What is Surya bhedan Pranayam? सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय?
सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय?
What is Surya bhedan Pranayam?
मागच्या भागात आपण प्राणायामचे महत्त्व जाणून घेतले, तसेच हिवाळ्यात कुठले श्वसनाचे प्रकार आवश्यक आहेत, त्याबद्दल माहिती पाहिली. जलद श्वसन भस्त्रिका प्राणायाम याबद्दल जाणून घेतले. आज आपण पाहूया, सूर्यभेदन प्राणायाम (Surya bhedan Pranayam). What is Surya bhedan Pranayam? सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय?
सूर्यभेदन प्राणायाम Surya bhedan Pranayam |
कोणत्याही ध्यानात्मक स्थितीमध्ये बसावे. पाठीचा कणा ताठच ठेवावा. या प्राणायामच्या अभ्यासाने दररोज सरावाने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. त्यामुळे हा प्राणायाम थंडीमध्ये करणे लाभदायक आहे. उजवी नाकपुडी- पिंगला नाडी किंवा सूर्यनाडी. म्हणजेच उष्णता निर्माण करणे. त्यामुळे थंडीमुळे होणारे त्रास कमी होतात.
सर्दी, डोकेदुखी, थंडीमुळे होणारी अंगदुखी कमी होते, तसेच उत्साह वाढतो. मरगळ, आळस कमी होतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. दमाचा त्रास कमी होतो. कफविकार कमी होतो. वाताचा त्रास कमी होतो. पावसाळ्यातसुद्धा या प्राणायामचा सराव केल्याने ताप, सर्दी, खोकला, श्वास लागणे, अस्थमाचे त्रास होत नाहीत.
काळजी ः ज्यांच्या शरीरात उष्णता खूप आहे किंवा ज्यांना वारंवार उष्णतेचे त्रास होतात त्यांनी हा सूर्यभेदन प्राणायाम करू नये.
असा करतात सूर्यभेदन प्राणायाम Surya bhedan Pranayam |
प्रथम ताठ बसावे. उजव्या हाताची प्रणवमुद्रा व डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करावी. उजव्या हाताच्या प्रणवमुद्रेच्या साह्याने सराव सुरू करावा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. त्या वेळी डावी नाकपुडी बंद असावी.
पूर्ण श्वास घेतल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा व त्या वेळी उजवी नाकपुडी बंद करावी. याप्रमाणे दहा ते पंधरा आवर्तने रोज करावीत. (उजव्या बाजूने श्वास घेत राहावे व डाव्या बाजूने श्वास सोडत राहावे) याचा योग्य सराव झाला, की कुंभकासह याचा सराव करावा. कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे.
श्वास घेणे (पूरक)- श्वास रोखणे (कुंभक)- श्वास सोडणे (रेचक)
कुंभक करताना श्वास घेतला, की हनुवटी छातीला चिकटवायची म्हणजे जालंधर बंध बांधला जातो. जेवढा वेळ शक्य आहे तेवढाच वेळ श्वास रोखावा व श्वास सोडताना हळूहळू डाव्या बाजूने सोडावा.
कुंभक स्थितीमध्ये दोन्ही नाकपुड्या बंद असणे आवश्यक आहे. सुरुवातीला जालंधर बंध बांधून कुंभकाचा सराव करावा. हळूहळू त्रिबंध स्थिती घेण्याचा सराव करावा.
ज्यांना हृदयासंबंधाचे त्रास, उच्च रक्तदाब आहे त्यांनी कुंभक न करताच सराव करावा. दिलेल्या व्हिडीओमध्ये बघून सराव नक्की करू शकता, पण योग्य योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे आवश्यक असते.
[jnews_block_37 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238″]