• Latest
  • Trending
Why China doesn’t play cricket?

Why China doesn’t play cricket?

August 3, 2020

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 5, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
Wednesday, February 8, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

Why China doesn’t play cricket?

चीन क्रिकेटपासून लांब का?

Mahesh Pathade by Mahesh Pathade
August 3, 2020
in Cricket
5
Why China doesn’t play cricket?

Why China doesn't play Cricket?

Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

चीन क्रिकेटपासून लांब का?


kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    

भारताचा क्रिकेटमध्ये प्रमुख शत्रू कोणी असेल तर तो पाकिस्तान. जेव्हा भारत-पाकिस्तान सामना होतो तेव्हा ते एक युद्ध सुरू असतं. बांगलादेशाविरुद्धचा सामनाही असाच असतो. शेजारी देशांमध्ये ही जी खुन्नस क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळते तेव्हा तो सामना कमालीचा रंगतदार होतो. Why China doesn’t play cricket?

मात्र, आपला अजून एक शेजारी देश आहे, ज्याच्याविरुद्ध क्रिकेटचा सामना पाहायला खूप मजा आली असती. तो म्हणजे चीन. पण चीनला क्रिकेट खेळताच येत नाही! थोडंफार येतं, पण ते आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसं अजिबात नाही.

Why China doesn’t play cricket? बॅडमिंटनमध्ये आपण त्यांना आता कुठे खुन्नस द्यायला लागलो. तशीही खेळात आपली चीनशी बरोबरी नाहीच. ऑलिम्पिकमध्ये या चीनने अमेरिका, रशियाला मागे सारले. पण काहीही असो, त्यांना क्रिकेट काही जमलं नाही.

ऑलिम्पिकमध्ये हुकूमत गाजवणारा हा बलाढ्य देश क्रिकेटमध्ये का आपली ताकद दाखवू शकला नाही? विविध खेळांमध्ये कौशल्य सिद्ध करणाऱ्या चीनला क्रिकेटमध्ये कौशल्य साधता आलंही असतं. पण त्याने ते त्यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केलेलं नाही. त्यामागे महत्त्वाची कारणे आहेत. काय आहेत ही कारणे जाणून घेऊया… Why China doesn’t play cricket?

  1. चीनने नेहमीच ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केलं आहे. एखाद्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा चिनी नागरिकांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यालाच महत्त्व दिलं आहे. जास्तीत जास्त मेडल जिंकण्याचेच चीनचे ध्येय असते. क्रिकेट हा ऑलिम्पिक खेळ नाही. त्यामुळे या खेळाकडे ते लक्ष देणार नाही. कारण त्यांना ऑलिम्पियनची प्रतिष्ठा टिकवायची आहे. त्यामुळे त्यांनी क्रिकेटला फारसं महत्त्व दिलेलं नाही.

  2. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, चीनवर ब्रिटिशांनी कधीही वसाहत निर्माण केली नाही. क्रिकेट ही ब्रिटिशांची देणगी आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी ज्या ज्या देशांवर वसाहत निर्माण केली तेथे क्रिकेटचीही छाप सोडली. ज्या देशांवर ब्रिटिशांची वसाहत होती, तेथे क्रिकेट आवडीने खेळला जातो. भारत, पाकिस्तानात म्हणूनच क्रिकेट लोकप्रिय आहे. चीनमध्ये मात्र ब्रिटिशांची वसाहत नसल्याने तेथे क्रिकेटचं महत्त्व नाही. चीनमध्ये इतर अनेक खेळ स्थानिक पातळीवर खेळले जातात, जे सोपे आणि सहज खेळता येतात. बास्केटबॉल, फुटबॉलबरोबरच ते स्थानिक खेळ अधिक आवडीने खेळतात. बॅडमिंटन, टेबल टेनिस चीनचे हुकमी खेळ आहेत. त्यामुळे चीनकडे अनेक खेळ आहेत, जे त्यांच्यासाठी क्रिकेटला पर्याय ठरत आहेत. जसा क्रिकेटप्रेमी इतर खेळाकडे वळत नाही, तसंच चीनही आपले स्वतःचे खेळ सोडून क्रिकेटकडे वळत नाही.

  3. भारतासह काही देशांमध्ये क्रिकेट कमालीचा लोकप्रिय आहे, यात शंकाच नाही. पण क्रिकेट हा जागतिक पातळीवर फारसा महत्त्वपूर्ण नाही. कारण जे जागतिक खेळ आहेत, त्यात क्रिकेटला स्थान नाही. व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर जगात क्रिकेटला दुय्यम खेळच मानले आहे. क्रिकेटप्रेमींसाठी एखादा क्रिकेटपटू देव मानतीलही, पण तो जागतिक हिरो मानला जाणार नाही. मग अशा खेळात का वेळ घालवायचा, जो फक्त आठ-दहा देशांपुरताच मर्यादित आहे, ही चिनी मानसिकताही यामागे आहे.

कोण म्हणतं, चीन क्रिकेट खेळत नाही!


why china doesn't play cricket
चीन क्रिकेटपासून लांब का?

मग चीनच्या पोलादी भिंतीपल्याड क्रिकेट खेळतच नाही का, असा प्रश्न साहजिकच मनात येतो; पण तसं अजिबात नाही. चीनमध्ये १८ व्या शतकापासून क्रिकेट खेळला जातो.

1858 ते 1948 या काळात शांघाय हा चीनमधील सर्वांत मोठा क्रिकेट क्लब अस्तित्वात होता. या क्लबने क्रिकेटचे अनेक दौरेही केले. असे असले तरी या क्लबच्या संघाला देशाचा अधिकृत संघ म्हणून मान्यता मिळू शकली नाही. चीनने अगदी अलीकडे म्हणजे 2004 मध्ये क्रिकेटमध्ये अधिकृत पाऊल ठेवलं आहे.

सप्टेंबर 2005 मध्ये चिनी क्रिकेट संघटनेने आठ प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली होती. त्यात पंच प्रशिक्षण शिबिरांचाही समावेश होता. चीनमध्ये सध्या नऊ शहरांमध्ये क्रिकेट खेळला जातो. आता एवढ्या अवाढव्य देशात फक्त नऊ शहरांमध्येच क्रिकेट खेळला जात असेल, तर या देशात क्रिकेटचा जीव कितीसा असेल, याचा अंदाज आलाच असेल.


हेही वाचा… करोना नसलेल्या देशातलं क्रिकेट


या नऊ शहरांमध्ये बीजिंग, शांघाय, शेनयांग, दालियान, ग्वांगझू, शेंझेन, चाँकिंग, टियानजिन आणि जिनान यांचा समावेश आहे. या शहरांतील दीडशे शाळा क्रिकेट खेळतात. बारीक मिचीमिची डोळ्यांनी क्रिकेट खेळणारे चिनी मुलं क्रिकेट खेळताना भारीच वाटत असेल ना?

Why China doesn’t play cricket? मुळात चिन्यांनी कधी क्रिकेटला आपलंसं केलंच नाही. त्यामुळे क्रिकेटने या देशात मूळ धरलंच नाही. मात्र, क्रिकेटच्या दिशेने पाऊल टाकलं हेही नसे थोडके!

आशियातील पूर्वेकडील देशांमध्ये क्रिकेटचं वातावरण होण्यासाठी आशिया क्रिकेट परिषदेने थायलंडमध्ये 2009 मध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत चीनने सहभाग घेतला होता. ही स्पर्धा होती एसीसी करंडक स्पर्धा. या नवख्या देशांच्या स्पर्धेतही चिन्यांचं क्रिकेट कौशल्य यथातथाच दिसून आलं. त्यांना गटातला एकही सामना जिंकता आला नाही.

अगदी इराण, मालदीवसारख्या संघांनीही चीनची यथेच्छ धुलाई केली. इराणने 307, तर मालदीवने 315 धावांनी पराभूत केले. इतका सपाटून मार खाल्ल्यानंतर मग चिनी संघ जागा झाला आणि त्यांनी म्यानमारला धो धो धुवत 118 धावांनी पराभूत केलं आणि सातव्या स्थानावर विराजमान झाला.

आठ संघांमध्ये सातवे स्थान अगदीच वाईट नाही, नाही का? या सात संघांमध्ये कोणते दिग्गज संघ होते माहीत आहे का? भूतान, म्यानमार, ब्रुनेई, ओमान, इराण, थायलंड, मालदीव हे ते दिग्गज संघ!अर्थात, सपाटून मार खाल्ल्यानंतर चीनसाठी हे सगळे दिग्गजच म्हणावे लागतील.

अर्थात, चिनी लाल सेना खचली नाही. यातून धडा घेत 2014 मध्ये एसीसी टी-20 करंडक स्पर्धेत पुन्हा उतरली. या वेळी ही स्पर्धा दुबईत होती. अफगाणिस्तान, भूतान, बहारिनसह एकूण बारा देशांचा यात समावेश होता. पहिलाच सामना अफगाणिस्तानशी. आता अफगाणिस्तान संघ कसा आहे, हे सांगण्याची गरज नाही. या संघासमोर चिन्यांची डाळ शिजली नाही.

अफगाणिस्तानच्या सलामीच्या जोडीनेच चीनचं आव्हान मोडीत काढलं. चिनी संघाने नेहमीप्रमाणे गटातले सगळे सामने गमावले. दुबईकरांनी तर चीनची पिसं काढताना, 20 षटकांत 236 धावा बुकलून काढल्या. प्रत्युत्तरात चिनी सेना मग त्वेषाने मैदानावर उतरली आणि अवघ्या 27 धावांत तंबूत परतली. या 27 धावांमध्ये 15 तर अवांतर होत्या. म्हणजे संपूर्ण संघाने फक्त एक डझन धावा काढल्या. चिनी संघाने या बारा देशांच्या संघात अर्थातच शेवटून पहिला नंबर मिळवला!

चिनी सेना सपाटून मार खात होती आणि त्यांची संघटना नवनवे लक्ष्य चिनी सेनेसमोर ठेवत होती. 2006 मध्ये चीनने काही लक्ष्य बाळगले होते. वर्षनिहाय हे लक्ष्य नेमके काय होते ते पाहा…  Why China doesn’t play cricket?

  • 2009 : या वर्षात देशभरात 720 संघ तयार करायचे आणि त्यांना अधिकाधिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करायचं. चिन्यांसाठी हे लक्ष्य सोपंच होतं. 720 नव्हे, दुपटीने 1440 संघही चीन तयार करू शकेल. प्रश्न फक्त  बॅट धरण्याचा होता. ते काही साध्य झालेलं दिसत नाही.

  •  2015 : वीस हजार खेळाडू आणि दोन हजार प्रशिक्षक तयार करणार. (हातात चिनी बनावटीची बॅट आणि डोक्यावर हेल्मेट घातले की झाला खेळाडू. असं नसतं हो… एवढे प्रशिक्षक तयार करण्यासाठी शाओलिन टेम्पलमधूनच कुंगफूचे मास्टर्स बोलवावे लागतील.)

  • 2019 : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पात्र होणे. (चिनी नागरिक एक वेळ दोन फूट स्वतःची उंची वाढवतील, पण हे आव्हान अतीच होतंय. पण घेतलं आव्हान. त्याचं काय झालं ते सर्वांनीच पाहिलंच आहे. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये ही चिनी सेना कुठेही दिसली नाही, अगदी प्रेक्षकांमध्येही नाही. लक्ष्य मोठे बाळगले पाहिजे, असं माओ-त्से-तुंग म्हणून गेला असेल. हरकत नाही, वर्ल्डकप खेळा, टी-20 खेळा, पण आधी भूतान, मालदीवला तर हरवा.)

  • 2020 : कसोटी सामने वाढविणे. (यापेक्षा चिनी सेनेने पिचवर दोन मिनिटे कसा टिकाव धरता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. संपूर्ण 11 जणांचा संघ मोजून 12 धावा काढतो, तो संघ कसोटी कसा खेळू शकेल?)

why china does not play cricket
Chinese Cricket Association, an affiliate member of the
International Cricket Council (ICC) in 2004.

चीनच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर टाकू…

(चीनने क्रिकेटमधील आपली कामगिरी देताना हुशारी केली आहे. म्हणजे स्पर्धेत आम्ही कितवा क्रमांक मिळवला एवढेच दिले आहे. पण किती संघांमध्ये हा क्रमांक मिळवला, हे हटकून लपवले. मात्र, आम्ही माहितीच्या खोलात जाऊन चीनची हुशारी उघड केली आणि क्रिकेटमध्ये चीन किती ढ आहे हे उघड केले. कंसातील विश्लेषण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.) 

एसीसी ट्रॉफी

2009 ः 7 व्या स्थानी

(स्पर्धेतील एकूण संघही 7)


2010 : 6 व्या स्थानी
(एकूण संघ 8. ब्रुनेई या एकमेव संघाला पराभूत करण्याची किमया)


2012: 6 व्या स्थानी
(एकूण संघ 8)


एसीसी टी-20 करंडक

2009 ः 12 व्या स्थानी
(एकूण संघही 12)


2011, 2013, 2015 : स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही


आशियाई गेम्स


2010 ः उपउपांत्य फेरीपर्यंत मजल
(बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्य फेरीपर्यंत मजल? ही कामगिरी खूपच मोठी म्हणावी लागेल! पण तसं काहीही नाही बरं. ही स्पर्धा चीनमध्येच होती. तीन संघांचा एक गट याप्रमाणे चार गट होते. चीनच्या गटात फक्त मलेशिया होता. तिसरा संघ नव्हता. गटात खेळणारा सामना उपउपांत्य फेरीच समजली जात होती. कारण गटविजेता थेट उपांत्य फेरीत दाखल होणार होता. म्हणून त्या अर्थाने चीन उपउपांत्य फेरीत दाखल झाल्याचं सांगितलं जातं. अगदी एखाद्या गल्लीतला संघ जरी स्पर्धेत उतरवला, तरी या स्पर्धेत सहभागी होताच तो उपउपांत्य फेरीत दाखल होईल.)

2014 : गटपातळीपर्यंत मजल
(म्हणजे फक्त ग्रुपमध्ये खेळणे)

ईस्ट एशिया करंडक


2015 ः चौथे स्थान
(इथेही गंमत आहे. चौथे स्थान म्हंटले, की काही तरी मोठं प्रतिष्ठेचं यश वाटतं. तेच तुम्ही शेवट आलो असं म्हंटलं तर… हीच तर गंमत आहे. या स्पर्धेत इनमिन चार संघ होते. ते म्हणजे चीन, हाँगकाँग, जपान, कोरिया. आता तुम्हीच सांगा, यात चौथा क्रमांक किती प्रतिष्ठेचा आहे तो?)


2016 : चौथा क्रमांक
(या स्पर्धेत पाच संघांत चीनचा चौथा क्रमांक आहे. त्यामुळे किमानअंशी बऱ्यापैकी स्थान म्हणावे लागेल. चीनने हाँगकाँग ड्रॅगन संघाचा पराभव करून हे चौथे स्थान मिळवले आहे.)


2018 : तिसरे स्थान
(एकूण चार संघांच्या स्पर्धेत चीनचे हे तिसरे स्थान. म्हणजे इथेही शेवटून दुसराच.)


why china does not play cricket
Why Chinese does not play Cricket?

हे माहीत आहे का?


  • चीनने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच पदार्पण केले. त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना इराणविरुद्ध खेळला.

  • चीन क्रिकेट संघटनेला 2004 मध्ये आयसीसीचे संलग्नत्व मिळाले, तर 2017 मध्ये सहसदस्यत्व बहाल करण्यात आले.

  • चीनचा महिला क्रिकेट संघ बँकॉकंमध्ये जानेवारी 2019 मध्ये झालेल्या थायलंड टी-20 क्रिकेट सामन्यात अवघ्या 14 धावांत गारद झाला. ही क्रिकेटविश्वातील सर्वांत नीचांकी धावसंख्या आहे. संयुक्त अमिराती संघाविरुद्ध झालेल्या या सामन्यात चीनकडून हान लिलीने सर्वाधिक 4 धावा काढल्या. चीनची ही सर्वांत खराब कामगिरी मानली जात आहे. यापूर्वी हा विक्रम मेक्सिकोच्या नावावर होता. मेक्सिको 18 धावांत गारद झाला होता.


Tags: China cricketWhy China doesn't play cricket?चीन क्रिकेटपासून लांब का?
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण?

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण?

Comments 5

  1. Unknown says:
    3 years ago

    Nice info

    Reply
  2. Mahesh Pathade says:
    3 years ago

    Thank you so much 🙂

    Reply
  3. skanchan says:
    3 years ago

    Nice sir ji

    Reply
  4. Mahesh Pathade says:
    3 years ago

    Thank you so much 🙂

    Reply
  5. Pingback: करोना नसलेल्या देशातलं क्रिकेट - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!