वजनगटातच खेळवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी ५० किलोपेक्षा जास्त वजनाची अट होती. स्वातीने वजन वाढवलं. ५३-५४ किलो झाल्याने ती प्रथमच ७० किलो वजनगटापर्यंतच्या मुलींशी लढली. विशेष म्हणजे सगळ्यांना हरवत ती महापौर केसरी जिंकली. तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळलेल्या हरियाणाच्या सोनूला तिने १०-० अशा गुणांनी पराभूत करणारी स्वाती दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर महिला कुस्तीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावतेय. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी गोल्ड मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे. 

वडिलांचं स्वप्न साकारणारी रेश्मा माने


५०० जोर काढणे, रोज दहा किलोमीटर धावणे, स्प्रिंट मारणे हा व्यायाम आहे रेश्मा माने या महिला कुस्तीगिराचा. कोल्हापुरापासून पाच किलोमीटरवरील वडणगेच्या रेश्माच्या यशामागे तिचे वडील अनिल माने यांचा मोलाचा वाटा. कुस्तीत विजयी मल्लाचा जल्लोष आपल्या मुलांच्या वाट्याला यावा अशी त्यांची प्रचंड इच्छा होती. इच्छा असूनही पैलवानकीत कारकीर्द करता न आल्याने त्यांनी आपल्या मुलांना कुस्तीचे धडे दिले. मुलगी आणि मुलगा असा भेद त्यांना नव्हताच. रेश्माने इयत्ता तिसरीपासूनच कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली. सहावीला रेश्मा पहिली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा खेळली आणि ब्राँझ मेडल जिंकले. दहावीला आशियाई स्पर्धेत तिने गोल्ड मेडल जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत सेमिफायनलपर्यंत तिने मजल मारली. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झालेली ती पहिली महिला कुस्तीगीर. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणारी रेश्मा आता एफवायबीएचे शिक्षण घेत आहे. वडिलांचे स्वप्न सत्यात साकारणाऱ्या रेश्माला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचेय. कोल्हापुरातील गणपतराव आंदळकरांच्या न्यू मोतीबाग तालमीत ती सध्या सराव करीत आहे.

Read more at:

महिला कुस्तीगिरांचे शोषण
All Sports

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
All Sports

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव
All Sports

ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधवनंतर भारतीय कुस्तीची 56 वर्षे

July 10, 2021
sumit-malik-dope-test
All Sports

भारतीय कुस्तीला आणखी एक धक्का

June 4, 2021
Sushil Kumar arrested in case of wrestler's murder
All Sports

पहिलवानाच्या खून प्रकरणात सुशील कुमारला अटक

May 25, 2021
Anshu Malik wrestling
All Sports

वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी उतरली आखाड्यात!

May 25, 2021
Tags: कुस्तीतल्या संघर्षकन्या
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
क्रीडा हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

क्रीडा हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

Comments 1

  1. Pingback: ‘खेलरत्न’प्राप्त साक्षीचा अर्जुन पुरस्कारावर दावा! - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!